सुस्वागतम! सुस्वागतम!! सर्व सन्माननीय शिक्षणप्रेमी वाचक बंधु भगिनींचे आश्रमशाळा शिक्षकमित्र या शैक्षणिक ब्लॉगवर आपले हार्दिक स्वागत आहे

शुक्रवार, २० जुलै, २०१८

विज्ञान कोडे भाग - ३६

विज्ञान कोडे भाग - ३६
हवेतील ओलावा मोजतो मी, 
पावसाचा अंदाज सांगतो मी
गरजेनुसार वापर विविध प्रकाराचा, 
मार्गदर्शक आहे औद्योगिक प्रक्रियेचा
हवेतील आर्द्रतेवर बाष्पीभवनाचा वेग, 
प्रसरण पावतो जोडलेला केस

उत्तर- आर्द्रतामापी  (Hygrometer)

Like our Facebook page

     🏼 लेखक 🏼
SANDIP KRUSHNA JADHAO
    Chief Editor
    Noble Science
      7588090801
विज्ञान साक्षरता हाच आमचा ध्यास



ओळख मूलद्रव्यांची भाग - ५२ - निओबिअम

ओळख मूलद्रव्यांची भाग - ५२

निओबिअम – जुळ्यांचे दुखणे

१८०२मध्ये एकबर्ग या स्वीडनच्या शास्त्रज्ञास स्कँडेनेव्हियात सापडलेल्या खनिजांमध्ये एक नवीन मूलद्रव्य सापडले.

सतराव्या शतकाच्या मध्यावर कोलंबिया नदीच्या पात्रात काळसर रंगाचे सोनेरी छटा असणारे वजनदार असे एक खनिज मिळाले. इतर नमुन्यांबरोबर लोहयुक्त खनिज म्हणून ते ब्रिटिश वस्तुसंग्रहालयाकडे पाठवण्यात आले. हे खनिज कोलंबाइट म्हणून ओळखले जाऊ लागले. तब्बल १५० वर्षांनंतर १८०१मध्ये चार्ल्स हँचेटचे या खनिजाकडे लक्ष गेले. याचा अभ्यास करताना लोहाबरोबर यात मँगनिज आणि ऑक्सिजनही सापडले. याशिवाय एक अज्ञात मूलद्रव्यही या खनिजात असल्याचे हँचेटला आढळले. या मूलद्रव्याचे नाव हँचेटने कोलंबिअम असे केले.१८०२मध्ये एकबर्ग या स्वीडनच्या शास्त्रज्ञास स्कँडेनेव्हियात सापडलेल्या खनिजांमध्ये एक नवीन मूलद्रव्य सापडले. ग्रीक पुराणकथेचा आधार घेऊन त्याला टँटॅलम हे नाव देण्यात आले. या टँटॅलमचे आणि कोलंबिअमचे बरेच गुणधर्म सारखे होते. बर्झेलिअससह अनेक रसायनशास्त्रज्ञांना वाटले एकाच मूलद्रव्यावर दोन ठिकाणी संशोधन चालू आहे. काही काळानंतर बर्झेलिअसला आपल्या निष्कर्षांबद्दल शंका आली आणि त्यांनी आपल्या शिष्याला, फ्रेडरिक वोलरला पत्राद्वारे आपली शंका कळविली आणि पुढील संशोधन करण्यास सांगितले. वोलरलाही या दोन मूलद्रव्यांचे नाते कळले नाही.अखेर १८४४मध्ये हेंरिक रोझ या जर्मन रसायनशास्त्रज्ञाला हा उलगडा झाला. कोलंबाइट या खनिजात टँटॅलम आणि कोलंबिअम ही दोन मूलद्रव्ये असल्याचे त्याने सिद्ध केले. ग्रीक पुराणाचा आधार घेत कोलंबिअमला निओबिअम हे नाव देण्यात आले. टँटॅलम आणि कोलंबिअम या जुळ्यांचे गुणधर्म सारखे असल्यामुळे यांचे औद्योगिक उत्पादन दीर्घकाळ लांबले. १८६६मध्ये स्विस रसायनशास्त्रज्ञ जे. सी. गॅलिअर्ड द मेरिग्नॅक याला या जुळ्यांना वेगळं करण्याची औद्योगिक रीत मिळाली. निओबिअम धातूस्वरूपात मिळविण्यासाठी असलेली प्रक्रिया थोडी किचकट स्वरूपाची आहे. पोलादात निओबिअम मिसळल्यास त्याची तन्यता आणि गंजरोधकता वाढते. अणुभट्टीत झिर्कोनिअमबरोबर त्याचा वापर होतो. झिर्कोनिअमचे न्युट्रॉन शोषकता, उच्च वितळणिबदू तसेच उष्णता रोधकता हे सारे गुणधर्म निओबिअममध्ये आहेत. याशिवाय एक महत्त्वाचा गुणधर्म म्हणजे निओबिअम हा वायू शोषक आहे. निर्वात इलेक्ट्रॉन नळ्या करताना या गुणधर्माचा उपयोग होतो. नळ्या निर्वात करताना काही वायू शिल्लक राहिला तरी नळ्यांवर अल्पसे निओबिअमचे आवरण असले तरी ते उरलासुरला वायू शोषून घेऊन नळ्या निर्वात करतो.
– अनघा अमोल वक्टे
मराठी विज्ञान परिषदवि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२ 

दिनविशेष २१ जुलै

दिनविशेष २१ जुलै
अँलन शेपर्ड - अंतराळ प्रवास करणारा जगातील दुसरा व अमेरिकेचा पहिला व्यक्ती
स्मृतिदिन - २१ जुलै, १९८८
ॲअँलन बार्टलेट शेपर्ड, ज्युनिअर (१८ नोव्हेंबर, इ.स. १९२३ - २१ जुलै, १९८८) हा अमेरिकेच्या नौसेनेचा वैमानिक, नासाचा अंतराळवीर व व्यवसायिक होता. इ.स. १९६१मध्ये अंतराळ प्रवास करणारा जगातील दुसरा व अमेरिकेचा पहिला व्यक्ती बनला जेव्हा प्रोजेक्ट मर्क्युरी अंतराळयान केवळ अंतराळात जाऊन परतले. दहा वर्षांनंतर, वयाच्या ४१व्या वर्षी तो अपोलो १४ यानावरील दलनायक होता व त्याने लँडर चंद्रावर अचूकरित्या उतरवले. तो या मोहिमेत वयाने सर्वात मोठा होता. तो चंद्रावर चालणारा पाचवा मनुष्य होता.
Image may contain: 1 person, smiling

विज्ञान कोडे भाग - ३५

विज्ञान कोडे भाग - ३५
कळपात राहतो जंगल माझे घर, 
शिंगे असणारा ओळखावा नर
शिंगांच्या वैशिष्ट्यावरून ठरते माझी जात, 
धावतांना करतो सर्वांवर मात
खुरे पायाला शाखा माझ्या शिंगाला, 
अन्न म्हणून खातो झाडपाला गवताला,
ओळखा पाहू मी आहे कोण?


उत्तर- हरीण (Deer)

Like our Facebook page

     🏼 लेखक 🏼
SANDIP KRUSHNA JADHAO
    Chief Editor
    Noble Science
      7588090801
विज्ञान साक्षरता हाच आमचा ध्यास

ओळख मूलद्रव्यांची भाग - ५१ - झिर्कोनिअम

ओळख मूलद्रव्यांची भाग - ५१

झिर्कोनिअम

हिरा, माणिक याप्रमाणेच झिरकॉन या खनिजालाही अलेक्झांडरच्या काळापासून मौल्यवान खडय़ाचा मान होता.

