सुस्वागतम! सुस्वागतम!! सर्व सन्माननीय शिक्षणप्रेमी वाचक बंधु भगिनींचे आश्रमशाळा शिक्षकमित्र या शैक्षणिक ब्लॉगवर आपले हार्दिक स्वागत आहे

गुरुवार, २८ जून, २०१८

सामान्यज्ञान प्रश्नसंग्रह भाग - १७

सामान्यज्ञान प्रश्नसंग्रह भाग - १७
प्रश्न-१)  ................. या दिवशी समर्पण दिन साजरा केला जातो?
उत्तर:- 28 फेब्रुवारी

प्रश्न-२) 100 वे प्रावासी भारतीय संमेलन ............. येथे संपन्न झाले?
उत्तर:-  जयपूर (राज्यस्थान)

प्रश्न-३) प्रादेशिक गहू संशोधन केंद्र कुठे आहे?
उत्तर:-  निफाड (नाशिक)

प्रश्न-४) महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक आयुक्त कोण आहेत?
उत्तर:-  नीला सत्यनारायण~

प्रश्न-५) रंगास्वामी कप कोणत्या खेळाशी संबंधित आहे?
उत्तर:-  हॉकी

प्रश्न-६) मराठी भाषेतील पहिले साप्तहिक कोणते?
उत्तर:-  दर्पण

प्रश्न-७) हरित गृहमध्ये (Green House) कोणता वायू वापरला जातो?
उत्तर:- मिथेन

प्रश्न-८) रसायनाचा राजा कोणत्या रसायनाला म्हणतात?
उत्तर:-  H2SO4 (सल्फुरिक असिड)

प्रश्न-९) मेरी 51 काविताये का कविता संग्रह कोणाचा आहे?
उत्तर:- अटल बिहारी वाजपेयी

प्रश्न-१०) जागतिक अन्न दिवस कोणता?
उत्तर:- 16 डिसेंबर

प्रश्न-११) ……… हा भारताने अवकाशात सोडलेला पहिली उपग्रह होय.
उत्तर :- आर्यभट्ट

प्रश्न-१२) ............. हे ऐतिहासिक शहर ओलान नदीकाठी वसले आहे
उत्तर :- व्हेनिस

प्रश्न-१३) सर्वात लहान ग्रह कोणता?
उत्तर :- बुध

प्रश्न-१४) खालीलपैकी कोणत्या ठिकाणास महाराष्ट्रातील चेरापुंजी असे म्हटले जाते?
उत्तर :- आंबोली

प्रश्न-१५) एखाद्या राज्यात राष्ट्रपती शासन लागू करताना राष्ट्रपती त्या राज्याच्या ------- मत विचारात घेतात?
उत्तर :- राज्यपालाचे

प्रश्न-१६) लोकसभेच्या पहिल्या महिला सभापती कोण?
उत्तर :-  मीरा कुमार (बिहार राज्याच्या आहेत)

प्रश्न-१७) जगात पवन उर्जा सर्वाधिक असणारा देश कोणता?
उत्तर :-  चीन

प्रश्न-१८) जागतिक बँकेचे एकूण सदस्य राष्ट्र (देश) किती?
उत्तर :-  165

प्रश्न-१९) जागतिक मुंद्रण दिन म्हणून कोणता दिवास साजरा केला जातो?
उत्तर :-  24 फेब्रुवारी

प्रश्न-२०) एपी 1000 हे तंत्रज्ञान काशीसी संबंधित आहे?
उत्तर :-  पाणबुडी निर्मिती

सौ्जन्य- तंत्रस्नेही शिक्षक समूह महाराष्ट्र

विज्ञान कोडे भाग - १४

विज्ञान कोडे भाग - १४
मी उडते थाटात
सुंदर फुलांच्या घाटात.
घर माझे षटकोनी
त्यात भरले गोड पाणी.
इवले इवले पंख,
छेडाल तर मारेल डंख.
ओळखा पाहू मी आहे कोण?
-----------------------------------
उत्तर- मधमाशी (HONEYBEE)
वैज्ञानिक स्पष्टिकरण :- मधमाशी हा एक कीटक आहे. एका पोळ्यामधे रानीमाशि, कामकरि माशी, सैनिक माशी अश्या तीन प्रकारच्या मधमाश्या असतात. विविध फुलांपासून गोळा केलेला मध म्हणजे त्याचं अन्न होय. कामकरी माशीच्या पोटवारील खंडामधुन मेण तयार होत असते. मधमाशीने एकदा दंश केल्यावर ती मरण पावते. मधमाशि हा एकमेव कीटक आहे ज्याने तयार केलेले अन्न मानव खातो.
Like our Facebook page
       ✍🏼 Writer✍🏼
SANDIP KRUSHNA JADHAO
    Chief Editor
    Noble Science
      7588090801
विज्ञान साक्षरता हाच आमचा ध्यास

ओळख मूलद्रव्यांची भाग - २९ - पोटॅशिअम

पोटॅशिअम ( पलाश )

या मूलद्रव्याचा शोध सर हम्फ्रे डेव्ही यांना १८०७ साली, इंग्लंडमध्ये लागला.

पलाश (पोटॅशिअम) हे आवर्तसारणीतील चौथ्या आवर्तनातील पहिल्या गणातील १९ अणुक्रमांक असलेले मूलद्रव्य. हे मूलद्रव्य ङ या प्रतीकाने दर्शविण्यात येते. लॅटिन शब्द kalium पासून K ही संज्ञा तयार झाली. या मूलद्रव्याचा शोध सर हम्फ्रे डेव्ही यांना १८०७ साली, इंग्लंडमध्ये लागला.
सॉल्ट पीटर (पोटॅशिअम नायट्रेट), तुरटी (पोटॅशिअम अ‍ॅल्युमिनिअम सल्फेट) आणि पोटॅश (पोटॅशिअम काबरेनेट) हे पोटॅशिअमचे क्षार अनेक शतकांपासून ज्ञात होते. पोटॅशिअम हा शब्द पोटॅश (pot + ash) या शब्दापासून तयार झाला. पोटॅशिअम वापरासाठी उपलब्ध व्हावा म्हणून एखाद्या भांडय़ात पाणी घेऊन त्यात पोटॅशिअमचे क्षार किंवा वनस्पतींची राख मिसळली जात असे. पूर्वी पोटॅशिअम काबरेनेट झाडांच्या राखेपासून मिळवून त्याचा उपयोग साबणात केला जात होता.
सर हम्फ्रे डेव्ही यांनी विद्युत अपघटन पद्धतीने कॉस्टिक पोटॅश (KOH) मधून पोटॅशिअम वेगळा करण्यात यश मिळविले. पोटॅशिअम हा पहिला धातू, जो विद्युत अपघटन पद्धत वापरून वेगळा केला. त्यानंतर त्याच वर्षी हीच पद्धत हम्फ्रे डेव्ही यांनी सोडिअम धातूसाठीही वापरली.
पोटॅशिअम हा सामान्य तापमानाला मऊ, चाकूने कापता येणारा, चांदीसारखा दिसणारा क्रियाशील धातू! शून्य अंश सेल्सिअस तापमानाला पोटॅशिअम कठीण व ठिसूळ होतो. हा अल्कली धातू हवेच्या संपर्कात आला असता ऑक्सिडेशन होऊन काळा पडतो. तसेच पाण्याच्या संपर्कात आला असता रासायनिक अभिक्रिया होऊन दाहक असे पोटॅशियम हायड्रॉक्साइड आणि हायड्रोजन तयार होते, त्याचप्रमाणे या अभिक्रियेत उष्णता उत्सर्जति होते.पोटॅशिअम समुद्राच्या पाण्यात आणि बऱ्याचशा खनिजांमध्ये सापडतो. निसर्गात पोटॅशिअमची तीन समस्थानिके आढळतात. त्यापैकी 40K हा किरणोत्सारी आहे.
आपल्या शरीरात आढळणारा पोटॅशिअम, पेशींच्या कार्यासाठी उपयुक्त असा घटक आहे. मज्जातंतूंच्या आपसांतील संदेश देवाणघेवाण करण्यात पोटॅशियम आयन-हस्तांतरण ही एक आवश्यक क्रिया आहे. तसेच हृदयाचे ठोके नियंत्रित करणे यासारखे अतिमहत्त्वाचे कार्य पोटॅशिअममुळे होते. त्यामुळेच पोटॅशिअमची शरीरातील कमतरता किंवा अतिरिक्त पातळी ही हानीकारक ठरू शकते. ताजी फळे आणि भाज्या हा पोटॅशिअमचा सर्वात योग्य स्रोत आहे.
पाण्यात विरघळण्याची पुरेपूर क्षमता असल्याने पोटॅशिअमचा वापर साबणात केलेला आढळतो. तसेच रासायनिक खतांमध्येही पोटॅशिअमचा वापर मोठय़ा प्रमाणात केला जातो.
– ललित गायकवाड
मराठी विज्ञान परिषदवि. ना. पुरव मार्गचुनाभट्टीमुंबई २२ 

