दिनविशेष १२ जुलै
बुधवार, ११ जुलै, २०१८
बोधकथा - पुण्यवान माणसाच्या आश्रयामुळे ....
बोधकथा -
पुण्यवान माणसाच्या आश्रयामुळे ....
! लाईफ सही तो ... जीवन सही !
पुण्यवान माणसाच्या आश्रयामुळे ....
एका जंगलामध्ये एक म्हतारी आणि तिची नात राहत होती . आणि त्याच जंगलामध्ये चार दरोडेखोर लुटमार करण्यासाठी येत असंत .
एके दिवशी लुटमार करता करता संध्याकाळ झाली आणि विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची सुरुवात झाली . ते चार दरोडेखोर जंगलामध्ये आश्रयासाठी सैरभैर पळु लागले . अचानक त्यांना म्हतारीची झोपडी दिसली . आणि ते म्हतारीच्या झोपडीकडे गेले. म्हतारीने त्यांना रात्री साठी आश्रय दिला जेवण बनवले सर्वजन जेवायला बसले आणि जेवता जेवता पाप पुण्याचा विषय निघाला.
प्रत्येकजण आपल्या परीने विषय मांडत होता.
शेवटी म्हतारीने पैज लावली. बाहेर विजा पडत आहेत प्रत्येकाने त्या समोरच्या झाडाला शिवुन पुन्हा झोपडीमध्ये यायचे ज्याच्या अंगावर विज पडेल तो पापी आणि जो सुखरुप पुन्हा झोपडीत येईल तो पुण्यवान.
प्रथम १ ला दरोडेखोर गेला झाडाला शिवुन सुखरुप झोपडीत आला.
असे दुसरा गेला , तिसरा गेला , चौथा गेला. आणि सर्वजण सुखरुप झोपडीत आले ....
आता पाळी आली म्हतारी आणि तिच्या नातीवर म्हतारीला मनामध्ये प्रश्न पडला की हे चारही दरोडेखोर पुण्यवान निघाले आपण नक्कीच पापी आहोत , विज आपल्याच अंगावर पडणार असा विचार करत असताना तिने नातीला कडेवर घेतले आणी झोपडीच्या बाहेर पाऊल टाकले. त्याचक्षणी विजेचा कडकडाट होऊन विज त्या झोपडीवर पडली आणि क्षणार्धात ते चारही दरोडेखोर जागीच भस्मसात झाले.
तात्पर्य :-
एका पुण्यवान माणसाच्या आश्रयामूळे आजही चार पापी माणसं जगु शकतात. पण त्याने साथ सोडली तर ते चारही भस्मसात होऊ शकतात. म्हणून पुण्याचा वाटा नेहमी घेत रहा. ते कधी संकटाच्या वेळी आडवे येइल हे आपल्याला ही नाही समजणार .
! लाईफ सही तो ... जीवन सही !
सामान्यज्ञान प्रश्नसंग्रह भाग - २३
सामान्यज्ञान प्रश्नसंग्रह भाग - २३
प्रश्न-१) विधानसभा बरखास्त करण्याचा अधिकार कुणाला आहे?
उत्तर :- राज्यपाल
प्रश्न-२) घटक राज्यातील वरिष्ठ सभागृह कोणते?
उत्तर :- विधानसभा
प्रश्न-३) राष्ट्रपतीवर कोणत्या कारणाखाली महाभियोग खटला चालविता येतो?
उत्तर :- घटनाभंगाबगल
प्रश्न-४) कोणत्या घटना दुरुस्तीनुसार मुलभूत कर्तव्यांचा समावेश भारतीय राज्यघटनेत करण्यात आला?
उत्तर :- 42 वी घटन दुरुस्ती
प्रश्न-५) खालीलपैकी कोणता अधिकार लोकसभेचा महत्वाचा अधिकार मानला जातो?
उत्तर :- मंत्रीमंडळावर नियंत्रण ठेवणे
प्रश्न-६) Blue Print for Survival हे पर्यावरण विषयी पुस्तक ___ यांनी लिहिले आहे.
उत्तर :- सरला बेन
प्रश्न-७) जागतिक जैवविविधता संवर्धन दिन केव्हा साजरा केला जातो ?
उत्तर :- 24 नोव्हेंबर
प्रश्न-८) 'ज्ञानवाणी' हा प्रकल्प कोणत्या संस्थेचा आहे ?
उत्तर :- इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ
प्रश्न-९) गोसीखुर्द प्रकल्प कोणत्या नदीवर बांधण्यात येत आहे ?
उत्तर :- वैनगंगा
प्रश्न-१०) राजीव गांधी जीवनदायी योजना राज्यात केव्हा सुरु करण्यात आली ?
उत्तर :- 2 जुलै 2012
प्रश्न-११) महाराष्ट्राच्या कोणत्या दिशेला सातपुडा पर्वतरांगा व गाविलगड टेकड्या आहेत?