हिरा, माणिक याप्रमाणेच झिरकॉन या खनिजालाही अलेक्झांडरच्या काळापासून मौल्यवान खडय़ाचा मान होता. त्याच्या सोनेरी, नारिंगी आणि गुलाबी छटेमुळे तो मौल्यवान समजला जात असे. प्रसिद्ध जर्मन रसायनशास्त्रज्ञ मार्टनि हेन्रिक क्लॅपरॉथ यांना १७८९ मध्ये झिरकॉन खनिजाचे पृथक्करण करताना झिरकॉनिअम या मूलद्रव्याचा शोध लागला. अरबी शब्द झरकन म्हणजे सोनेरी या शब्दावरून या मूलद्रव्याचे नामकरण झाले. १८२४ मध्ये जॉन्स बर्झिलिअसने प्रथमच धातुरूप झिर्कोनिअम मिळविण्यात यश मिळविले. मात्र उपयोगात आणण्यासाठी या धातूला अनेक दशके वाट पाहावी लागली.झिर्कोनिअम नेहमीच हाफ्निअम या त्याच्या जोडीदाराबरोबर सापडतो. या जोडगोळीत बऱ्याचदा हाफ्निअमचेच प्रमाण जास्त आढळते. पोलादाप्रमाणे दिसणारा झिर्कोनिअम, पोलादापेक्षा मजबूत आणि अधिक तन्यता असणारा तसेच न गंजणारा धातू आहे. दाहक रसायनांचा झिर्कोनिअमवर परिणाम होत नाही. पोलादात मिसळल्याने या संमिश्राच्या गुणधर्मात वाढ होते. झिर्कोनिअमच्या या गुणधर्मामुळे मेंदूच्या शस्त्रक्रियेत वापरला जाणारा दोरा आणि शस्त्रक्रियेची हत्यारे यासाठी झिर्कोनिअमची संमिश्रे वापरली जातात.१७८९ मध्ये क्लॅपरॉथने आणखी एका महत्त्वाच्या मूलद्रव्याचा शोध लावला होता, ते मूलद्रव्य होतं युरेनिअम. सुमारे १५० वर्षांनंतर क्लॅपरॉथने शोधलेली युरेनिअम आणि झिरकोनिअम ही दोन मूलद्रव्ये एकत्र आली ती अणुभट्टीमध्ये. अणुभट्टीमध्ये इंधन म्हणून वापरत असलेल्या युरेनिअमच्या कांडय़ावरील आवरण म्हणून झिर्कोनिअमचा वापर होतो. झिर्कोनिअममधून न्यूट्रॉन अगदी सहजरीत्या जाऊ शकतात. याशिवाय झिर्कोनिअमचा वितळणांक उच्च म्हणजेच १८५० अंश सेल्सिअस असून ते अणुभट्टीतील तापमान रोखणारे (उष्णतारोधक) आहे. फक्त समस्या एवढीच की, यासाठी शुद्ध झिर्कोनिअम वापरावे लागते. जरा जरी हाफ्निअम यात असले तर ते झिरकोनिअमच्या विरुद्ध गुणधर्म दाखवत न्यूट्रॉन्सला अडवण्याचे काम करते.झिर्कोनिअमची संयुगे रेनकोटांवर दिल्या जाणाऱ्या थरांमध्ये वापरली जातात, ज्यामुळे रेनकोट जलरोधक बनतात. छपाईची रंगीत शाई, वॉर्निश यामध्येही झिर्कोनिअमची संयुगे वापरली जातात.झिर्कोनिअमची उपयुक्तता लक्षात आल्यावर १९४९-१९५९ या काळात झिर्कोनिअमचे उत्पादन वाढले. इतर खनिजे काढताना निघणारा कचरा आणि झिरकॉनयुक्त वाळूचा वापर करून झिर्कोनिअम मिळविण्यात आले. कॅलिफोíनयाच्या नदीपात्रातील गाळ उपसण्यात आला आणि यातूनही झिर्कोनिअम मिळविण्यात आले. युद्धकाळात भूमध्य समुद्राच्या किनारी प्रदेशात क्रोमाइटसाठी केलेल्या उत्खननात मिळालेले झिरकॉन तसेच पडून होते. झिर्कोनिअमची उपयुक्तता कळल्यावर मात्र या ढिगाऱ्याला सोन्याचे दिवस आले.
– अनघा अमोल वक्टे
मराठी विज्ञान परिषद,
वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२ 

दिनविशेष २० जुलै

दिनविशेष २० जुलै
अपोलो ११ - चांद्रयान
२० जुलै १९६९ रोजी चंद्रावर उतरले
अपोलो मोहीम ही चंद्रावरील पहिली मोहीम होती. (इ.स. १९६१ - इ.स. १९७५) यातील अपोलो ११ मोहिमेमध्ये जुलै २० इ.स. १९६९ रोजी नील आर्मस्ट्राँग यांनी चंद्रावर सर्वात प्रथम पाऊल ठेवले.अपोलो ११ यानातून चंद्रावर नील आर्मस्ट्राँग व एडविन आल्ड्रिन यांनी ४० वर्षांपूर्वी, २० जुलैला चंद्रावर प्रथम पाऊल ठेवले. २० जुलै १९६९ रोजी हे यान चंद्रावर पोचले. नील आर्मस्ट्राँगने चंद्रावर पाऊल ठेवले त्यासाठी एका लहान उपयानातून तो प्रवास केला होता. या यानाला लुनार मोड्युओओल असे म्हणत असत. पृथ्वीवरून चंद्रापर्यंत नेणारे मुख्य यान चंद्राभोवती फिरत राहिले होते. या यानाला कमांड मोड्यूल असे म्हणत. चंद्रावर उतरणार्‍या यानाला अलगदपणे खाली उतरणे आणि पुन्हा उड्डाण करून मुख्य यानापर्यंत जाऊन मिळणे यासाठी लागणारे इंधन व दळवळणाची व्यवस्था त्यात केलेली होती. चंद्रावर पोहोचताच ‘ह्य़ूस्टन, ट्रँक्विलिटी बेस हिअर, इगल हॅज लॅन्डेड’ हा चंद्रावरून आलेला संदेश जगभर दूरचित्रवाणी आणि रेडिओवरून दिला

सामान्यज्ञान प्रश्नसंग्रह भाग - २९

सामान्यज्ञान प्रश्नसंग्रह भाग - २९
प्रश्न-१) बंगालमध्ये दुहेरी राज्य व्यवस्थेचा निर्माता कोण होता?
उत्तर :-  रॉंबरट क्लाईव्ह

प्रश्न-२) बंगालचा (भारताचा) पहिला गव्हर्नर कोण होता?
उत्तर :-  रॉंबरट क्लाईव्ह

प्रश्न-३) बंगालचा (भारताचा) शेवटचा गव्हर्नर कोण होता?
उत्तर :-  वार्न हेस्टीग्ज

प्रश्न-४) भारतात वृत्तपत्राचा प्रारंभ कधी आणि कोण्या गव्हर्नर जनरलच्या काळात झाला?
उत्तर :-  वार्न हेस्टीग्ज / 1772 ते 1773

प्रश्न-५) भारताचा पहिला गव्हर्नर जरळ कोण होता:
उत्तर :-  वार्न हेस्टीग्ज

प्रश्न-६) I.T. ही शाखा म्हणजे __
उत्तर :- Information Communication Technology

प्रश्न-७) IBM ह्या कंपनीच्या Artificial Technology वर आधारित _या Chess Program ने garry kasparov या बुद्धिबळ पटूस मात दिली होती.
उत्तर :- Deep Blue