दिनविशेष २९ जून

दिनविशेष २९ जून
पद्मनाभन कृष्णगोपाल अयंगार भारताचे गणमान्य परमाणु वैज्ञानिक
जन्मदिन - २९ जुन १९३१

पद्मनाभन कृष्णगोपाल अयंगार (29 जून 1931 – 21 दिसम्बर 2011) भारत के गणमान्य परमाणु वैज्ञानिक थे। वे भारत के प्रथम परमाणु बम परीक्षण के सूत्रधार थे। वे भाभा परमाणु अनुसंधान केन्द्र (BARC) के निदेशक और उसके बाद परमाणु ऊर्जा आयोग के अध्यक्ष रहे। वे भारत-अमेरिका असैनिक नाभिकीय सहयोग के विरुद्ध बोलने वालों में अग्रणी थे। उनका मत था कि यह समझौता अमेरिका का अधिक हित साधता है।

सामान्यज्ञान प्रश्नसंग्रह भाग - १६

सामान्यज्ञान प्रश्नसंग्रह भाग - १६
प्रश्न-१) लिंबू व संत्रे ह्यात कोणते अॅसिड असते?
उत्तर:- लिंबू व संत्रे ह्यात सायट्रिक अॅसिड असते.

प्रश्न-२) अँटिसॆप्टिक मलम आणि थायरॉइड स्त्रावामध्ये कोणता घटक आवश्यक असतो?
उत्तर:- अँटिसॆप्टिक मलम आणि थायरॉइड स्त्रावामध्ये आयोडीन हा घटक आवश्यक असतो.

प्रश्न-३) ग्रामीण भागात सोयीस्कर इंधन कोणते?
उत्तर:- ग्रामीण भागात सोयीस्कर इंधन बायोगॅस आहे.

प्रश्न-४) टेपरेकाॅर्डरच्या कॅसेटवर कशाचे आवरण असते?
उत्तर:- टेपरेकाॅर्डरच्या कॅसेटवर आयर्न आॅक्साइड हे आवरण असते.

प्रश्न-५) नैसर्गिक मुलमत्ते किती आहेत?
उत्तर:- नैसर्गिक मुलमत्ते ९२ आहेत.

प्रश्न-६) वायू हे मुलतत्व नसून ती दोन वायूंची बनली आहे, हे कोणत्या शास्त्रज्ञाने सिद्ध केले?
उत्तर:- वायू हे मुलतत्व नसून ती दोन वायूंची बनली आहे, हे लॅव्हायशर या शास्त्रज्ञाने सिद्ध केले.

प्रश्न-७) भारतामध्ये ३००० वर्षापूर्वी परमाणुमीमांसा कोणी केला?
उत्तर:- भारतामध्ये ३००० वर्षापूर्वी परमाणुमीमांसा महर्षी कणाद यांनी केला.

प्रश्न-८) परमाणुमीमांसा चा जनक कोण आहे?
उत्तर:- परमाणुमीमांसा चा जनक जॉन डॉल्टन आहे.

प्रश्न-९) मादाम मेरी क्युरी ह्यांनी कोणता शोध लावला?
उत्तर:- मादाम मेरी क्युरी ह्यांनी रेडियम चा शोध लावला.

प्रश्न-१०) भारतातील पहिला परमाणु शक्ती प्रकल्प कोठे सुरु झाला?
उत्तर:- भारतातील पहिला परमाणु शक्ती प्रकल्प तारापूर येथे सुरु झाला.

प्रश्न-११)महत्वाच्या प्लॅस्टिकला काय म्हणतात?
उत्तर:- महत्वाच्या प्लॅस्टिकला पीव्हीसी म्हणतात.

प्रश्न-१२) लोखंडाच्या कोणत्या प्रकारात कार्बनचे प्रमाण अधिक असते?
उत्तर:- लोखंडाच्या ओतीव लोखंड अथवा बीड यात कार्बनचे प्रमाण अधिक असते.

प्रश्न-१३) आवर्त सारणी प्रथम कोणत्या शास्त्रज्ञाने मांडली?
उत्तर:- आवर्त सारणी प्रथम मेंडोलिव्ह या शास्त्रज्ञाने मांडली.

प्रश्न-१४) रक्तामध्ये लोह कोणत्या रुपात असते?
उत्तर:- रक्तामध्ये लोह सयुंग रुपात असते.

प्रश्न-१५) वातावरणातील रासायनिक दृष्ट्या निष्क्रिय वायू कोणता आहे?
उत्तर:- वातावरणातील रासायनिक दृष्ट्या निष्क्रिय वायू आॅरगाॅन आहे.

प्रश्न-१६) भोपाळ दुर्घटनेसाठी कोणती कंपनी जबाबदार धरली जाते?
उत्तर:- भोपाळ दुर्घटनेसाठी युनियन कार्बाइड ही कंपनी जबाबदार धरली जाते.

प्रश्न-१७) प्राण्यांच्या शरीरात आढळणारा युरिया हा पदार्थ कृत्रिमरीत्या तयार करणारा शास्त्रज्ञ कोण?
उत्तर:- प्राण्यांच्या शरीरात आढळणारा युरिया हा पदार्थ कृत्रिमरीत्या तयार करणारा शास्त्रज्ञ व्होलर आहे.

प्रश्न-१८) सर्व रसायनांचा राजा कोणाला म्हणतात?
उत्तर:- सर्व रसायनांचा राजा गंधकाम्ल याला म्हणतात.

प्रश्न-१९) परमाणुशक्तीसंघटना ची स्थापना केव्हा झाली?
उत्तर:- परमाणुशक्तीसंघटना ची स्थापना १९५४ मध्ये झाली.

सौ्जन्य- तंत्रस्नेही शिक्षक समूह महाराष्ट्र

विज्ञानकोडे भाग - १३

विज्ञानकोडे भाग - १३
माझा दिसतो एकच भाग
केलाय जसा नवरीने साज.
माणूस भेटून गेलाय मला
दिसणार नाही अमावस्येला.
कपडे बदलतो महिण्याला सोळा
आकाशात फिरणारा आहे मी गोळा
ओळखा पाहू मी आहे कोण?
------------------------------

उत्तर- चंद्र (Moon)
Like our Facebook page
       ✍🏼 Writer✍🏼
SANDIP KRUSHNA JADHAO
    Chief Editor
    Noble Science
      7588090801
विज्ञान साक्षरता हाच आमचा ध्यास

ओळख मूलद्रव्यांची भाग - २८ - अरगॉन

ओळख मूलद्रव्यांची भाग - २८

अरगॉन

अरगॉन हा रंगहीन व गंधहीन वायू असून त्याचा अणुक्रमांक १८ आहे.