उत्तर :- उत्तर
प्रश्न-१२) परभणी व नांदेड जिल्ह्यातील डोंगरांच्या रांगेला कोणती रांग म्हणतात?
उत्तर :- निर्मळ रांग
प्रश्न-१३) 'V' आकाराची दरी कशामुळे तयार होते?
उत्तर :- नदीचे अपघर्षण
प्रश्न-१४) दगडी कोळशाचा निकृष्ठ दर्जाचा प्रकार कोणता आहे?
उत्तर :- Lignite
प्रश्न-१५) बावन्न दरवाजांचे शहर म्हणून कोणते शहर ओळखले जाते?
उत्तर :- औरंगाबाद
प्रश्न-१६) बल्लारपूर कागद गिरणी कोणत्या जिल्ह्यात आहे ?
उत्तर :- चंद्रपूर
प्रश्न-१७) राज्यातील पहिले कायम स्वरूपी बाल न्यायालय खालील पैकी कोणत्या जिल्ह्यात सुरु करण्यात आले आहे ?
उत्तर :- नाशिक
प्रश्न-१८) पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना कोणी केली ?
उत्तर :- डॉ. बाबासाहेब आंबेडकर
प्रश्न-१९) खालील पैकी कोणते शहर महाराष्ट्राचा 'हरित पट्टा' म्हणून ओळखले जाते
उत्तर :- नाशिक
प्रश्न-२०) 2011 ची जनगणना स्वातंत्र्या नंतरची कितवी जनगणना होती ?
उत्तर :- 7 वी
सौजन्य - तंत्रस्नेही शिक्षक समूह, महाराष्ट्र
प्रश्न-१) विधानसभा बरखास्त करण्याचा अधिकार कुणाला आहे?
उत्तर :- राज्यपाल
प्रश्न-२) घटक राज्यातील वरिष्ठ सभागृह कोणते?
उत्तर :- विधानसभा
प्रश्न-३) राष्ट्रपतीवर कोणत्या कारणाखाली महाभियोग खटला चालविता येतो?
उत्तर :- घटनाभंगाबगल
प्रश्न-४) कोणत्या घटना दुरुस्तीनुसार मुलभूत कर्तव्यांचा समावेश भारतीय राज्यघटनेत करण्यात आला?
उत्तर :- 42 वी घटन दुरुस्ती
प्रश्न-५) खालीलपैकी कोणता अधिकार लोकसभेचा महत्वाचा अधिकार मानला जातो?
उत्तर :- मंत्रीमंडळावर नियंत्रण ठेवणे
प्रश्न-६) Blue Print for Survival हे पर्यावरण विषयी पुस्तक ___ यांनी लिहिले आहे.
उत्तर :- सरला बेन
प्रश्न-७) जागतिक जैवविविधता संवर्धन दिन केव्हा साजरा केला जातो ?
उत्तर :- 24 नोव्हेंबर
प्रश्न-८) 'ज्ञानवाणी' हा प्रकल्प कोणत्या संस्थेचा आहे ?
उत्तर :- इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ
प्रश्न-९) गोसीखुर्द प्रकल्प कोणत्या नदीवर बांधण्यात येत आहे ?
उत्तर :- वैनगंगा
प्रश्न-१०) राजीव गांधी जीवनदायी योजना राज्यात केव्हा सुरु करण्यात आली ?
उत्तर :- 2 जुलै 2012
प्रश्न-११) महाराष्ट्राच्या कोणत्या दिशेला सातपुडा पर्वतरांगा व गाविलगड टेकड्या आहेत?
उत्तर :- उत्तर
प्रश्न-१२) परभणी व नांदेड जिल्ह्यातील डोंगरांच्या रांगेला कोणती रांग म्हणतात?
उत्तर :- निर्मळ रांग
प्रश्न-१३) 'V' आकाराची दरी कशामुळे तयार होते?
उत्तर :- नदीचे अपघर्षण
प्रश्न-१४) दगडी कोळशाचा निकृष्ठ दर्जाचा प्रकार कोणता आहे?
उत्तर :- Lignite
प्रश्न-१५) बावन्न दरवाजांचे शहर म्हणून कोणते शहर ओळखले जाते?
उत्तर :- औरंगाबाद
प्रश्न-१६) बल्लारपूर कागद गिरणी कोणत्या जिल्ह्यात आहे ?
उत्तर :- चंद्रपूर
प्रश्न-१७) राज्यातील पहिले कायम स्वरूपी बाल न्यायालय खालील पैकी कोणत्या जिल्ह्यात सुरु करण्यात आले आहे ?
उत्तर :- नाशिक
प्रश्न-१८) पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना कोणी केली ?
उत्तर :- डॉ. बाबासाहेब आंबेडकर
प्रश्न-१९) खालील पैकी कोणते शहर महाराष्ट्राचा 'हरित पट्टा' म्हणून ओळखले जाते
उत्तर :- नाशिक
प्रश्न-२०) 2011 ची जनगणना स्वातंत्र्या नंतरची कितवी जनगणना होती ?