प्रश्न-८) इंदिरा पॉइंट काय आहे ?
उत्तर :- भारताचे दक्षिण टोक

प्रश्न-९) 127.0.0.1 ह्या I.P Address ला __ I.P Address म्हणतात.
उत्तर :- Loop Back

प्रश्न-१०) Java Script हे product या कंपनीचे आहे.
उत्तर :- Net Scape

प्रश्न-११) लावी जत्रा भारतातील कोणत्या राज्यात भरते?
उत्तर :-  हिमाचल प्रदेश

प्रश्न-१२) महात्मा गांधी यांनी नामकरण केलेल्या महाराष्ट्रातील सेवाग्राम या गावाचे मुळ नाव कोणते?
उत्तर :-  शेगाव

प्रश्न-१३) फिग्रीन ऑफ गोरा देव' ही कोणत्या भारतीय प्रदेशातील कला आहे?
उत्तर :-  (tribal horse God) ... गुजरात

प्रश्न-१४) जे लोक कॉंग्रेसवर वार करतात आणि नेहरूंना अभय देतात, ते मुर्ख आहेत. त्यांना राजकारण कळत नाही' हे वाक्य कोणी म्हटले होते?
उत्तर :-  डॉ. बी.आर. आंबेडकर

प्रश्न-१५) कोणते सॉफ्टवेअर वापरल्यास उच्चस्तरीय कॉम्प्युटर भाषेस एक्झिक्युटेबल मशीन इन्स्ट्रक्शन्स मध्ये बदलता येते?
उत्तर :-  कंपायलर

प्रश्न-१६) संघीय शासन व्यवस्थेमध्ये ----------- -
उत्तर :- सत्तेचे विकेंद्रीकरण केलेले असते

प्रश्न-१७) घटना समितीचे हंगामी अध्यक्ष म्हणून कुणाची निवड करण्यात आली होती?
उत्तर :- लॉर्ड सचिन्द्रनाथ सिन्हा

प्रश्न-१८) केंद्रीय लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष आपला राजीनामा ---------- नावे देतात
उत्तर :- राष्ट्रपती

प्रश्न-१९) हे भारताचे 29 वे राज्य बनले?
उत्तर :- तेलगणा

प्रश्न-२०) घटन समितीने राष्ट्रध्वज कोणत्या दिवशी राष्ट्राला अर्पण केला?
उत्तर :- 14 ऑगस्ट 1947

सौजन्य - तंत्रस्नेही शिक्षक समूह, महाराष्ट्र

विज्ञान कोडे भाग - ३४

विज्ञान कोडे भाग - ३४
वृक्षवासी प्राणी शेपूट गोंडेदार, 
कृतक आहे माझा परिवार.
चाहूल लागताच जाते पळून, 
तात्पुरते अन्न तोंडात साठवून.
बीया फळे फुले आहे माझे अन्न, 
घरट्यात देते पिलांना जन्म. 
ओळखा पाहू मी आहे कोण?

उत्तर- खार / खारूताई (Squirrel)

Like our Facebook page

     🏼 लेखक 🏼
SANDIP KRUSHNA JADHAO
    Chief Editor
    Noble Science
      7588090801
विज्ञान साक्षरता हाच आमचा ध्यास

ओळख मूलद्रव्यांची भाग - ५० - इट्रिअम

ओळख मूलद्रव्यांची भाग - ५०

इट्रिअम

जॉन गॅडोलीनला १७८९मध्ये गाडोलीनाइट खनिजाचे विश्लेषण करताना इट्रिअमचा शोध लागला.

 

जॉन गॅडोलीनला १७८९मध्ये गाडोलीनाइट खनिजाचे विश्लेषण करताना इट्रिअमचा शोध लागला. स्विडनच्या इटर्बीनामक छोटय़ा नगरीवरून चार मूलद्रव्यांना नावे मिळाली त्यापकीच एक, संक्रमण धातूंच्या दुसऱ्या श्रेणीतील पहिले मूलद्रव्य – इट्रिअम! चंदेरी रंगाचे हे मूलद्रव्य रासायनिकदृष्टय़ा मात्र लँथेनाइड गणातील मूलद्रव्यांशी साधम्र्य दाखवते. इट्रिअम निसर्गात मुक्त स्वरूपात आढळत नसून नेहमी इतर दुर्मीळ मृदा खनिजांबरोबर आढळते. अपोलो अभियानाच्या मोहिमेत चंद्रावरील खडकात इट्रिअम विपुल प्रमाणात आढळले होते.इट्रिअमवर ऑक्सिडेशनमुळे एक संरक्षक थर तयार होतो, ज्यामुळे सामान्य तापमानाला त्याच्यावर हवेचा परिणाम होत नाही, परंतु उच्च तापमानाला मात्र त्याचे ऑक्सिडीकरण होऊ शकते. ४०० अंश सेल्सिअस तापमानाला चुऱ्याच्या स्वरूपातील इट्रिअम पेट घेऊ शकते.इट्रिअम ऑक्साइड या संयुगाचे अनेक उपयोग आहेत. रंगीत दूरचित्रवाणी संचाच्या टय़ूबसाठी लागणाऱ्या लाल फॉस्फरसच्या निर्मितीमध्ये त्याचा उपयोग केला जातो. अ‍ॅल्युमिनिअम व मॅग्नेशिअमच्या संमिश्रात मजबुतीकरणासाठी इट्रिअम मिसळतात. धातू हे उष्णतेचे उत्तम वाहक असतात, परंतु अ‍ॅल्युमिनिअम, इट्रिअम व क्रोमिअम यांचे संमिश्र मात्र उष्णतेचे रोधक म्हणून कार्य करते. काचेला उष्णता व शॉक रोधक करण्यासाठी याचा उपयोग केला जातो. अशी काच कॅमेराच्या लेन्समध्ये वापरतात. सुपरकंडक्टर्समधील वाहकात, उत्प्रेरकाच्या निर्मितीसाठी व काचेला पॉलिश करण्यासाठी इट्रिअम योग्य असल्याचे आढळले आहे. मायक्रोवेव्ह फिल्टर्समध्ये इट्रिअम व लोह यांचे गान्रेट तर विविध प्रकारच्या कृत्रिम व हिरा सदृश रत्नांसाठी इट्रिअम व अ‍ॅल्युमिनिअम गान्रेट वापरले जाते, तसेच दागिन्यातील झिर्कोनियाचा घन आकार अबाधित राहावा म्हणूनही इट्रिअम वापरतात.पर्यावरणातील इट्रिअमच्या वाढीव प्रमाणास मुख्यत: पेट्रोल शुद्धीकरणाचे उद्योगधंदे कारणीभूत असले तरी इतर कारणांचा प्रभाव दिसून येतो. घरगुती वापराच्या अनेक वस्तूत इट्रिअम असते उदा. रंगीत दूरचित्रवाणी संच, विजेची बचत करणारे दिवे, फ्लोरोसेंट दिवे इत्यादी. दिवसेंदिवस त्याचे नवनवीन उपयोग प्रकाशात येत आहेत. याचा गंभीर परिणाम पर्यावरणावर होताना दिसतो. निकामी झालेल्या या वस्तूंची विल्हेवाट शास्त्रोक्त पद्धतीने न करता कचऱ्यात टाकून देण्याच्या प्रवृत्तीमुळे पाण्याचे स्रोत, जमीन व हवेच्या प्रदूषणात वाढ होताना दिसते. वेळीच पाऊल न उचलल्यास भविष्यात मानवाला आणि प्राण्यांना दुष्परिणाम भोगावे लागतील.
– श्रीमती मीनल टिपणीस
मराठी विज्ञान परिषद,
वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२ 