अरगॉन हा रंगहीन व गंधहीन वायू असून त्याचा अणुक्रमांक १८ आहे. आवर्तसारणीत अरगॉनचा समावेश निष्क्रिय मूलद्रव्यांच्या १८व्या गणात केला जातो. या गणातील सर्व मूलद्रव्यांच्या अणूंमध्ये बाहेरच्या कक्षेतील इलेक्ट्रॉनचे अष्टक (हेलियमच्या बाहेरच्या कक्षेत केवळ दोन इलेक्ट्रॉन असतात.) पूर्ण असल्याने सर्व मूलद्रव्ये रासायनिकदृष्टय़ा स्थिर आणि अक्रियाशील असतात. त्यामुळे या मूलद्रव्यांना ‘निष्क्रिय’ म्हणतात.
अरगॉन वायूच्या शोधाचा इतिहास जाणून घेण्यासारखा आहे. खरं तर १७८५ साली हेन्री कॅव्हेंडिश यांना पृथ्वीच्या वातावरणातील हवेचा काही भाग अक्रियाशील असल्याचा अंदाज आला होता. तेव्हा त्यांनी हवेपासून एक वायू वेगळा केला आणि तो वायू (सुमारे १ टक्का) कोणत्याही परिस्थितीत क्रियाशील नसतो, हेही त्यांच्या लक्षात आले. मात्र तो वायू अरगॉन आहे हे त्यांना माहीत नव्हते.
अरगॉनचा शोध १८९४ साली लॉर्ड रॅली आणि सर विल्यम रॅम्झी यांनी लावला. केवळ हवेच्या नमुन्यापासून नायट्रोजन, ऑक्सिजन, बाष्प आणि कार्बनडाय ऑक्साइड इत्यादी घटक त्यांनी काढून टाकले आणि अरगॉन वायू पहिल्यांदा वेगळा केला. मात्र हेन्री कॅव्हेंडिश आणि रॅली-रॅम्झी यांच्या संशोधनात तब्बल शंभर वष्रे लोटली. अरगॉन वायूचा शोध लागण्यामागे नायट्रोजन वायू कारणीभूत होता, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. प्रयोगशाळेत रॅली-रॅम्झी यांना असे आढळून आले की, नायट्रोजनच्या संयुगांपासून मिळविलेला नायट्रोजन हा हवेपासून मिळविलेल्या नायट्रोजनच्या तुलनेत सुमारे ०.५ टक्के हलका असतो. वास्तविक पाहता, हा फरक खूपच कमी होता, तरी रॅली-रॅम्झी यांनी त्यामागील वस्तुस्थिती शोधण्यासाठी काही महिने घालविले. त्यांनी असा निष्कर्ष काढला की, हवेतील आणखी एखादा वायू नायट्रोजनमध्ये मिसळलेला असावा. कॅव्हेंडिश यांच्यासारखीच पद्धत वापरून रॅली-रॅम्झी यांनी अरगॉन मिळविला. त्यांनी प्रथम हवेतील ऑक्सिजन वेगळा करण्यासाठी तापलेल्या कॉपरवरून (तांबे) हवा जाऊ दिली आणि उरलेल्या वायूची मॅग्नेशियमबरोबर नायट्रोजन वायूची अभिक्रिया घडवून मॅग्नेशियम नायट्राइडच्या स्वरूपात नायट्रोजन वेगळा करून अरगॉन मिळविला. नंतर वेगवेगळ्या चाचण्यांमधून अरगॉन वायू अक्रियाशील असल्याचे स्पष्ट झाले. अरगॉन या ग्रीक भाषेतील शब्दाचा अर्थ ‘आळशी’ असा होतो. हा वायू अक्रियाशील असल्याने या वायूला ‘अरगॉन’ असे नाव पडले.
विजय ज्ञा. लाळे
मराठी विज्ञान परिषद,
वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२

दिनविशेष २८ जून

दिनविशेष २८ जून
प्रशांत चंद्र महालनोबिस-भारतीय शास्त्रज्ञ आणि संख्याशास्त्रज्ञ
स्मृतिदिन - २८ जुन १९७२

प्रशान्त चन्द्र महालनोबिस (बंगला: প্রশান্ত চন্দ্র মহলানবিস ; २९ जून १८९३- २८ जून १९७२) एक प्रसिद्ध भारतीय वैज्ञानिक एवं सांख्यिकीविद थे। उन्हें दूसरी पंचवर्षीय योजना के अपने मसौदे के कारण जाना जाता है। भारत की स्वत्रंता के पश्चात नवगठित मंत्रिमंडल के सांख्यिकी सलाहकार बने तथा औद्योगिक उत्पादन की तीव्र बढ़ोतरी के जरिए बेरोजगारी समाप्त करने के सरकार के प्रमुख उद्देश्य को पूरा करने के लिए योजना का खाका खींचे।
महालनोबिस की प्रसिद्धि महालनोबिस दूरी के कारण है जो उनके द्वारा सुझाया गयी एक साख्यिकीय माप है। उन्होने भारतीय सांख्यिकीय संस्थान की स्थापना की।
आर्थिक योजना और सांख्‍यि‍की विकास के क्षेत्र में प्रशांत चन्‍द्र महालनोबिस के उल्‍लेखनीय योगदान के सम्‍मान में भारत सरकार उनके जन्‍मदिन, 29 जून को हर वर्ष 'सांख्‍यि‍की दिवस' के रूप में मनाती है। इस दिन को मनाने का उद्देश्‍य सामाजिक-आर्थिक नियोजन और नीति निर्धारण में प्रो॰ महालनोबिस की भूमिका के बारे में जनता में, विशेषकर युवा पीढ़ी में जागरूकता जगाना तथा उन्‍हें प्रेरित करना है।