उत्तर :- 7 वी
सौजन्य - तंत्रस्नेही शिक्षक समूह, महाराष्ट्र
विज्ञान कोडे भाग - २६
विज्ञान कोडे भाग - २६
Like our Facebook page
प्राचिन त्रिकोणाकृती वास्तू महान,
सात आश्चर्यात मिळाले
स्थान
चुनखडी दगडांच्या विशाल शिळा,
चाकांशिवाय जोडल्या जिला
मृत शरीर का ठेवले जपून,
रहस्य नाही उलगडले अजून,
ओळखा पाहू मी आहे कोण?
उत्तर- पिरॅमिड (Pyramids)
Like our Facebook page
✍🏼 लेखक ✍🏼
SANDIP KRUSHNA JADHAO
Chief Editor
Noble Science
7588090801
विज्ञान साक्षरता हाच आमचा ध्यास
ओळख मूलद्रव्यांची भाग - ४१ - गॅलिअम
ओळख मूलद्रव्यांची भाग - ४१
गॅलिअम
कोंबडय़ाला लॅटिनमध्ये ‘गॅलस’ म्हणतात, त्यावरून ‘गॅलिअम’ हे नाव दिलं असावं.

गॅलिअम – ३१व्या क्रमांकाचे मूलद्रव्य. मूलद्रव्यांच्या आवर्तसारणीनुसार ४थ्या आवर्तातील १३व्या गणात त्याला स्थान दिलं गेलंय. शुद्ध असताना रंग चांदीसारखा चमकदार! या गणातील अॅल्युमिनिअम, इंडिअम, थॅलिअम धातूंप्रमाणे गॅलिअमदेखील हलका धातू आहे.
१८७५ मध्ये फ्रेंच रसायनशास्त्रज्ञ पॉल-एमिल लिकॉक दी बॉईसबॉड्रन (Paul-Emile Lecoq de Boisbaudran) यांना स्फॅलेराइट या खनिजाच्या वर्णपटात गॅलिअमचं अस्तित्व दिसलं. नंतर विद्युतविघटनाने हा धातू वेगळा मिळवण्यातही त्यांना यश आलं. फ्रान्समधील गॉल हे त्यांचं गाव. त्यावरून त्याला नाव दिलं ‘गॅलिया’ आणि त्यावरून ‘गॅलिअम’. पण काहीना असं वाटतं की, हे मूलद्रव्य शोधणाऱ्या लिकॉकने स्वत:च्या नावावरून ‘गॅलिअम’ नाव दिलं. लिकॉकचा अर्थ होतो कोंबडा. कोंबडय़ाला लॅटिनमध्ये ‘गॅलस’ म्हणतात, त्यावरून ‘गॅलिअम’ हे नाव दिलं असावं.

अचंबित करणारी गोष्ट म्हणजे मेंडेलिव्हनी ‘इका-अल्युमिनिअम’च्या गुणधर्मासंबंधित केलेलं भाकीत आणि गॅलिअम धातूचे प्रत्यक्षातील जवळपास तसेच असणारे गुणधर्म!
सोबतच्या तक्त्यावरून मेंडेलिव्हनी अचूकतेच्या किती जवळ जाणारं भाकीत सांगितलं होतं, याची कल्पना येईल.
मेंडेलिव्हनी वर्तवल्याप्रमाणे गॅलिअम धातू आम्लात तसंच अल्कलीतही विरघळतो. सामान्यत: गॅलिअम अॅल्युमिनिअमसारखा उभयधर्मी आहे. गॅलिअम हा कोरडय़ा हवेत स्थिर असतो. दमट हवेत मात्र ऑक्सिजनचा परिणाम होऊन गॅलिअमच्या पृष्ठभागावर ऑक्साइडचा पातळ थर बनतो, पण जास्त विक्रिया होत नाही.गॅलियमची माहीत असलेली Ga-५६ ते Ga-८६ अशी ३१ समस्थानिकं आहेत. त्यापैकी GaGa-६९व Ga-७१ ही स्थिर आहेत. बाकीची किरणोत्सारी आहेत. नैसर्गिकरीत्या मिळणाऱ्या गॅलियमपैकी Ga-६९चं प्रमाण जास्त म्हणजे ६०.१% आहे. तर Ga-७१चं प्रमाण ३९.९% आहे. बाकीच्या किरणोत्सारी समस्थानिकांपैकी Ga-६७ (अर्धआयुष्य काळ ३.२६१ दिवस) व Ga-६८ (अर्धआयुष्य काळ ६७.७ मिनिटं) ही समस्थानिकं त्यातल्या त्यात जास्त काळ राहणारी आहेत.