दिनविशेष १९ जुलै

दिनविशेष १९ जुलै
जयंत विष्णू नारळीकर - भारतीय खगोलशास्त्रज्ञ व लेखक
जन्म - जुलै १९, १९३८
Image may contain: 1 person
नारळीकरांचा जन्म कोल्हापूर येथे जुलै १९, १९३८ रोजी झाला. त्यांचे वडील, रँग्लर विष्णू वासुदेव नारळीकर हे एक प्रसिद्ध गणितज्ञ, वाराणसी येथील बनारस हिंदू विद्यापीठाच्या गणित विभागचे प्रमुख होते. त्यांची आई सुमती विष्णू नारळीकर ह्या संस्कृत विदुषी होत्या. जयंत नारळीकरांचे शालेय शिक्षण वाराणसी येथे झाले. इ.स. १९५७ साली त्यांनी विज्ञानाची पदवी (B.Sc.) प्राप्त केली.या परीक्षेत त्यांनी प्रथम क्रमांक पटकावला. त्यानंतर उच्च शिक्षणासाठी ते ब्रिटनमधील केंब्रिज येथे गेले. तेथे त्यांना बीए, एमए व पीएचडी च्या पदव्या मिळाल्या. शिवाय, रँग्लर ही पदवी, खगोलशास्त्राचे टायसन मेडल व इतर अनेक बक्षिसे मिळाली. १९६६ साली नारळीकर यांचा विवाह मंगला सदाशिव राजवाडे (गणितज्ञ) ह्यांच्याशी झाला. त्यांना तीन मुली आहेत - गीता, गिरिजा व लीलावती. १९७२ साली ते भारतात परतले. त्यांनी मुंबई येथील टाटा मूलभूत संशोधन संस्थेच्या (टी.आय.एफ.आर.) खगोलशास्त्र विभागात प्रमुख म्हणून पद स्वीकारले. १९८८ साली त्यांची पुणे येथील आयुका संस्थेचे संचालक म्हणून नियुक्ती झाली. डॉ. नारळीकर यांच्या पत्‍नी मंगला नारळीकर ह्या ’नभात हसते तारे’ या पुस्तकाच्या सहलेखिका आहेत. ’पाहिलेले देश भेटलेली माणसं’ हे त्यांनी स्वतंत्रपणे लिहिलेले पुस्तक आहे.
संशोधन
स्थिर स्थिती सिद्धान्त
चार दशकांहून अधिक कालावधीपासून त्यांचे खगोलभौतिकी क्षेत्रात संशोधन सुरू आहे. त्याच बरोबर सतत पुस्तके लिहिण्याचा कार्यक्रमही चालू आहे. सामान्य माणसाला खगोलशास्त्र समजवण्यासाठी त्यांनी गेली अनेक वर्षे प्रयत्‍न केले आहेत. यासाठी सर्व प्रसारमाध्यमांचा ते उपयोग करतात. त्यांच्या 'यक्षांची देणगी' या पहिल्याच पुस्तकाला महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार मिळाला आहे.
साहित्यातील भर
विविध मराठी नियतकालिकांतून जयंत नारळीकर सातत्याने विज्ञानचिषयक माहितीने भरलेले ललित लेखन प्रसिद्ध होत असते. नारळीकरांच्या पुस्तकांची जगांतील अनेक भाषांत रूपांतरे झाली आहेत.
विज्ञानकथा पुस्तके
अंतराळातील भस्मासुर अभयारण्य टाइम मशीनची किमया प्रेषित यक्षांची देणगी याला जीवन ऐसे नाव वामन परत न आला व्हायरस
इतर विज्ञानविषयक पुस्तके
आकाशाशी जडले नाते गणितातील गमतीजमती युगायुगाची जुगलबंदी गणित अन्‌ विज्ञानाची (आगामी) नभात हसरे तारे (सहलेखक : डॉ. अजित केंभावी आणि डॉ. मंगला नारळीकर) विज्ञान आणि वैज्ञानिक विज्ञानगंगेची अवखळ वळणे विज्ञानाची गरुडझेप विश्वाची रचना विज्ञानाचे रचयिते सूर्याचा प्रकोप Facts And Speculations In Cosmology (सहलेखक : Geoffrey Burbidge) Seven Wonders Of The Cosmos
आत्मचरित्र
चार नगरांतले माझे विश्व
पुरस्कार
१९६५मध्ये त्यांना पद्मभूषण पुरस्कार मिळाला. २००४मध्ये त्यांना पद्मविभूषण पुरस्कार मिळाला. २०१०मध्ये त्यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार मिळाला. त्यांना भटनागर पुरस्कार आणि एम. पी. बिरला हे पुरस्कारही मिळाले आहेत. २०१४साली मिळालेला तेनाली (हैदराबाद) येथील नायुद‍अम्मा ट्रस्टचा डॉ. वाय. नायुद‍अम्मा स्मृती पुरस्कार-२०१३ जयंत नारळीकर यांच्या आत्मचरित्राला दिल्लीच्या साहित्य अकादमीचा २०१४ सालचा पुरस्कार मिळाला आहे. ’यक्षाची देणगी’ या पुस्तकाला महाराष्ट्र सरकारचा पुरस्कार अमेरिकेतील फाउंडेशनतर्फे दिला जाणारा साहित्यविषयक जीवनगौरव पुरस्कार (२०१२)
चरित्र
डॉ. विजया वाड यांनी डॉ. नारळीकर यांचे ’विज्ञान यात्री डॉ.जयंत नारळीकर’ या नावाचे चरित्र लिहिले आहे.

सामान्यज्ञान प्रश्नसंग्रह भाग - २८

सामान्यज्ञान प्रश्नसंग्रह भाग - २८
प्रश्न-१) सकाळी उठून कोणते पाणी प्यावे?
उत्तर :- थोड़े हल्के गरम पाणी.

प्रश्न-२) पिण्याचे पाणी कसे प्यावे?
उत्तर :- घोट-घोट व खाली बसून प्यावे.

प्रश्न-३) जेवण किती वेळा चावून खाणे योग्य आहे?
उत्तर :- 32 वेळा.

प्रश्न-४) पोट भरून जेवण केव्हा करावे?
उत्तर :- सकाळी.

प्रश्न-५) सकाळचा नाश्ता केव्हा पर्यन्त खाऊ शकता?
उत्तर :- सूर्य उगवण्याच्या अडीच तासापर्यन्त.

प्रश्न-६) फार्मूला वन फोर्स इंडिया संघाचे मालक कोण आहे?
उत्तर :-  विजय मल्ला

प्रश्न-७) YCMOU ची स्थापना कोणत्या वर्षी झाली?
उत्तर :-  1989

प्रश्न-८) धर्म, जात, वंशाचा भेदभाव न करता कोणत्या भारतीय राज्यात कुटुंबाशी संबंधीत पोर्तुगाली आचार संहितेवर आधारित कायदे अमलात आणले जातात?
उत्तर :-  गोवा

प्रश्न-९) मुलींचा जन्मदर वाढविण्यासाठी महाराष्ट्र शासन कोणती योजना राबवित आहे?
उत्तर :-  सुकन्या

प्रश्न-१०) नवी दिल्ली येथील ऐजाबाद बाग सध्या कोणत्या नावाने ओळखली जाते?
उत्तर :-  शालीमार गार्डन

प्रश्न-११) भारतीय श्रम संमेलनचे 43 वे अधिवेशन हे कोठे पार पडले?
उत्तर :-  नवी दिल्ली

प्रश्न-१२) शांघाय सहयोग संस्था (एससीओ) चे शिखर संमेलन कोणे पार पडले?
उत्तर :-  ताजिकिस्थान