बुधवार, २७ जून, २०१८

बोधकथा - आनंदी कावळा

 बोधकथा - आनंदी कावळा                              
       एक राज्यात एक कावळा असतो. नेहमी आनंदी , हसत ! कुठल्याच प्रकारचे दु:ख, कष्ट त्याच्या चेह-यावरचा आनंद हिरावून घेवू शकत नसतात. एकदा त्या राज्याच्या राजाला ही बातमी कळते .त्याला खूप आश्चर्य वाटते, हे अशक्य आहे, त्याचे मन खात्री देते
मग तो आपल्या शिपायांना त्या कावळ्याला पकडून आणण्याची आज्ञा देतो . कैदेत ठेवल्यावर कसा आनंदी राहील पठ्ठया ! राजा मनोमन आपल्या विचारावर खूश होतो . कावळ्याला कैद करून महीना लोटतो तरी तो हसतच !
राजा बेचैन होतो. " प्रधानजी, त्या कावळ्याला दु:खी करण्यासाठी काय करता येईल?"
" महाराज, आपण त्याला काट्यात टाकुया" प्रधान तत्परतेने उपाय सुचवतो.
लगेच राजाच्या आदेशाप्रमाणे शिपाई त्याला काट्यात टाकतात . तिथेही हा आपला आनंदाने शीळ घालतोय.
"महाराज, आपण त्याला तापलेल्या तव्यावर टाकुया" राणी दुसरा मार्ग  सुचवते.
दुस-या दिवशी त्याला तापलेल्या तव्यावर टाकले जाते ,पण कितीही चटके बसले तरी त्याच्या चेह-यावरचे हसू काही मावळत नाही.
"ते काही नाही महाराज, आपण त्याला ऊकळत्या तेलात टाकू " सेनापती पुढची शिक्षा सुचवतात .
दुस-या दिवशी भल्यामोठ्या कढईत तेल ऊकळवून त्यात त्याला टाकले जाते. तरीही कावळा हसतोच आहे.
राजाला भयंकरच राग येतो. मग तो शेवटचा जालीम उपाय करायचे ठरवतो आणि त्या कावळ्याचे पंखच छाटून टाकतो. पंख छाटलेला कावळा क्षीण हसतो आणि कायमचे डोळे मिटतो .
लहानपणी ही गोष्ट वाचताना खूप गंमत वाटायची. पण आता तिच्यातले मर्म काय ते कळते. आपण आनंदी आहोत , सुखी आहोत ,हसत आहोत ही बाबच् नापसंत असणारे किती 'राजे' आपल्या अवतीभोवती असतात ना! कधी आपले जवळचे आप्त, स्वकीय तर कधी परकीय. तुम्हाला कोणत्या गोष्टीनी त्रास होईल, कशाने यातना होतील, दु:ख होईल ? या गोष्टींचा विचार करण्यात आपली स्वत:ची शक्ती अकारण खर्ची पाडणारे आणि त्यासाठी  विविध युक्त्या योजून त्या आमलात आणणारे  ' प्रधान', 'सेनापती' यांची कमतरता नाही.
 गंमत म्हणजे या अशा योजना आमलात आणण्यासाठी आवश्यक शिपायांची भाऊगर्दीही कमी नाही आणि अशाही सगळ्या परिस्थितीतही आपल्या चेह-यावरचे हसू टवटवीत ठेवणारे 'आनंदी कावळे' ही आहेत
वास्तविक या जगात प्रत्येकचजण सुखाच्या, आनंदाच्या मागे धावत असतो. जगण्याची ही सगळी धडपड तो एक 'सुखी माणसाचा' सदरा मिळवण्यासाठीच चालू असते. तरीही दुस-याचा आनंद का सहन होत नाही आपल्याला ? आनंदाची इतकी संकुचित संकल्पना घेवून जगत असतो आपण की, फक्त मला स्वत:ला मिळाला तरच तो 'आनंद'; नाही तर नाही. त्या दुस-या व्यक्तीनेही तो क्षणिक आनंद यश मिळवण्या साठी खूप कष्ट घेतलेले असतात, अनेक त्रास सहन केलेले असतात, दु:ख भोगलेलं असतं; तेव्हा कुठे त्याच्या वाट्याला तो आनंदाचा छोटासा 'कवडसा' आलेला असतो, हा विचारच आपल्या मनाला शिवत नाही.
इतरांच्या आयुष्यातील असे अनेक छोटे छोटे कवडसे आपणही तितक्याच आनंदाने उपभोगू शकलो तर आपल्या मनाच्या अंगणभर सुखाचे ऊन सदा हसत राहील, तिथे दु:खाच्या सावलीला जागाच राहणार नाही. सगळ्या जगाचं सोडा हो, आपल्या जवळच्या माणसांच्या बाबतीत तरी हे करून बघायला काय हरकत आहे ?
कोणाचा आनंद कसा हिरावून घेता येईल याचा विचार करत बसण्यापेक्षा त्याच्यासोबत आपल्यालाही आनंदी होता येतंय का, हसता येतंय का ते पहायला काय हरकत आहे ?
सुदैवाने भेटलाच एखादा 'आनंदी कावळा' तर त्याच्या सोबत चार मुक्त गिरक्या घेवून बघूया आकाशात..
त्याचे पंख छाटून त्याला संपवण्या पेक्षा आपल्या ह्रृदयाच्या खोल खोल कप्प्यात त्याला कायमचा जपून ठेवू या. 

मंगळवार, २६ जून, २०१८

विज्ञानकोडे भाग - १२

विज्ञानकोडे भाग - १२
पृथ्वीच्या पृष्ठभागाची हालचाल आकस्मित.
विनाशकारी आहे आपत्ती नैसर्गिक.
भूगर्भातील ऊर्जेचे प्रचंड उत्सर्जन.
मालमत्ते सोबतच क्षणात संपते जीवन.
भूकवाच्यामध्ये होतात कंपने निर्माण.
रिष्टर स्केलने मोजतात तीव्रतेचे प्रमाण.
उत्तर - भूकंप (Earthquake)

Like our Facebook page
       ✍🏼 Writer✍🏼
SANDIP KRUSHNA JADHAO
    Chief Editor
    Noble Science
      7588090801
विज्ञान साक्षरता हाच आमचा ध्यास

ओळख मूलद्रव्यांची भाग - २७ - क्लोरीन

ओळख मूलद्रव्यांची भाग - २७

क्लोरीन

कधी कधी तरणतलावात पोहून आल्यावर डोळे चुरचुरल्यासारखे वाटलेत?

कधी कधी तरणतलावात पोहून आल्यावर डोळे चुरचुरल्यासारखे वाटलेत? किंवा कधी नळातून येणाऱ्या पाण्याला कसला उग्र भपकारा वाटला आहे?  ही आहे क्लोरीन वायूची किमया! अणूक्रमांक १७ असलेले क्लोरीन मूलद्रव्याचे स्थान आवर्तसारणीत तिसऱ्या आवर्तनात आणि १७ व्या गणात आहे. सामान्य तापमानाला क्लोरीन वायू हिरवट पिवळ्या रंगाचा असतो. पाणी शुद्ध करण्यासाठी या वायूचा वापर गेली अनेक वष्रे/ दशके केला जात आहे. अगदी सन १९०० पासून पेयजलाच्या शुद्धीकरणासाठी व सन १९२० पासून तरणतलावातील पाणी शुद्ध ठेवण्यासाठी क्लोरीन वायू वापरला जातो.
अशा या वायूचा शोध १७७४ साली कार्ल विल्यम शील या शास्त्रज्ञाने लावला. हायड्रोक्लोरिक आम्ल हे पाय्रोलुझाईट (मँगेनीज डाय ऑक्साइड) बरोबर तापवल्यानंतर या पिवळसर हिरव्या दाट वायूची निर्मिती झाली; त्याच्या वासाने गुदमरल्यासारखे झाले असे निरीक्षण त्याने केले. तसेच या वायूने लिटमस कागद, पाने, फुले रंगहीन होतात. कार्ल शीलने क्लोरीन वायूचा हा विरंजक (ब्लीचिंग) गुणधर्मही नोंदवून ठेवला. हंफ्री डेव्ही यांनीही क्लोरीनवर काही प्रयोग केले आणि १८१० मध्ये क्लोरीन हे संयुग नसून मूलद्रव्य आहे असा निष्कर्ष काढला. क्लोरीनच्या हिरवट पिवळ्या रंगावरून, क्लोरो या ग्रीक शब्दावरून या मूलद्रव्याला क्लोरीन हे नाव दिले.क्लोरीन निसर्गात मुक्त स्थितीत आढळत नाही. हॅलाइट (सोडिअम क्लोराइट)  हे क्लोरीन मिळण्याचे मुख्य खनिज. कार्नालाईट (मॅग्नेशिअम पोटॅशिअम क्लोराइड) आणि सिल्वाइट (पोटॅशिअम क्लोराइड) या खनिजामधूनही क्लोरीन मिळते. आपल्या रोजच्या वापरातले मीठ हे सोडियम व क्लोरीन यांचे संयुग आहे. मानवी शरीरात एक दाहक आम्ल असते ते म्हणजे मानवाच्या पोटात असलेले हायड्रोक्लोरिक आम्ल. हायड्रोजन आणि क्लोरीनचे हे संयुग आपल्या अन्नपचनास मदत करते. शरीरातील मीठ (सोडीयम क्लोराइड आणि पोटॅशियम क्लोराइड) आपल्या चेता संस्थेला कार्यक्षम ठेवते. अत्यंत सूक्ष्म प्रमाणात झाडांनाही त्याची आवश्यकता असते. अन्यथा पाने पिवळी पडू शकतात. क्लोरीन हा वायू अत्यंत क्रियाशील असल्याने फक्त निष्क्रिय वायू सोडून सगळ्यांशी संयुगे करतो.
– डॉ. कविता रेगे
मराठी विज्ञान परिषद,
वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२ 