– चारुशीला सतीश जुईकर
मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग, चुनाभट्टी, मुंबई २२
दिनविशेष ११ जुलै
दिनविशेष ११ जुलै
जागतिक लोकसंख्या दिवस
झपाटय़ाने वाढणार्या लोकसंख्येमुळे अन्न, वस्त्र, निवारा, दारिद्रय़, बेकारी आणि रोगराई असे अनेक प्रश्न उद्भवू लागले आहेत. महत्त्वाचे म्हणजे देशाच्या प्रगतीला लोकसंख्या ही बाब अडसर ठरत आहे. ही लोकसंख्या आटोक्यात आणण्यासाठी शासनस्तरावर ती सामूहिक प्रयत्नांची.. आज जागतिक लोकसंख्या दिनाच्या दिवशी हेच संकल्प करणे उचित ठरेल. त्याविषयी..
जगातील वाढत्या लोकसंख्येच्या समस्यांविषयी लोकांच्या मनात जागरुकता निर्माण करण्यासाठी दरवर्षी 11 जुलैला जागतिक लोकसंख्या दिन साजरा केला जातो. लोकसंख्या वाढीचे दुष्परिणाम सर्वत्र जाणवत आहेत. याविषयी जनजागृतीची गरज निर्माण झाली आहे. यंदाच्या वर्षी 'कुटंब नियोजन हे मानवाचे कर्तव्य आहे' यावर दृष्टिक्षेप टाकण्यात आला आहे.
लोकसंख्या ही समस्या उग्र रुप धारण करीत असल्याने विकासकामांना खीळ बसत आहे. लोकांना मूलभूत गरजा देतानाही कसरत करावी लागत आहे. मुलगाच हवा यासाठी तीन-चार अपत्यांना जन्म दिला जातो. अशिक्षित महिला असलेल्या कुटुंबात लोकसंख्या वाढीची बीजे दिसून येतात. हे सर्वे क्षणात दिसून आले आहे. यासाठी हे रोखणे गरजेचे आहे.
आज वाढत्या लोकसंख्येमुळे एकीकडे गाडी, बंगला अशी एैशोआरामाची जीवनपध्दती तर दुसरीकडे दारिद्रय़, एक वेळची भूक भागविण्याची धडपड, असे आजचे चित्र दिसते. ही स्थिती बदलण्यासाठी लोकसंख्या नियंत्रण हाच एकमेव उपाय आहे, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
1950 साली जगाची लोकसंख्या 250 कोटी होती. 11 जुलै 1987साली युगोस्लाव्हिया येथे मुलाचा जन्म होऊन जगाची लोकसंख्या 500 कोटी झाली. तेव्हापासून 11 जुलै हा दिवस जागतिक लोकसंख्या दिन/ इशारा दिन म्हणून पाळता जातो. जॉन ग्रँट यांना लोकसंखशास्त्राचा जनक म्हणून ओळखले जाते. तर जनगणनेचा जनक म्हणून सर डेजिल इबेटसन यांना ओळखले जाते.
लोकसंखवाढ चिंताजनक
देशात ‘अच्छे दिन’ आणण्यासाठी प्रथम लोकसंख्या वाढ आटोक्यात आणणे आवश्क आहे. लोकसंख्या वाढीचा सर्व बाबींवर परिणाम होत असून यामुळे विकासास खीळ बसते. लोकसंखवाढीमुळे सर्वाना मूलभूत गरजा पुरविणेही अवघड बनले आहे. देशात 121 कोटी लोकसंख्या वास्तव करते. आज जगात भारत हा लोकसंख्येबाबात अव्वल क्रमांकावर आहे. चीनलादेखील भारत मागे टाकणच्यादृष्टीने मार्गक्रमण करीत आहे. मात्र ही बाब खूप चिंताजनक आहे. ही लोकसंख्या वाढ आटोक्यात आणण्यासाठी सर्वाचा सहभाग आवश्यक आहे. त्याशिवाय चांगले दिवस येणार नाहीत.

सामान्यज्ञान प्रश्नसंग्रह भाग - २२
सामान्यज्ञान प्रश्नसंग्रह भाग - २२
प्रश्न- १) देशातील पहिले इंटरनेट न्यायालय?
उत्तर :- अहमदाबाद (गुजरात)
प्रश्न- २) राष्ट्रीय बाल हक्क आयोग कधी लागू झाला?
उत्तर :-- 23 फेब्रुवारी, 2007
प्रश्न- ३) हॉकीचा पहिला विश्व कप कधी झाल आणि कोणी जिंकला होता?
उत्तर :- 1971 मध्ये झाला आणि पाकिस्तान ने जिंकला होता
प्रश्न- ४) जागतिक बँकेचे ठिकाण कुठे आहे?
उत्तर :- वाशिंग्टन (अमेरिका)
प्रश्न- ५) भारताची 2011 ची जनगणना कितवी आहे:?
उत्तर :- 15 वी
प्रश्न- ६) जांभूळ चे लेखक कोण?