प्रश्न-१३) 16 नोव्हेंबर 2010 रोजी भारतीय नियंत्रक व महालेखापाल समिती (कॅग)ला किती वर्षे पूर्ण झाली?
उत्तर :-  150 वर्षे

प्रश्न-१४) ‘कोन बनेगा करोडपती’मध्ये महिलांमध्ये एक करोड रुपये जिंकणारी पहिली महिला कोण?
उत्तर :-  राहत तस्लीम

प्रश्न-१५) भारतीय रुपयाना देण्यात आलेला नवीन ओळख याची रचना कोणी केली?
उत्तर :-  डी उदयकुमार

प्रश्न-१६) पुणे सार्वजनिक सभेची स्थापना कोणी केली?
उत्तर :-  गणेश वासुदेव जोशी

प्रश्न-१७) भारताच्या फाळणीची योजना कुणी जाहीर केली?
उत्तर :-  लॉर्ड माउंट बॅटन

प्रश्न-१८) मद्रास महाजन सभेची स्थापना कोणत्या वर्षी झाली?
उत्तर :-  1884

प्रश्न-१९) भारतीय राष्ट्रीय काँग्रेस च्या पहिल्या अधिवेशनास किती प्रतिनीधी हजर होते?

उत्तर :-  72

सौजन्य - तंत्रस्नेही शिक्षक समूह, महाराष्ट्र

विज्ञान कोडे भाग - ३३

विज्ञान कोडे भाग - ३३
आकाशस्त वस्तूचे झाकले जाणे, 
अडविली जातात सूर्य किरणे.
खेळ आहे सर्व सावलीचा, 
एका रेषेत आलेल्या त्रिकुटाचा
सूर्यबिंबाला वेढनारा प्रकार. 
बदलत जातो माझा आकार, 
ओळखा पाहू मी आहे कोण?

उत्तर- ग्रहण (Eclipse)

Like our Facebook page

     🏼 लेखक 🏼
SANDIP KRUSHNA JADHAO
    Chief Editor
    Noble Science
      7588090801
विज्ञान साक्षरता हाच आमचा ध्यास

ओळख मूलद्रव्यांची भाग - ४८ - स्ट्रॉन्शिअम

ओळख मूलद्रव्यांची भाग - ४८

स्ट्रॉन्शिअम

ध्वनिप्रदूषणामुळे आवाज करणाऱ्या फटाक्यांचा वापर कमी झाला

ध्वनिप्रदूषणामुळे आवाज करणाऱ्या फटाक्यांचा वापर कमी झाला असला तरी उत्सवप्रसंगी होणाऱ्या फटाक्यांच्या आतषबाजीमध्ये आकाशात विविध रंगांची उधळण होते. या रंगांमध्ये किरमिजी लाल रंगाची जी उधळण होते ती स्ट्रॉन्शिअममुळे! प्रयोगशाळेत धातूंच्या विश्लेषणात ओळख पटवण्यासाठी वापरण्यात येणारी अत्यंत सोपी पण खात्रीलायक पद्धत म्हणजे फ्लेम टेस्ट (ज्योतीचा रंग तपासणे). यात वैशिष्टय़पूर्ण म्हणजे, धातूला उष्णता दिली असता मिळणाऱ्या ज्योतीला विशिष्ट रंग असतो.अडेर क्रॉफर्ड व विल्यम क्रुकशांक यांना १७९०मध्ये स्कॉटलंडमधील स्ट्रॉनरिन खेडय़ातील शिशाच्या खाणीत; विदराईट खनिजात नवीन मूलद्रव्य असल्याचे जाणवले व त्याचे नामकरण त्यांनी स्ट्रॉन्शिअम असे केले. तोपर्यंत त्याला बेरियम समजण्यात येई. विद्युतविघटनाने स्ट्रॉन्शिअम क्लोराइड व मक्र्युरिक ऑक्साईडच्या मिश्रणातून स्ट्रॉन्शिअमला वेगळे करण्याचे श्रेय हंफ्री डेव्हीला जाते, मात्र त्यासाठी १८०८पर्यंत थांबावे लागले.मऊ, चंदेरी रंगाचा स्ट्रॉन्शिअम, अल्कली मृदा धातू प्रकारातील असून त्याची मुख्य खनिजे सेलेस्टाईन व स्ट्रॉन्शिअनाईट (celestine U strontianite) आहेत. अत्यंत क्रियाशील असल्याने निसर्गात तो मुक्त स्वरूपांत आढळत नाही. हवेशी संपर्क येताच ऑक्सिडेशनमुळे त्याच्या पृष्ठभागावर पिवळ्या रंगाची झाक येते.क्ष-किरण उत्सर्जनातील रोधक गुणधर्मामुळे स्ट्रॉन्शिअम दूरचित्रवाणी संचातील टय़ूबच्या (कॅथोड-रे टय़ूब) काचेसाठी वापरतात. एकूण उत्पादनाच्या ७५ टक्के भाग पूर्वी वापरला जात असे मात्र आता त्याला पर्याय उपलब्ध झाल्याने स्ट्रॉन्शिअमची मागणी उतरणीला लागली असून त्याचा परिणाम स्ट्रॉन्शिअमच्या उत्पादनावर झाला आहे.स्ट्रॉन्शिअममुळे निर्माण होणारा किरमिजी लाल रंग ही त्याची खासियत असल्याकारणाने एकूण उत्पादनाच्या ५ ते १० टक्के भागाचा वापर पायरोटेक्निक क्षेत्रात होतो उदा. शोभेचे फटाके, लक्ष वेधण्यासाठी अथवा आपात्कालीन परिस्थितीचा इशारा देण्यासाठी असलेली संकेत प्रणाली (signaling flares) आणि मागोवा घेणाऱ्या शस्त्रसामग्रीसाठी.वैद्यकीय क्षेत्रातही स्ट्रॉन्शिअमचा वापर केला जातो. स्ट्रॉन्शिअमचे रासायनिक गुणधर्म कॅल्शिअमशी संलग्न असल्याकारणाने कॅल्शिअमप्रमाणेच स्ट्रॉन्शिअम आपल्या शरीरातील हाडांमध्ये शोषले जाते. लहान मुलांमध्ये हे प्रमाण वाढल्यास हाडांच्या वाढीवर विपरीत परिणाम होतो. हाडांच्या कर्करोगामध्ये वापरल्या जाणाऱ्या किरणोत्सारी औषधात र१-89 महत्त्वाचा घटक आहे. संवेदनशील दातांसाठीच्या टूथपेस्टमध्ये स्ट्रॉन्शिअम क्लोराईड वापरले जाते.
– श्रीमती मीनल टिपणीस
मराठी विज्ञान परिषद,
वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२ 