दिनविशेष २७ जून

दिनविशेष २७ जून
हान्स श्पेमान- जर्मन प्राणीशास्त्रज्ञ व नोबेल पारितोषिक विजेता
जन्मदिन - २७ जुन १८६९

हान्स श्पेमान (जर्मन: Hans Spemann) (जून २७, १८६९ - सप्टेंबर ९, १९४१) हा जर्मन भ्रूणशास्त्रज्ञ होता. १९३५ साली त्याला भ्रूणशास्त्रातील कामगिरीबद्दल वैद्यकशास्त्रातील नोबेल पारितोषिक देऊन गौरवण्यात आले.
भ्रूणविज्ञान (Embroyology) के अंतर्गत अंडाणु के निषेचन से लेकर शिशु के जन्म तक जीव के उद्भव एवं विकास का वर्णन होता है। अपने पूर्वजों के समान किसी व्यक्ति के निर्माण में कोशिकाओं और ऊतकों की पारस्परिक क्रिया का अध्ययन एक अत्यंत रुचि का विषय है। स्त्री के अंडाणु का पुरुष के शुक्राणु के द्वारा निषेचन होने के पश्चात जो क्रमबद्ध परिवर्तन भ्रूण से पूर्ण शिशु होने तक होते हैं, वे सब इसके अंतर्गत आते हैं, तथापि भ्रूणविज्ञान के अंतर्गत प्रसव के पूर्व के परिवर्तन एवं वृद्धि का ही अध्ययन होता है।

सोमवार, २५ जून, २०१८

सामान्यज्ञान प्रश्नसंग्रह भाग - १५

सामान्यज्ञान प्रश्नसंग्रह भाग - १५
प्रश्न-१) वारली पेंटीग्ज मूळच्या कोणत्या राज्यातील आहेत?
उत्तर :-  महाराष्ट्र

प्रश्न-२) यापैकी कोणता धातू लोखंडापेक्षा कठीण आहे?
उत्तर :-  निकेल

प्रश्न-३) कॉम्प्यूटरम ध्ये 'ए एस सी आय आय' (ASCII) याचा अर्थ काय आहे?
उत्तर :-  अमेरिकन स्टँडर्ड कोड फॉर इन्फॉर्मेशन इंटरचेंज

प्रश्न-४) भारतात अंधांसाठी सन 1887 मध्ये पहिली शाळा कोठे सुरू करण्यात आली?
उत्तर :-  अमृतसर

प्रश्न-५) खालीलपैकी कशाचे मोजमाप रिम्स किंवा कॅलिपरने घेतले जाते?
उत्तर :-  कागद

प्रश्न-६) जेवण केल्यानंतर नेहमी काय करावे?
उत्तर :- वज्रासन

प्रश्न-७) जेवण झाल्यावर वज्रासन किती वेळ करावे?
उत्तर :- 5 -10 मिनिटे

प्रश्न-८) सकाळी उठल्यावर डोळ्यात काय टाकावे?
उत्तर :- तोंडाची लाळ

प्रश्न-९) रात्री किती वाजन्याच्या आत झोपावे?
उत्तर :- 9 - 10 वाजे पर्यन्त

प्रश्न-१०) तीन विष कोणते?
उत्तर :- साखर , मैदा व मीठ.

प्रश्न-११) जम्मू काश्मीर मधील सलाल जलविद्युत प्रकल्प कोणत्या नदीवर आहे?
उत्तर :- चिनाब

प्रश्न-१२) जर एका वर्गातील विद्यार्थ्यांच्या गुणांची बेरीज 2795 आणि सरासरी 65 असेल, तर वर्गातील विद्यार्थी संख्या किती?
उत्तर :-  43

प्रश्न-१३) माऊंट अबू कोणत्या पर्वत रांगेत आहे?
उत्तर :-  अरवली

प्रश्न-१४) भारताच्या कोणत्या राज्याची राजधानी सात वन्य टेकड्यांवर आहे?
उत्तर :-  तिरुवनंतपुरम

प्रश्न-१५) शिवसमुद्र धबधबा कोणत्या नदीवर आहे?
उत्तर :-  कावेरी

प्रश्न-१६) महाराष्ट्रामध्ये ग्राम न्यायालयाची स्थापना कधी झाली?
उत्तर :-  2 ऑक्टोबर, 2009

प्रश्न-१७) राष्ट्रीय विज्ञान व तंत्रज्ञान दिवस कोणता?
उत्तर :-  11 मे

प्रश्न-१८)  जगातील सर्वात जास्त तंबाखू उत्पादक करणारा देश कोणता?
उत्तर :-  भारत

प्रश्न-१९) भारतातील कुपोषित मुलांचे प्रमाण किती?
उत्तर :-  42%

प्रश्न-२०) भारतातील सरासरी मृत्यु दर किती?
उत्तर :-  7.2

सौ्जन्य- तंत्रस्नेही शिक्षक समूह महाराष्ट्र

विज्ञानकोडे भाग - ११

विज्ञानकोडे भाग - ११
उघड्या डोळ्यांनी दिसणारा लांबचा ग्रह.
टायटन आहे माझा सर्वात मोठा उपग्रह.
हायड्रोजन व हेलियम माझ्या वातावरणात.
हलका एवढा की तरंगेल पाण्यात.
कडीने वाढली आहे माझी सुंदरता.
पाण्यापेक्षा कमी आहे माझी घनता.
उत्तर - शनी ग्रह (Saturn)

Like our Facebook page
https://www.facebook.com/noblesciencemagazine/

       ✍🏼 Writer✍🏼
SANDIP KRUSHNA JADHAO
    Chief Editor
    Noble Science
      7588090801

ओळख मूलद्रव्यांची भाग - २६ - गंधक

ओळख मूलद्रव्यांची भाग - २६

गंधक

मूलद्रव्य प्राचीन काळापासून भारतीयांना माहिती आहे.