उत्तर :- विठ्ठल उमाप
प्रश्न- ७) नियोजित जैतापूर अणुउर्जा प्रकल्प रत्नागिरी जिल्ह्यातील ................ तालुक्यात आहे?
उत्तर :- माडबन
प्रश्न- ८) सर्वाधिक साक्षरता या संघराज्यात (केंद्रशासित प्रदेश) आहे?
उत्तर :- चंदिगड
प्रश्न- ९) 2010-11 मध्ये GDP ........... नि वाढला?
उत्तर :- 8.6%
प्रश्न- १०) शासकीय कर्मचाऱ्यांना ई-पेमेंट सुविधा देणारे देशातील पहिले राज्य कोणते?
उत्तर :- ओडीसा (सुरवात 10 ऑगस्ट 2012)
प्रश्न- ११) पोलो खेळाचा उगम कोणत्या राज्यात झाला आहे?
उत्तर :- मणिपूर
प्रश्न- १२) स्वतंत्र भारतात जन्म घेऊन लोकसभेचे सभापती असा मान मिळणारी पहिली व्यक्ती कोण?
उत्तर :- जी.एम.सी. बालयोगी
प्रश्न- १३) भारतीय घटने नुसार कलम 199 काय आहे?
उत्तर :- धन विधेयकाची व्याख्या
प्रश्न- १४) भारतातील सर्वांत जूनी आयआयटी कोठे आहे?
उत्तर :- खरगपूर
प्रश्न- १५) कॉम्प्यूटरच्या भाषेत 'CAD' चा अर्थ काय आहे?
उत्तर :- कॉम्प्यूटर ऍडेड डिझाइन
प्रश्न- १६) सूर्यमालेतील आठ ग्रहाच्या उपग्रहाची संख्या किती?
उत्तर :- 165 उपग्रह
प्रश्न- १७) विनोबा भावेंचे गुरु कोण??
उत्तर :- जमानलाल बजाज
प्रश्न- १८) जगातील सर्वात वेगवान रेल्वे कोणत्या देश्यात आहे?
उत्तर :- चीन मध्ये आहे. वेग: 350 किमी/तासी
प्रश्न- १९) विधवा विवाह कायदा
उत्तर :- 1856
प्रश्न- २०) विवाह नोंदणी कायदा
उत्तर :- 1976
सौजन्य- तंत्रस्नेही शिक्षक समूह, महाराष्ट्र
प्रश्न- १) देशातील पहिले इंटरनेट न्यायालय?
उत्तर :- अहमदाबाद (गुजरात)
प्रश्न- २) राष्ट्रीय बाल हक्क आयोग कधी लागू झाला?
उत्तर :-- 23 फेब्रुवारी, 2007
प्रश्न- ३) हॉकीचा पहिला विश्व कप कधी झाल आणि कोणी जिंकला होता?
उत्तर :- 1971 मध्ये झाला आणि पाकिस्तान ने जिंकला होता
प्रश्न- ४) जागतिक बँकेचे ठिकाण कुठे आहे?
उत्तर :- वाशिंग्टन (अमेरिका)
प्रश्न- ५) भारताची 2011 ची जनगणना कितवी आहे:?
उत्तर :- 15 वी
प्रश्न- ६) जांभूळ चे लेखक कोण?
उत्तर :- विठ्ठल उमाप
प्रश्न- ७) नियोजित जैतापूर अणुउर्जा प्रकल्प रत्नागिरी जिल्ह्यातील ................ तालुक्यात आहे?
उत्तर :- माडबन
प्रश्न- ८) सर्वाधिक साक्षरता या संघराज्यात (केंद्रशासित प्रदेश) आहे?
उत्तर :- चंदिगड
प्रश्न- ९) 2010-11 मध्ये GDP ........... नि वाढला?
उत्तर :- 8.6%
प्रश्न- १०) शासकीय कर्मचाऱ्यांना ई-पेमेंट सुविधा देणारे देशातील पहिले राज्य कोणते?
उत्तर :- ओडीसा (सुरवात 10 ऑगस्ट 2012)
प्रश्न- ११) पोलो खेळाचा उगम कोणत्या राज्यात झाला आहे?
उत्तर :- मणिपूर
प्रश्न- १२) स्वतंत्र भारतात जन्म घेऊन लोकसभेचे सभापती असा मान मिळणारी पहिली व्यक्ती कोण?
उत्तर :- जी.एम.सी. बालयोगी
प्रश्न- १३) भारतीय घटने नुसार कलम 199 काय आहे?
उत्तर :- धन विधेयकाची व्याख्या
प्रश्न- १४) भारतातील सर्वांत जूनी आयआयटी कोठे आहे?
उत्तर :- खरगपूर
प्रश्न- १५) कॉम्प्यूटरच्या भाषेत 'CAD' चा अर्थ काय आहे?
उत्तर :- कॉम्प्यूटर ऍडेड डिझाइन
प्रश्न- १६) सूर्यमालेतील आठ ग्रहाच्या उपग्रहाची संख्या किती?