दिनविशेष १८ जुलै

दिनविशेष १८ जुलै
१८ जुलै १८९८
मेरी क्युरी व पिएर क्युरीनी पोलोनियम या नवीन मूलतत्त्वाचा शोध लावला
Image may contain: food
किरणोत्सारीता या शब्दाचे श्रेय मेरी क्युरी यांच्याकडे जाते. मेरी आणि पिएर क्युरी या दोघांनी पिचब्लेंडसारखी खनिजे युरेनियमपेक्षाही जास्त प्रमाणात बेक्वेरल किरण उत्सर्जित करतात हे दाखवून दिले. मेरीने पिचब्लेंडमधून मोठ्या प्रमाणात किरणोत्सार करणारा पदार्थ वेगळा करुन एका नवीन मूलद्रव्याची भर घातली. या नवीन मूलद्रव्यास मेरीने आपल्या पोलंड देशावरुन पोलोनियम असे नाव दिले. पुढे मेरी आाणि पिएर क्युरी यांना पोलोनियमपेक्षाही जास्त किरणोत्सारी रेडियम नावाचे मूलद्रव्य सापडले. रेडियम हे युरेनियमपेक्षा १६५० पट जा्स्त किरणोत्सारी आहे. एक ग्रॅम रेडियममून दर सेकंदाला जितका किरणोत्सार बाहेर पडतो त्याला १ क्युरी किरणोत्सार असे म्हटले जाते.
पोलोनियम आवर्त सारणी के छठे मुख्य समूह का अंमि सदस्य है। यह अस्थिर रेडियोऐक्टिव गुण वाला तत्व है। इस कारण पोलोनियम का कोई स्थिर समस्थानिक प्राप्त नहीं है। पोलोनियम के मुख्य समस्थानिक की द्रव्यमान संख्या 210 है, परंतु पोलोनियम के 10 अन्य समस्थानिक भी ज्ञात हैं।
पोलोनियम का आविष्कार सन् 1898 में पीरी एवं मेरी क्यूरी के संयुक्त अनुसंधानों द्वारा हुआ। यूरेनियम और थोरियम के अयस्कों में रेडियोऐक्टिवता का गुण था, परंतु उसी समय यह भी ज्ञात हुआ कि इस अयस्कों में पूर्वानुमेय यूरेनियम और रेडियम की मात्रा से अधिक रेडियो ऐक्टिवता वर्तमान थी। इससे यह अनुमान हुआ कि इस अयस्कों में कई नया तत्व उपस्थित है, जिसमें उन तत्वों से कहीं अधिक रेडियोऐक्टिवता होनी चाहिए। इन्हीं विचारों से पथप्रदर्शन पाकर क्यूरी ने यूरेनियम अयस्क, पिचब्लेंड, का रासायनिक विश्लेषण प्रारंभ किया। उन्होंने इस क्रिया में रेडियो ऐक्टिवता की माप को विशेष महत्ता दी, जिसके द्वारा यह ज्ञात हुआ कि यूरेनियम के अतिरिक्त दो स्थानों पर रेडियोऐक्टिवता संकेंद्रित हुई। एक बिस्मथ सल्फाइड के अवक्षेप के साथ और दूसरी क्षारीय मुदा तत्वों के साथ। बिस्मथ सल्फाइड के अवक्षेप को एक नलिका में गरम करने पर रेडियोऐक्टिव भाग शीघ्र वाष्प बनकर शीतल स्थानों में जमा हो गया। इस भाग की रेडियोऐक्टिवता विशुद्ध यूरेनियम की अपेक्षा 400 गुना अधिक थी। यह रेडियोऐक्टिव पदार्थ एक नये तत्व का यौगिक था, जिसकी खोज की घोषणा पीरी एवं मेरी क्यूरी ने पैरिस की विज्ञान अकादमी की 18 जुलाई, 1898 ई. की बैठक में की थी। इसका नाम मेरी क्यूरी की जन्म भूमि पोलैंड के सम्मान में पोलोनियम रखा गया।

विज्ञान कोडे भाग - ३२

विज्ञान कोडे भाग - ३२
कार्बनचे एक महत्वाचे अपरुप, 
चकचकीत काळपट माझे स्वरूप.
अधातु असणारा विद्युत चालक, 
गुळगुळीत भासणारा उष्णता वाहक.
अणुभट्टी मध्ये करतो मदत, 
शाळेच्या दप्तरात नेहमी सोबत, 
ओळखा पाहू मी आहे कोण?


उत्तर- ग्राफाईट  (Graphite)

Like our Facebook page

     🏼 लेखक 🏼
SANDIP KRUSHNA JADHAO
    Chief Editor
    Noble Science
      7588090801

विज्ञान साक्षरता हाच आमचा ध्यास

ओळ्ख मूलद्रव्यांची भाग - ४७ - रुबिडीयम

ओळ्ख मूलद्रव्यांची भाग - ४७

रुबिडिअम

मऊ चंदेरी पांढरट रंगाचा रुबिडिअम अल्कली धातू कुटुंबातील सदस्य असून इतर अल्कली धातूंप्रमाणेच अत्यंत क्रियाशील आहे.


 
रुबिडिअमचा शोध १८६१ला नव्याने अवगत झालेल्या ज्वालोत्सर्जी वर्णपंक्तिदर्शन (फ्लेम स्पेक्ट्रोप्स्कोपी) तंत्रज्ञानामुळे लागला. तत्पूर्वी याच तंत्रज्ञानामुळे सिझियमचा शोध लागला होता. रॉबर्ट बन्सन व गुस्ताव किचरेफ या द्वयीला स्पेक्ट्रोस्कोपीच्या शोधानंतर वर्षभरातच लेपिडोलाइट या खनिजाचा वर्णपट अभ्यासताना दोन गडद लाल रंगाच्या रेषा दिसल्या, त्यावरून त्यांनी या खनिजात नवीन मूलद्रव्य असल्याचे अनुमान काढले व लॅटिन शब्द रुबिडसवरून नामकरण केले रुबिडिअम. कालांतराने बन्सनला रुबिडिअम वेगळे करण्यात यश आले. या खनिजात रुबिडिअमचे प्रमाण कमी असल्यामुळे १५० किलो खनिजातून केवळ ९.२ ग्रॅम रुबिडिअम प्राप्त झाले.मऊ चंदेरी पांढरट रंगाचा रुबिडिअम अल्कली धातू कुटुंबातील सदस्य असून इतर अल्कली धातूंप्रमाणेच अत्यंत क्रियाशील आहे. म्हणूनच निसर्गात तो मुक्त स्वरूपात आढळत नाही. याचा पाण्याशी संपर्क येताच अत्यंत स्फोटक क्रियेद्वारे हायड्रोजन मुक्त होतो, ज्याची क्षमता पोटॅशिअम आणि पाणी या अभिक्रियेपेक्षा अधिक असते. सोडिअमप्रमाणे रुबिडिअमलाही तेलात बुडवून ठेवावे लागते. सामान्य तापमानाला घन असलेला हा धातू ३९ अंश सेल्सिअसला वितळून द्रवात रूपांतरित होतो.लेपिडोलाइट, पोल्युसाइट व कार्नालाइट ही रुबिडिअमची मुख्य खनिजे. समुद्राच्या पाण्यात व भूगर्भातील झऱ्यांत त्याचे प्रमाण सापडते. परंतु अनिश्चितता व मिळणारे अत्यल्प प्रमाण यामुळे रुबिडिअमचे उत्पादन आर्थिकदृष्टय़ा परवडत नाही. लिथियमच्या उत्पादनात शुद्धीकरण करताना उपउत्पादन म्हणून रुबिडिअम मिळते.पूर्वी रुबिडिअमचा उपयोग फक्त संशोधन क्षेत्रात केला जाई परंतु हल्लीच्या तंत्रयुगात रुबिडिअमचा वापर अनेक क्षेत्रांत होतो. मुख्यत: रुबिडिअमचा वापर आण्विक घडय़ाळात उच्चकोटीच्या अचूकतेसाठी तसेच फोटो इलेक्ट्रिक सेलमध्ये सौर ऊर्जेचे रूपांतर विद्युत ऊर्जेत करण्यासाठी व व्हॅक्यूम टय़ूबमध्ये अल्प प्रमाणातील वायूंचे उच्चाटन करण्यासाठी केला जातो. शोभेच्या फटाक्यांत जांभळ्या रंगासाठी रुबिडिअम वापरतात तर वैद्यकीय क्षेत्रात रक्ताभिसरणातील इस्चेमिक (अल्प रक्त) अवस्थेचे सर्वेक्षण करण्यासाठी वापरतात.रुबिडिअमची किरणोत्सारी समस्थानिकांचा उपयोग कर्करोगग्रस्त पेशी तसेच टय़ूमर शोधण्यासाठी केला जातो. त्याचप्रमाणे जुन्या खडकाचे वय मोजण्यासाठी रुबिडिअमच्या समस्थानिकाचा उपयोग होतो.