मराठीत गंधक म्हणून ओळखले जाणारे सल्फर हे मूलद्रव्य प्राचीन काळापासून भारतीयांना माहिती आहे. पारा आणि गंधक एकत्र करून तयार केलेल्या पदार्थाचा आयुर्वेदात औषध म्हणून वापर केला जात असे. भारतीयांप्रमाणेच प्राचीन इजिप्त, चीन आणि ग्रीक संस्कृतींनाही गंधक माहीत होते आणि औषध व कीटकनाशक म्हणून त्याचा उपयोग प्रचलित होता. गंधक हे मूलद्रव्य आहे हे फ्रेंच शास्त्रज्ञ अँटोनी लॅव्होझिएने १७७७ मध्ये सिद्ध केले.
पिवळ्या रंगाचे स्फटिक किंवा चूर्णरूपात गंधक निसर्गात शुद्ध स्वरूपात आढळते. ज्वालामुखीच्या जवळच्या प्रदेशात गंधकाचे साठे आढळतात. पृथ्वीवर विपुल प्रमाणात आढळणाऱ्या मूलद्रव्यांमध्ये गंधकाचा दहावा क्रमांक लागतो. सोने, प्लॅटिनम यांसारखे राजस धातू सोडले तर गंधकाची इतर सर्व मूलद्रव्यांबरोबर रासायनिक प्रक्रिया होते.
१६ अणुक्रमांक असलेल्या गंधकाचा अणुभार ३२ आहे. गंधकाची ३० अपरूपे आढळतात. इतर कुठल्याही मूलद्रव्यांच्या अपरूपांपेक्षा ही संख्या जास्त आहे.
शुद्ध रूपातल्या गंधकाचा माणसाच्या आरोग्यावर कुठलाही विपरीत परिणाम होत नसला तरी मोटारींच्या धुरातून बाहेर पडणारा सल्फर डाय ऑक्साइड आणि हायड्रोजनबरोबर संयोगातून होणारा हायड्रोजन सल्फाइड हे दोन वायू मात्र धोकादायक असतात. सेंद्रिय संयुगांच्या रूपात गंधक हे सर्व सजीवांचा अविभाज्य घटक असते. आणि मानवी शरीरात ते फॉस्फरसइतक्याच विपुल प्रमाणात आढळते. प्रथिनं ज्यापासून तयार होतात त्या अमायनो आम्लांमध्ये गंधक एक महत्त्वाचा घटक असतो. तसेच बायोटीन आणि थायमिन या ‘ब’ वर्गातील जीवनसत्त्वांमध्येही गंधक असते. केराटीन या प्रथिनाला ताकद देण्याचे आणि पाण्यात अविद्राव्य करण्याचे काम या प्रथिनातील गंधक-गंधकाचे बंध करतात. केराटीन प्रथिनांपासून प्राण्यांची त्वचा, केस आणि पिसे तयार होतात. कोंबडीच्या अंडय़ातसुद्धा गंधकाचे प्रमाण खूप असते. नवीन पिल्लाची पिसे बनविण्यासाठी या गंधकाचा उपयोग होतो. यामुळेच सडणाऱ्या अंडय़ाला एक विशिष्ट प्रकारचा वास येतो. तो अंडय़ातील गंधक आणि हायड्रोजनच्या संयुगातून तयार झालेल्या हायड्रोजन सल्फाइड वायूचा असतो.गंधकाचा उपयोग रबराचे ‘व्हल्कनायझेशन’ करण्यासाठी बंदुकीच्या दारूमध्ये आणि बुरशी प्रतिबंधक म्हणून होतो. परंतु गंधकाचा सर्वात मोठा उपयोग गंधकाम्ल (सल्फ्युरिक आम्ल) तयार करण्याकरिता केला जातो. तसेच वर्षांला जवळजवळ दहा कोटी टन इतक्या कॅल्शियम सल्फेट या गंधकाच्या संयुगाचा सिमेंट बनविण्याकरिता वापर केला जातो.
– योगेश सोमण, मुंबई
मराठी विज्ञान परिषद,
वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२ 

दिनविशेष २६ जून

दिनविशेष २६ जून
●पूर्ण नाव :~ यशवंत आप्पासाहेब घाटगे
●जन्म :~ २६ जून इ.स.१८७४ कागल, कोल्हापूर
●राज्याभिषेक :~ २ एप्रिल १८९४
●मृत्यू :~ ६ में १९२२ मुंबई
●राज्यव्याप्ती :~ कोल्हापूर जिल्हा
Image result for rajarshi shahu maharaj

       ◆ राजर्षी शाहू महाराज ◆
    चौथे शाहू, अर्थात राजर्षी छत्रपती शाहू महाराज हे कोल्हापूर संस्थानाचे छत्रपती होते.  सामाजिक क्रांतीचे अग्रदूत, सर्वसामान्य बहुजन समाजाला स्वाभिमानाचे नवे जीवन देणारे आरक्षणाचे प्रणेते....
     
      दिव्यत्वाची जेथ प्रचीती
      तेथे कर माझे जुळती ..!!


    शाहू महाराजांनी बहुजन समाजात शिक्षणप्रसार करण्यावर विशेष भर दिला. त्यांनी कोल्हापूर संस्थानात प्राथमिक शिक्षण सक्तीचे व मोफत केले. स्त्री शिक्षणाचा प्रसार व्हावा म्हणून त्यांनी राजाज्ञा काढली. अस्पृश्यता नष्ट करण्याच्या दृष्टीने त्यांनी इ.स. १९१९ साली सवर्ण व अस्पृश्यांच्या वेगळ्या शाळा भरवण्याची पद्धत बंद केली. जातिभेद दूर करण्यासाठी त्यांनी आपल्या राज्यात आंतरजातीय विवाहाला मान्यता देणारा कायदा केला. इ.स. १९१७ साली त्यांनी पुनर्विवाहाचा कायदा करून विधवाविवाहाला कायदेशीर मान्यता मिळवून दिली. 
    ‘शाहू छत्रपती स्पिनिंग अँड वीव्हिंग मिल’, शाहुपुरी व्यापारपेठ, शेतकऱ्यांची सहकारी संस्था, शेतकी तंत्रज्ञानाच्या संशोधनासाठी ‘किंग एडवर्ड अ‍ॅग्रिकल्चरल इन्स्टिट्यूट’ इत्यादी संस्था कोल्हापुरात स्थापण्यात त्यांचा प्रमुख वाटा होता. राधानगरी धरणाची उभारणी, शेतकऱ्यांना कर्जे उपलब्ध करून देणे अशा उपक्रमांतूनही त्यांनी कृषिविकासाकडे लक्ष पुरवले.
    त्यांनी बाबासाहेब आंबेडकरांना त्यांच्या शिक्षणासाठी, तसेच मूकनायक वृत्तपत्रासाठीही सहकार्य केले होते. त्यांनी चित्रकार आबालाल रहिमान यांच्यासारख्या कलावंतांना राजाश्रय देऊन प्रोत्साहन दिले.
    स्वातंत्र्यापूर्वी कैक वर्षे आधी समता, बंधुता, धर्मनिरपेक्षता, सर्व घटकांना विकासाची समान संधी ही तत्त्वे राजर्षी शाहू महाराजांनी करवीर संस्थानात अमलात आणली. म्हणूनच त्यांचा देशभरात "महाराजांचे महाराज‘ असा गौरव होतो..शाहू महाराजांना "राजर्षी" ही उपाधी कानपूरच्या कुर्मी क्षत्रिय समाजाने दिली. 
     राजर्षी शाहू महाराजांच्या राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, औद्योगिक, सांस्कृतिक व कृषी-सिंचन या सर्वच क्षेत्रांतील कार्याचा दूरगामी परिणाम केवळ कोल्हापूर परिसरावरच नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्रावर झालेला स्पष्टपणे जाणवतो. कोल्हापूर संस्थानाचे राजे असूनही त्यांनी लोकशाही पद्धतीने राज्यकारभार केला. डॉ. आंबेडकरांनी ‘सामाजिक लोकशाहीचे आधारस्तंभ’ अशा समर्पक शब्दांत राजर्षी शाहूंचे वर्णन केले आहे.
     त्यांनी १९०२ मध्ये क्रांतीचा जाहीरनामा काढला त्यात त्यांनी मागासलेल्या वर्गाना ५० % आरक्षण व राखीव जागा देण्याचा हुकुम केला .राखीव जागांचे धोरण अंमलात आणणारे राजर्षी शाहू महाराज हे भारतातील पहिले राज्यकर्त्ये ठरले .

रविवार, २४ जून, २०१८

विज्ञानकोडे भाग - १०

विज्ञानकोडे भाग - १०
अदृश्य शक्ति खगोलीय वस्तूची.
स्पर्धा लागते आकर्षित करण्याची.
परिभ्रमण आहे माझाच प्रभाव.
वस्तुमान व अंतरानुसार बदलतो स्वभाव.
फेकलेली वस्तू का येते जमिनीकडे.
न्यूटनने सोडविले सर्वप्रथम कोडे.

उत्तर - गुरुत्वाकर्षण शक्ती (Gravitational force)

ओळख मूलद्रव्यांची भाग - २५ - फॉस्फरस

ओळख मूलद्रव्यांची भाग - २५

फॉस्फरस   

आधुनिक काळात शोधलेले फॉस्फरस हे पहिले मूलद्रव्य आहे.