उत्तर :- 165 उपग्रह
प्रश्न- १७) विनोबा भावेंचे गुरु कोण??
उत्तर :- जमानलाल बजाज
प्रश्न- १८) जगातील सर्वात वेगवान रेल्वे कोणत्या देश्यात आहे?
उत्तर :- चीन मध्ये आहे. वेग: 350 किमी/तासी
प्रश्न- १९) विधवा विवाह कायदा
उत्तर :- 1856
प्रश्न- २०) विवाह नोंदणी कायदा
उत्तर :- 1976
सौजन्य- तंत्रस्नेही शिक्षक समूह, महाराष्ट्र
विज्ञान कोडे भाग - २५
विज्ञान कोडे भाग - २५
दिसतोय पाण्यासारखा, रंग माझा लाल,
प्रत्येक प्राण्यात, आहे माझा संचार
घेतले स्वतःला मी चार गटात वाटून,
पुढे चालवितो जीवन, प्राणवायु मिसळून
जर कराल मला दान, तर वाचवेन दुसऱ्याचे प्राण.
ओळखा पाहू मी आहे कोण?
उत्तर :- रक्त ( Blood )
Like our Facebook page
✍🏼 लेखक ✍🏼
SANDIP KRUSHNA
JADHAO
Chief
Editor
Noble
Science
7588090801
विज्ञान साक्षरता हाच आमचा ध्यास
ओळख मूलद्रव्यांची भाग - ४० - जस्त (झिंक)
ओळख मूलद्रव्यांची भाग - ४०
जस्त (झिंक)
ग्रीक आणि रोमन लोकांना जस्त हे मूलद्रव्य माहिती होतं, पण त्यांनी त्याचा कधी उपयोग केला नाही.

अणुक्रमांक ३० असलेले आवर्तसारणीच्या बाराव्या गणातील जस्त हे पहिले मूलद्रव्य. लोखंडापेक्षा हलका! कठीण पण ठिसूळ असणारा हा निळसर-पांढरा, चकाकणारा हा चुंबकरोधी धातू विजेचा सुमार वाहक! १००-१५० अंश सेल्सिअस तापमानाला तो मऊ होतो, सुमारे २१० अंश सेल्सिअस तापमानाला तो पुन्हा ठिसूळ बनतो आणि त्याला ठोकून पावडर करता येते. पॅरासेल्सस या किमयागाराने टोकदार रचनेवरून या मूलद्रव्याला ‘झिंके’ हे नाव दिले. जर्मन भाषेतील ‘झिंके’ या शब्दाचा अर्थ ‘दातेरी’, ‘टोकेरी’ किंवा ‘दगडासारखा’.
भारतात सु. २००० वर्षांपूर्वी जावर, राजस्थान येथे जस्ताच्या खाणी कार्यरत होत्या. इ.स.पू. सहाव्या शतकात जस्त धातूचे उत्पादन होत असल्याचे पुरावे या खाणींवरून मिळतात. १६६८ मध्ये बेल्जियममधील पी. एम्. द रेस्पॉ या किमयागाराने जस्ताच्या ऑक्साइडपासून जस्त मिळविल्याचे लिहिले आहे. १८व्या शतकाच्या सुरुवातीला एटिन फ्रँकॉइस जॉफ्रॉय ह्य़ाने जस्ताचे विगालन (smelting) करताना लोखंडाच्या सळईवर जस्ताच्या ऑक्साइडचे पिवळे स्फटिक जमा झाल्याचे वर्णन केले आहे. १७३८ मध्ये इंग्लंडमधील विल्यम चँपियन याने जस्ताच्या काबरेनेटपासून जस्त मिळविण्याचे पेटंट घेतले.
ग्रीक आणि रोमन लोकांना जस्त हे मूलद्रव्य माहिती होतं, पण त्यांनी त्याचा कधी उपयोग केला नाही. धातू म्हणून जस्ताची खरी ओळख भारतीयांनाच पटली. इ.स. ११०० ते १५०० या काळात भारतात जस्त शुद्धीकरण केले जात असे. इ.स. १५०० मध्ये चीनमध्ये मोठय़ा प्रमाणावर जस्त शुद्ध केले जात असे. १७४५ मध्ये स्वीडनच्या किनाऱ्यावर बुडालेल्या ईस्ट इंडिया कंपनीच्या जहाजामध्ये चीनमधील शुद्ध जस्त होते. असं असलं तरी शुद्ध स्वरूपात जस्त मिळविण्याचे श्रेय जर्मन रसायनतज्ज्ञ अँड्रिज मारग्राफ याला देतात. १७४६ मध्ये एक नवीन धातू म्हणून अँड्रिज मारग्राफने जस्ताचा शोध लावला.जस्त हा क्रियाशील धातू असून तीव्र क्षपणक आहे. शुद्ध जस्त हवेत ठेवल्यास हवेतील कार्बन डायऑक्साइडबरोबर अभिक्रिया होऊन त्यावर जस्त काबरेनेटचा थर जमा होतो. या थरामुळे हवा आणि पाणी यांचा जस्त धातूवर परिणाम होत नाही.