– श्रीमती मीनल टिपणीस
मराठी विज्ञान परिषदवि. ना. पुरव मार्गचुनाभट्टीमुंबई २२

दिनविशेष १७ जुलै

दिनविशेष १७ जुलै
गॉर्डन गूल्ड - लेसरचा शोध
जन्मदिन - १७ जुलै १९२०
Image may contain: 1 person, smiling, indoor
गॉर्डन गूल्ड (१७ जुलै, इ.स. १९२० - १६ सप्टेंबर, इ.स. २००५) हे अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ होते. यांनी (तसेच थियोडोर मैमान यांनी) लेसरचा शोध लावला.
Gordon Gould (July 17, 1920 – September 16, 2005) was an American physicist who is widely, but not universally, credited with the invention of the laser (Others attribute the invention to Theodore Maiman). Gould is best known for his thirty-year fight with the United States Patent and Trademark Office to obtain patents for the laser and related technologies. He also fought with laser manufacturers in court battles to enforce the patents he subsequently did obtain.
A laser is a device that emits light through a process of optical amplification based on the stimulated emission of electromagnetic radiation. The term "laser" originated as an acronym for "light amplification by stimulated emission of radiation".[1][2] The first laser was built in 1960 by Theodore H. Maiman at Hughes Research Laboratories, based on theoretical work by Charles Hard Townes and Arthur Leonard Schawlow.

सामानज्ञान प्रश्नसंग्रह भाग - २७

सामानज्ञान प्रश्नसंग्रह भाग - २७
प्रश्न-१) 2011 चा 'साहीत्य अकादमी ' चा पुरस्कार कवी ग्रेस यांना कोणत्या साहित्य निर्मितीसाठी बहाल करण्यात आला ?
उत्तर :- वार्याने हालते रान

प्रश्न-२) कोणत्या वर्षाला भारतीय लोकसंख्या इतिहासातील 'महाविभाजन वर्ष' म्हणतात ?
उत्तर :- 1921

प्रश्न-३) 2011 च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रात स्त्री-पुरुष प्रमाण किती आहे ?
उत्तर :- 925

प्रश्न-४) पूर्वीच्या कुलाबा जिल्ह्याचे नामांतर _ असे करण्यात आले.
उत्तर :- रायगड

प्रश्न-५) "स्त्री व पुरुष दोहोंना समान कामाचे समान वेतन" हे तत्त्व भारतीय राज्यघटनेत कुठे आढळते ?
उत्तर :- मार्गदर्शक तत्त्वे

प्रश्न-६)  'Planned Economy for India' (भारतासाठी नियोजीत अर्थव्यवस्था) हा ग्रंथ कोणी लिहीला?
उत्तर :- एम. विश्वेश्वरैय्या

प्रश्न-७) ASEAN ची 21वी शिखर परिषद नुकतीच कोणत्या देशात पार पडली?
उत्तर :- कंबोडिया

प्रश्न-८) अमेरिकेत स्थापन्यात आलेल्या कोणत्या गुरुद्वारास नुकतीच 100 वर्षे पूर्ण झालीत?
उत्तर :- स्टोकटोन गुरुद्वारा साहिब

प्रश्न-९) खालील पैकी कोणत्या राज्यातील एका दलित वस्तीस नुकतेच म्यानमार च्या नेत्या आन सान्ग स्यू की ह्यांचे नाव देण्यात आले आहे?
उत्तर :- आंध्र प्रदेश

प्रश्न-१०) बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी नुकतेच पाकिस्तान भेटीदरम्यान तक्षिला या प्राचीन शहरास भेट दिली, तक्षिला पाकिस्तानातील कोणत्या प्रांतात आहे?

उत्तर :- पंजाब

प्रश्न-११) महाराष्ट्रात कोणत्या पिकाकरिता 'इक्रिसॅट' (Icrisat) तंत्र अवलंबिले जाते ?
उत्तर :- भुईमूग

प्रश्न-१२) खालीलपैकी कोणती एक रबी ज्वारीची जात शेती संशोधन केंद्र, मोहोळ येथून निर्माण झाली आहे ?
उत्तर :- मालदांडी -35-1

प्रश्न-१३) भारतात हरित क्रांती कोणत्या वर्षी सुरु करण्यात आली ?
उत्तर :- 1966 - 67

प्रश्न-१४) देशातील पहिले भारतरत्न पुरस्कार विजेते मुख्यमंत्री कोण ?
उत्तर :- गोविंद वल्लभ पंत (1957)

प्रश्न-१५) खालीलपैकी कोणते एक पीक लागवडीसाठी महाराष्ट्रात सर्व हंगामात घेतले जाते ?
उत्तर :- सूर्यफूल

प्रश्न-१६) दवाखाण्यातील घानकचरा कोणत्या प्रकारात वर्गीकरण केला आहे?
उत्तर :- घातक

प्रश्न-१६) पृथ्वीवरील ओझोनचा थर विरळ होण्याचा परिणाम म्हणजे:
उत्तर :- पृथ्वीतलावरील अतिनील किरणोत्सर्गात वाढ होते

प्रश्न-१७) नर्मदा धरण प्रकल्पाबाबतचा प्रमुख वाद या संदर्भात होता:
उत्तर :- पुनर्वसन

प्रश्न-१८) खालीलपैकी कोणता प्राणी उच्च मांसभक्षक आहे? (सिंह वाघ लांडगा चित्ता)
उत्तर :- वाघ

प्रश्न-१९) जैव विविधतेच्या दृष्टी अतीमहत्त्वाचे पश्चिम घाट कोणत्या राज्यामध्ये पसरलेले आहे?
उत्तर :- महाराष्ट्र – कर्नाटक – केरळ

सौजन्य- तंत्रस्नेही शिक्षक समूह, महाराष्ट्र

बुधवार, १८ जुलै, २०१८

विज्ञान कोडे भाग - ३१

विज्ञान कोडे भाग - ३१
मनगटावर शोभे तुमच्या छान, 
करून देतो वेळेचे भान.
असते मला दोलकाची जोड, 
अचूक करतो वेळेची फोड.
लहान मोठे तीन सहकारी, 
तिघांची असते स्पर्धा भारी, 
ओळखा पाहू मी आहे कोण?


 उत्तर- घड्याळ (Watch)

Like our Facebook page

     🏼 लेखक 🏼
SANDIP KRUSHNA JADHAO
    Chief Editor
    Noble Science
      7588090801
विज्ञान साक्षरता हाच आमचा ध्यास

ओळख मूलद्रव्यांची भाग - ४६ - क्रिप्टॉन

ओळख मूलद्रव्यांची भाग - ४६

क्रिप्टॉन

आवर्त सारणीमध्ये अणुक्रमांक ३५ असलेला अठराव्या गणात आणि चौथ्या आवर्तनात शेवटचे मूलद्रव्य म्हणजे क्रिप्टॉन.