आधुनिक काळात शोधलेले फॉस्फरस हे पहिले मूलद्रव्य आहे. याच्या शोधाची कथा विस्मयकारक आहे. जर्मन रसायनशास्त्रज्ञ हेनिग ब्राण्ड याने फॉस्फरसचा शोध लावला. त्या वेळच्या इतर रसायनशास्त्रज्ञांप्रमाणेच ब्राण्डसुद्धा परिसाच्या शोधात होता. त्या प्रयत्नात त्याने मानवी मूत्रावर प्रयोग केले. त्यातून त्याला पांढरा फॉस्फरस वेगळा करता आला. सुमारे ११०० लिटर मूत्रापासून फक्त ६० ग्रॅम फॉस्फरस मिळाला. जर्मनीतल्या हॅम्बुर्ग शहरात १६६९ साली फॉस्फरस वेगळा करण्यात यश मिळाले. असे असले तरी फॉस्फरस हे एक मूलद्रव्य आहे हे फ्रेंच शास्त्रज्ञ अँटोनी  लॅवोझिएने १७७७ मध्ये सिद्ध केले.
पृथ्वीवरील सर्व सजीवांच्या अस्तित्वाचा महत्त्वाचा घटक असलेला फॉस्फरस, डीएनए- आरएनए यांसारखे महत्त्वाचे जैविक रेणू आणि पेशींच्या आवरणाचा एक घटक असतो. प्रौढ माणसाच्या शरीरात जवळजवळ ७०० ग्रॅम इतका फॉस्फरस असतो आणि यापैकी ८५ ते ९० टक्के हाडांमध्ये आणि दातांमध्ये असतो. कॅल्शिअमपासून दात अणि हाडे तयार होत असली तरी फॉस्फरसमुळे ती बळकट होतात. याशिवाय मानवी चेतासंस्थेद्वारे होणाऱ्या संदेशांच्या दळणवळणात फॉस्फरस महत्त्वाची भूमिका बजावतो. स्नायूंचे आकुंचन-प्रसरण होण्याकरिता फॉस्फरसची गरज असते. हृदयाच्या स्पंदनांची वारंवारिता राखण्याचे कामही फॉस्फरस करतो. सजीवांच्या चयापचयाचा एक महत्त्वाचा घटक फॉस्फरस आहे (त्यामुळेच मानवी मूत्रातून फॉस्फरस वेगळे करण्यात हेनिग ब्राण्डला यश मिळाले).ब्राण्डच्या शोधानंतर बरोबर शंभर वर्षांनी (१७६९), हाडांतील कॅल्शियम फॉस्फेट या संयुगात फॉस्फरस असतो याचा शोध लागला. लगेचच हाडांच्या भुकटीपासून फॉस्फरस वेगळा करण्याची पद्धत विकसित झाली. साधारण १८५०पर्यंत फॉस्फरस वेगळा काढण्यासाठी हाडांच्या भुकटीचाच प्रामुख्याने वापर होत होता. विजेच्या वापराला सुरुवात झाल्यानंतर रॉक फॉस्फेट या फॉस्फरसच्या खनिजापासून विद्युत भट्टीमध्ये फॉस्फरस बनविण्याची पद्धत विकसित झाली. आजही याच पद्धतीने फॉस्फरस मिळवला जातो.
एकोणिसाव्या शतकात प्रामुख्याने आगपेटीच्या उद्योगाकरिता वापरल्या जाणाऱ्या फॉस्फरसचा आज शेतीसाठी लागणारी रासायनिक खते बनविण्याकरिता सर्वाधिक उपयोग होतो. फॉस्फरसच्या ज्वलनशीलतेचा उपयोग दारूगोळा बनविण्याकरिताही केला जातो. फॉस्फरसच्या अधिक वापरामुळे, या मूलद्रव्याचा स्रोत असणारे रॉक फॉस्फेट साधारण ३० वर्षे पुरेल एवढेच उपलब्ध आहे.
किती विचित्र योगागोग पाहा, ज्या हॅम्बुर्ग शहरात फॉस्फरसचा शोध लागला तेच हॅम्बुर्ग शहर जमीनदोस्त करण्यासाठी दुसऱ्या महायुद्धात दोस्त राष्ट्रांनी फॉस्फरसपासून वापरून बनविलेल्या दारूगोळ्याचा वापर केला होता.
– योगेश सोमणमुंबई 
मराठी विज्ञान परिषदवि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२ 

दिनविशेष २५ जून

दिनविशेष २५ जून
  विल्यम हॉवर्ड स्टाइन  - रसायनशास्त्रज्ञ      जन्मदिन - २५ जुन १९११

विल्यम हॉवर्ड स्टाइन (२५ जून, इ.स. १९११, न्यू यॉर्क शहर, अमेरिका - २ फेब्रुवारी, इ.स. १९८०, न्यू यॉर्क शहर, अमेरिका) हा एक अमेरिकन रसायनशास्त्रज्ञ होता. त्याच्या जैविक रसायनशास्त्रामधील योगदानासाठी त्याला ख्रिश्चन बी. ऑन्फिन्सन व स्टॅनफर्ड मूर ह्यांच्यासोबत १९७२ सालचे रसायनशास्त्रातील नोबेल पारितोषिक मिळाले होते.


न्यू यॉर्क शहरात जन्मलेला व हार्वर्ड व कोलंबिया विद्यापीठांमधून शिक्षण घेणारा स्टाइन न्यू योर्कच्या रॉकेफेलर विद्यापीठामध्ये संशोधक होता.


सामान्यज्ञान प्रश्नसंग्रह भाग - १४

सामान्यज्ञान प्रश्नसंग्रह भाग - १४
प्रश्न-१) खालीलपैकी कोणता अधिकार लोकसभेचा महत्वाचा अधिकार मानला जातो?
उत्तर :- मंत्रीमंडळावर नियंत्रण ठेवणे

प्रश्न-२) राज्यसभेवर राष्ट्रपतींनी नियुक्त केलेले सदस्य वगळता इतर सदस्य निवडून देण्याचा अधिकार कुणाला आहे?
उत्तर :- राज्यविधानसभा

प्रश्न-३) नियंत्रक महालेखा परिक्षकाचा कार्यकाल किती वर्षाचा आहे?
उत्तर :- पाच

प्रश्न-४) संसदेच्या संसुक्त अधिवेशनाचे सभेचे अध्यक्षस्थान कोण भुषवितात?
उत्तर :- सभापती

प्रश्न-५) राष्ट्रपतील त्याच्या पदावरून दूर करण्यासाठी कोणती प्रक्रिया वापरली जाते?
उत्तर :- महाभियोग

प्रश्न-६) मराठी भाषेचे लिखाण आपण कोणत्या भाषेत करतो?
उत्तर :-  देवनागिरी

प्रश्न-७) आपल्या तोंडावाटे निघाणाऱ्या मुलंध्वनिना काय म्हणतात?
उत्तर :-  वर्ण

प्रश्न-८) मराठी भाषेत एकूण वर्ण किती?
उत्तर :-  48

प्रश्न-९) वाक्य म्हणजे काय?
उत्तर :-  विचार पूर्णपणे व्यक्त करणारा एक किंवा शब्दाचा समूह

प्रश्न-१०) मराठी भाषेत एकूण स्वर किती?
उत्तर :-  12

प्रश्न-११) भारतातील त्रिभुज प्रदेश तयार न होणारी नदी कोणती ?
उत्तर :- नर्मदा

प्रश्न-१२) जीआयएफ (GIF) चा विस्तार काय आहे ?
उत्तर :- ग्राफिक्स इंटरचेंज फॉरमॅट

प्रश्न-१३) हिमरू कला भारतातील कोणत्या राज्याशी संबंधित आहे ?
उत्तर :- कर्नाटक

प्रश्न-१४) कोणते भारतीय नृत्य 'सादिर नाच' (Sadir Dance) या नावाने प्रसिद्ध होते ?
उत्तर :- भरतनाट्यम