विजय ज्ञा. लाळे
मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग, चुनाभट्टी, मुंबई २२
office@mavipamumbai.org
दिनविशेष १० जुलै
दिनविशेष १० जुलै
निकोला टेसला - सर्बियाचा भौतिकशास्त्रज्ञ, संशोधक
जन्मदिन - जुलै १०, इ.स. १८५६
निकोला टेसला - सर्बियाचा भौतिकशास्त्रज्ञ, संशोधक
जन्मदिन - जुलै १०, इ.स. १८५६
निकोला टेसला (जुलै १०, इ.स. १८५६: स्मिल्यान, क्रोएशिया - जानेवारी ७, इ.स. १९४३: न्यूयॉर्क) हा मूळचा सर्बियाचा भौतिकशास्त्रज्ञ, संशोधक, विद्युत अभियंता होता. अनेक शास्त्रज्ञांच्या मते हा जगातील सर्वश्रेष्ठ अश्या वैज्ञानिकांपैकी एक होता.
त्याच्या शोध आणि शोधनिबंधात एसी विद्युत, एसी मोटर, पॉलिफेज विद्युत पारेषण या आता मूलभुत समजल्या जाण्याऱ्या वस्तूंचा समावेश आहे
सोमवार, ९ जुलै, २०१८
विज्ञान कोडे भाग - २४
विज्ञान कोडे भाग - २४
निषिद्ध आहे स्पर्श माझा,
करतो किड्या मुंग्यांचा पाहुणचार ताजा.
मानवास आहे विष माझे घातक,
निशाचर आहे विचित्र चालक.
ओळखा पाहू मी आहे
कोण?
उत्तर :- पाल ( house lizard )
वैज्ञानिक स्पष्टिकरण:- पाल हा आपल्या घरात आढळणारा निशाचर अंडज प्राणी आहे. ती किडे, मुंग्यांना खाते. तिला धोक्याची चाहूल लागताच ती आपली शेपटी कापून पळून जाते. तिच्या पायाच्या विशिष्ट रचनेमुळे ती भिंतीवर चालू शकते. पाल आपल्या शरीरावर विष साठवून ठेवते. मानवाशी तिचा संपर्क आला की ती आपल्या शरीरावरील विष सोडते व ते विष आपल्या शरीरात शिरकाव करते. म्हणून पालीला स्पर्श करू नये.
Like our Facebook page
✍🏼 लेखक ✍🏼
SANDIP KRUSHNA
JADHAO
Chief
Editor
Noble
Science
7588090801
विज्ञान साक्षरता हाच आमचा ध्यास
रविवार, ८ जुलै, २०१८
ओळख मूलद्रव्यांची भाग - ३९ - तांबे
ओळख मूलद्रव्यांची भाग - ३९
ताम्रयुग
आदिकालापासून मानवाने जे धातू वापरले त्यात तांब्याचा समावेश होता.

आवर्तसारणीतील २९ अणुक्रमांकाचे तांबे हे मूलद्रव्य क्युप्रम, लाल धातू किंवा ताम्र अशा विविध नावाने ओळखले जाते. हा संक्रमण धातू कमालीचा विद्युतवाहक आणि उष्णतावाहक आहे.
मानवी इतिहासात तांब्याचे स्थान अनन्यसाधारण आहे. आदिकालापासून मानवाने जे धातू वापरले त्यात तांब्याचा समावेश होता. अश्मयुगात मानवाने हत्यारे व भांडी बनवण्यासाठी दगडाचा वापर केला. अश्मयुगाच्या शेवटी तांब्याचा शोध लागला आणि तांब्याच्या वर्धनीयता (ठोकल्यावर प्रसरण पावणे) या गुणधर्मामुळे दगडाऐवजी या धातूचा वापर करायला सुरुवात झाली. अशाप्रकारे वापरला गेलेला तांबे हा पहिलाच धातू.