आवर्त सारणीमध्ये अणुक्रमांक ३५ असलेला अठराव्या गणात आणि चौथ्या आवर्तनात शेवटचे मूलद्रव्य म्हणजे क्रिप्टॉन. स्कॉटिश रसायन शास्त्रज्ञ सर विल्यम रॅम्झी आणि मॉरिस एम ट्रॅव्हर यांनी ३० मे १९१८ रोजी क्रिप्टॉनचा शोध लावला. हा क्रिप्टॉन द्रवरूप वायूचे बाष्पीभवन करून मिळवला. हवेत मात्र त्याचे प्रमाण खूपच कमी आहे; समुद्राच्या प्रति किलो पाण्यामागे साधारणत: २.१ ७ १०-४ मिलिग्रॅम इतकेच! त्याचे अत्यंत अल्प प्रमाणात असलेले अस्तित्व यावरून (ग्रीक शब्द क्रिप्टॉज म्हणजे लपलेला) त्याचे नाव क्रिप्टॉन असे ठेवण्यात आले. हा रंगहीन तसेच गंधहीन वायू आहे. क्रिप्टॉनच्या बाहेरच्या कक्षेतील इलेक्ट्रॉनचे अष्टक पूर्ण असल्याने अठराव्या गणातील इतर मूलद्रव्यांप्रमाणे क्रिप्टॉनसुद्धा स्थिर आणि निष्क्रिय वायू म्हणून ओळखला जातो.अत्यंत कमी प्रमाणातील उपलब्धता आणि हवेतून क्रिप्टॉन मिळविण्याच्या खूप खर्चीक पद्धतीमुळे त्याच्या वापरावर खऱ्या अर्थाने पुष्कळ मर्यादा आल्या आहेत. पण तरीही जिथे जिथे हा वायू वापरला जातो, त्या सर्व ठिकाणी त्याचे खूप महत्त्व आहे. क्रिप्टॉनची ३३ ज्ञात समस्थानिके आहेत आणि त्यांतील पाच समस्थानिके स्थिर आहेत. हिरव्या, पिवळ्या प्रकाश किरणांनी चमकणाऱ्या चिन्हांसाठी वापरण्यात येणाऱ्या वायूंच्या मिश्रणात क्रिप्टॉन हा महत्त्वाचा घटक आहे.सर्वात महत्त्वाचा उपयोग म्हणजे लांबी मोजण्याचे एकक हे क्रिप्टॉन-८६ या समस्थानिकापासून प्रमाणित करण्यात आले. क्रिप्टॉन-८६च्या १६,५०,७६३ तरंगलांबी म्हणजे एक मीटर होय! ही पद्धत १९८३ पर्यंत वापरली जात होती. फुप्फुसाच्या रोगाचे अचूक निदान करण्यासाठी विकसित केलेल्या नवीन एम.आर.आय. स्कॅन तंत्रज्ञानामध्ये क्रिप्टॉनचा यशस्वीपणे वापर केला गेला आहे. क्रिप्टॉन-८५ हे किरणोत्सर्गी समस्थानिक मुख्यत्वे उच्च तीव्रतेचे डिस्चार्ज दिवे तयार करण्यात एक घटक म्हणून उपयोगी ठरले आहे. विमानाचे भाग, अर्धवाहक तसेच पाइपिंगची चाचणी करण्यासाठी क्रिप्टॉन-८५ वापरले जाते. मानवी शरीरात रक्ताचा प्रवाह अभ्यासण्यासाठीही क्रिप्टॉन-८५ वापरले जाते. हा वायू रक्तात मिसळल्यावर त्याच्या प्रवाहाची दिशा यंत्राच्या साहाय्याने निरीक्षण केली जाते. यावरून रक्तप्रवाह सुरळीत चालू आहे की नाही ते ठरविण्यास सोपे जाते.
डॉ. सुधीर कृष्णा लिंगायत
मराठी विज्ञान परिषदवि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२ 

दिनविशेष १६ जुलै

दिनविशेष १६ जुलै
झेर्निके, फ्रिट्‌स
भौतिकीविज्ञ
जन्मदिन - १६ जुलै १८८८
Image may contain: 1 person
झेर्निके, फ्रिट्स : (१६ जुलै १८८८–१० मार्च १९६६). डच भौतिकीविज्ञ. १९५३ सालच्या भौतिकीच्या नोबेल पारितोषिकाचे विजेते. त्यांचा जन्म ‘अम्स्टरडॅम (नेदर्लंड्स) येथे झाला. त्यांनी १९१३ साली अम्स्टरडॅम विद्यापीठातून बी, एस्. पदवी संपादन केली. १९१५ मध्ये त्यांनी डॉक्टरेट पदवी संपादन केली आणि त्याच वर्षी ते सैद्धांतिक भौतिकीचे व्याख्याते झाले. १९२० सालापासून निवृत्तीपर्यत (१९५८) त्यांनी ग्रोनिंगेन विद्यापीठात सैद्धांतिक व गणितीय भौतिकी आणि सैद्धांतिक यामिकीचे (प्रेरणांची वस्तूवर होणारी क्रिया व त्यामुळे निर्माण होणारी गती यांचा अभ्यास करणाऱ्या शास्त्राचे) प्राध्यापक म्हणून काम केले. त्यांनी १९४८ साली बॉल्टिमोर येथील जॉन्स हॉफकिन्स विद्यापीठात अभ्यागत प्राध्यापक म्हणून काम केले.
प्रकाशकी व भौतिकीच्या इतर शाखांत त्यांनी विशेष संशोधन केले. प्रकाशकीतील दूरदर्शकासंबंधीच्या प्रश्नांवर संशोधन करीत असताना १९३४ मध्ये त्यांनी दूरदर्शकाच्या आरशातील प्रतिमांकरिता फूको यांनी योजिलेल्या सुरीधारा कसोटीचे (आरशाच्या पृष्ठभागावरील स्थानिक अनियमितपणा शोधून काढण्याकरिता सुरीच्या धारदार कडेचा उपयोग करणाऱ्या कसोटीचे) स्पष्टीकरण देणारा सिद्धांत प्रसिद्ध केला. या सिद्धांताचा उपयोग सूक्ष्मदर्शकामध्ये वापरण्यात येणाऱ्या कला विपर्यास पद्धतीतील (गणितीय) बहुपदीच्या शोधात झाला [⟶ सूक्ष्मदर्शक]. साध्या सूक्ष्मदर्शकातून संपूर्णपणे पारदर्शक वस्तू दिसू शकत नाहीत त्या दिसण्यासाठी त्यांचे अभिरंजन (विशिष्ट रंगाने रंगविण्याची क्रिया) करावी लागते. परंतु या क्रियेमुळे सजीव कोशिका (पेशी) मरतात म्हणून सजीव कोशिकांचा सूक्ष्मदर्शकातून अभ्यास करता येत नसे. पारदर्शक कोशिकेतून पलीकडे जाणाऱ्या प्रकाशाचा वेग काहीसा मंदावतो व त्यामुळे त्याचे तरंगशीर्ष मूळ प्रकाशाच्या तुलनेने काहीसे मागे पडते म्हणजेच त्याचे कलांतर होते. एक खास साधन वापरून हे कलांतर जवळजवळ १८०º करता येते. मग मूळ प्रकाश व कोशिकेतून येणारा प्रकाश यांचे तरंग परस्परांचे अंशतः किंवा पूर्णपणे निराकरण करू शकतात त्यामुळे ती कोशिका दिसू शकते. हीच कला विपर्यास सूक्ष्मदर्शिकीय पद्धती झेर्निके यांनी शोधून काढली. त्यांनी अतिक्षीण विद्युत् प्रवाह मोजण्यासाठी गॅल्व्हानोमीटरमध्ये सुधारणा केली. तोच झेर्निक गॅल्व्हानोमीटर प्रमाणभूत उपकरण म्हणून प्रमुख प्रयोगशाळांत वापरतात. १९५२ साली त्यांना रॉयल सोसायटीचे रम्फर्ड पदक मिळाले. ते ग्रोनिंगेन येथे मृत्यू पावले.