प्रश्न-१५) बौद्ध मठांसाठी प्रसिद्ध असलेले स्थान तवांग हे कोणत्या राज्यात आहे ?
उत्तर :- अरुणाचल प्रदेश

प्रश्न-१६) खालीलपैकी कोणते वायू जागतिक तापमान वाढीस जास्तकरून कारणीभूत आहेत?
उत्तर :- कार्बन डायऑक्साईड

प्रश्न-१७) खालीलपैकी कोणता अ-पारंपारिक ऊर्जा-स्त्रोत नाही?
उत्तर :- कोळसा

प्रश्न-१८) जैव विविधतेच्या दृष्टी अतीमहत्त्वाचे पश्चिम घाट कोणत्या राज्यामध्ये पसरलेले आहे?
उत्तर :- महाराष्ट्र – कर्नाटक – केरळ

प्रश्न-१९) खालीलपैकी कोणता प्राणी शाकाहारी आहे?
उत्तर :- हरीण

प्रश्न-२०) भरती आणि ओहोटी यांच्यावर कशाचा परिणाम होतो?
उत्तर :- चंद्राच्या कला

सौ्जन्य- तंत्रस्नेही शिक्षक समूह महाराष्ट्र

विज्ञानकोडे भाग - ९

विज्ञानकोडे भाग - ९
मी आहे गोड गोड
चिरून खातात माझी फोड
रंग माझा हिरवा पिवळा
माझ्यामुळे येतो गारवा
पिकल्यानंतर म्हणतात पाड

डेरेदार आहे माझे झाड
उत्तर - आंबा (Mango)
वैज्ञानिक स्पष्टीकरण -
आंब्याचा वृक्ष विशाल व डेरेदार असतो. या झाडापासून मिळणारे आंबा हे फळ अतिशय गोड असते. आंबा हा फळांचा राजा आहे. साधारणता उन्हाळ्यात या झाडांना फळे येतात. हापूस, केशर, तोतापूरी, दशहरी,नीलम ह्या आंबा या फळाच्या प्रसिद्ध जाती आहेत. आंबा या फळात अ जीवनसत्व असते. यामध्ये एकच बी आढळते. जेथे आंब्याची पुष्कळ झाडे असतात, त्या परिसराला आमराई असे म्हणतात. झाडावर पिकलेल्या आंब्याला पाड असे म्हणतात. कच्च्या आंब्यापासून लोणचे घालतात.
------------------------------
Like our Facebook page
--------------------------
https://www.facebook.com/noblesciencemagazine/

       ✍🏼 Writer✍🏼
SANDIP KRUSHNA JADHAO
    Chief Editor
    Noble Science
      7588090801

विज्ञान साक्षरता हाच आमचा ध्यास

ओळख मूलद्रव्यांची भाग - २४ - सिलिकॉन

ओळख मूलद्रव्यांची भाग - २४

सिलिकॉन

सिलिकॉनची संयुगे सर्वत्र विपुल प्रमाणात सापडतात.

सिलिकॉनची संयुगे सर्वत्र विपुल प्रमाणात सापडतात; वाळू, सिमेंट, चिनी-मातीची भांडी, ग्रॅनाईट, काच इत्यादी वस्तू सर्वश्रुत आहेत. आइस्क्रीम ठेवण्याच्या शीत-पेटीत तुम्ही कधी निळ्या रंगाचे खडे पाहिले आहेत का? यांना सिलिका-जेल क्रिस्टल म्हणतात, त्याचा निर्जलक म्हणून वापर होतो. पाणी शोषल्यावर त्यांचा रंग बदलतो. थोडय़ा वेगळ्या दर्जाची सिलिका-जेल ही प्रयोगशाळेत वर्णलेखी साधन   (chromatographic material)  आणि काही अभिक्रियांमध्ये उत्प्रेरक म्हणून नियमितपणे वापरली जाते. सिलिकॉन (Silicone), अर्थात पॉलिसिलोक्झेन्सही निष्क्रिय बहुवारिके (Inert polymers) असून सिलिकॉन, ऑक्सिजन आणि कार्बनी समूह यांपासूनच ती बनलेली असतात. मानवी शरीरास या सिलिकॉनशी कोणतेही वावडे (allergy) नसल्याने अथवा शरीर कोणतीही प्रतिक्रिया दर्शवीत नसल्याने याचे मानवी शरीरात आरोपण सुरक्षित मानले जाते. इलेक्ट्रॉनिक वस्तू आणि संगणकामध्ये सिलिकॉन चिप्सचा सर्रास वापर आहे. कॅलिफोíनयामधील सॅन फ्रॅन्सिस्कोच्या उपनगरात दाटीवाटीने असलेल्या अत्याधुनिक इलेक्ट्रॉनिक उद्योगांमुळे हा परिसर ‘सिलिकॉन व्हॅली’ या नावाने प्रसिद्ध आहे. हे बारसं केलं डॉन हिफ्लर या पत्रकाराने- १९७१ साली!
कार्बन, जम्रेनियम, टीन अन् लेड या अन्य भागीदारांसमवेत सिलिकॉन (Si) हे आवर्त सारणीतील गण १४ मध्ये मोडते. १४ अणुक्रमांक असलेल्या कार्बनच्या अगदी जवळचे हे मूलद्रव्य. कार्बन-संयुगे ही जीवमात्रांचा कणा समजला तर कार्बनचं हे पाठराखी भावंडदेखील मानवासाठी उपयुक्त, खरे तर कमालीचे उपयुक्त असे मूलद्रव्य आहे. सिलिकॉन अन् त्याची संयुगे ही आपल्या दैनंदिन जीवनात हरप्रकारे आपल्या दिमतीस असतात -काहींचा उल्लेख वर केला आहेच.कार्बनप्रमाणे सिलिकॉनची अपरूपे ज्ञात नाहीत. सिलिका, सिलिकेट-गारगोटी, चिकणमाती – साधारणपणे या स्वरूपातच ते बहुतांश आढळते. ऑक्सिजनशी याचा तीव्र-बंध असल्याने सिलिकॉन ऑक्सिजनपासून वेगळे करणे महत्कठीण! सिलिकॉनच्या शोधाचे श्रेय जॉन जेकब बर्झेलिएस या स्वीडिश शास्त्रज्ञाकडे जाते. ह्य़ाने १८२३ मध्ये पोटॅशियम फ्लुओरोसिलिकेटमधून सिलिकॉन मूलद्रव्य वेगळे केले. कार्बनप्रमाणेच सिलिकॉनदेखील चतरुसयुजा दर्शविते आणि मुख्यत्वे सहसंयुज बंध तयार करते. तथापि, त्याची क्रियाशीलता मात्र कार्बनपेक्षा कमी असते. सिलिकॉन आकाराने मोठे असल्याने कार्बनप्रमाणे ppp πppp πअसा द्विबंध तयार करू शकत नाही; ते त्याच्या  कक्षिकेसोबत  ppp πppp π  असा द्विबंध तयार करते.
– डॉ. अनिल कर्णिक
मराठी विज्ञान परिषद,
वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२ 

दिनविशेष २४ जून

दिनविशेष २४ जून
शुमाकर लेव्ही-९ या धुमकेतुचा शोध

जन्मदिन - २४ जुन १९२९

Carolyn Jean Spellmann Shoemaker (born June 24, 1929) is an American astronomerand is a co-discoverer of Comet Shoemaker–Levy 9. She once held the record for most comets discovered by an individual.
Carolyn Shoemaker is credited by the Minor Planet Center with the discovery of 377 numbered minor planets made between 1980 and 1994.