तांब्याच्या या उपयुक्ततेमुळे नैसर्गिक तांब्याच्या साठय़ांचा शोध सुरू झाला. इ.स.पू. ६०००च्या सुमारास उष्णतेने तांबे वितळते व त्याला पाहिजे तो आकार देण्यात येतो, असा शोध लागला. इथूनच धातू विज्ञानाला सुरुवात झाली आणि म्हणून हा काळ ताम्रयुग म्हणून ओळखला जातो. यानंतर तांबे आणि कथिल यांचे मिश्रण करू नकास्य (bronze) तसेच तांबे व जस्त एकत्र करून पितळ (brass) हे उपयुक्त असे मिश्रधातू बनवण्यात आले. इ.स.पू. ६०० मध्ये तांब्याची नाणी चलनात आली आणि तांबे हे मूलद्रव्य नाणी-धातू (coinage metal) म्हणूनही ओळखले जाऊ लागले.काही वर्षांपूर्वी तांब्या-पितळेची भांडी वापरणे प्रतिष्ठेचे मानले जायचे. वाढत्या किमतीमुळे तांब्याच्या भांडय़ांची जागा स्टील, अॅल्युमिनिअमने घेतली. तांब्याचा हवेशी संपर्क झाल्याने होणाऱ्या ऑक्सिडेशनमुळे येणारा हिरवट रंग या समस्येमुळेही ही भांडी वापरणे मागे पडले. आता पुन्हा एकदा तांब्याच्या उष्णता सुवाहकता गुणधर्मामुळे तळाला तांब्याचा लेप असलेल्या भांडय़ांचा वापर सुरू झाला आहे. आयुर्वेदात तांब्याचे महत्त्व वर्णिले असल्यानेही तांब्याची भांडी उपयोगात आणली जातात.
दैनंदिन वापरात जरी ही भांडी मागे पडली असली तरी शोभेच्या वस्तू म्हणून तांब्या-पितळेच्या भांडय़ांनी घरात तसेच महागडय़ा हॉटेलमध्ये आपली एक स्वतंत्र जागा बनवली आहे. या वस्तूंमध्ये पाणी तापवण्यासाठीचे तांब्याचे बम्ब, आंघोळीसाठी घंगाळी, हंडे, पातेली, कळशा, पराती यांचा समावेश होतो.
चांदीनंतर तांब्याचा विद्युतवाहकतेमध्ये दुसरा क्रमांक लागतो. तांब्याचा वापर विद्युततारा बनवण्यासाठी, उष्णतेवर चालणाऱ्या उपकरणामध्ये तसेच अभियांत्रिकी उद्योगात व सोन्यात काठिण्य आणण्यासाठी त्याचा सर्रास वापर केला जातो.
– जोत्स्ना ठाकूर
मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग, चुनाभट्टी, मुंबई २२
दिनविशेष ९ जुलै
दिनविशेष ९ जुलै
एलियस हाॅवे - शिलाई मशीनच्या निर्मितीसाठी प्रसिद्ध
जन्मदिन - ९ जुलै १८१९
एलियस हाॅवे - शिलाई मशीनच्या निर्मितीसाठी प्रसिद्ध
जन्मदिन - ९ जुलै १८१९
हे एक अमेरिकन शोधक होते आणि आधुनिक लॉकची शिलाई असलेल्या मशीनच्या निर्मितीसाठी प्रसिद्ध होते.
इतर बर्याच लोकांनी हाॅवे यांच्याआधी या यंत्राची कल्पना केली होती.
१७९० च्या सुरुवातीस, काहींनी हाॅवे यांच्या डिझाईन्सची पेटंट घेतली आणि कार्यरत मशीन निर्माण केली, नंतर हॉवेने त्याच्या पूर्वीच्या डिझाईन संकल्पनांमध्ये लक्षणीय सुधारणा केली आणि १० सप्टेंबर, १८४६ रोजी लॉक स्टिचडिझाइनच्या शिलाई मशीनसाठी पेटंट घेतले. त्यांच्या मशीनमध्ये सर्वात अत्याधुनिक यंत्रसामग्री असलेल्या तीन आवश्यक वैशिष्ट्यांचा समावेश होता:
१) डोळ्याच्या आकाराचे छिद्र असणारी सुई.
२) कपड्याखालुन शटलच्या सहाय्याने शिवण टिप मारण्याची पद्धत
३) शिवणकामासाठी लागणारा स्वयंचलित पुरवठा
ओळख मूलद्रव्यांची भाग - ३८ - निकेल
ओळख मूलद्रव्यांची भाग - ३८
निकेल
निकेल
निकेल स्टेनलेस स्टील, नायक्रोम अशा संमिश्रांमध्ये वापरला जातो.

आवर्तसारणीमध्ये अणुक्रमांक २८ असलेला निकेल (Ni) हा सल्फर आणि लोह यांबरोबरच पृथ्वीच्या गाभ्यातील एक महत्त्वाचा घटक आहे. सोनेरी छटा असलेला परंतु हुबेहूब चांदीसारखा दिसणारा धातू अशी याची ओळख! इ.स. पूर्व ३५०० पासून निकेलचे विविध वापर केले गेल्याचे आढळते. निकेल हे जर्मन शब्द कफरनिकेल (kupfernickel) याचे संक्षिप्त रूप आहे. जर्मनीत तांब्याच्या खाणींमध्ये सापडणारे हे मूलद्रव्य! तांबे मिळविताना १७५१ मध्ये निकेलाईन हे निकेलचे खनिजएक्सेल फ्रेडरिक क्रोन्स्टेड ह्य़ांना सापडले. खरं तर खनिजातून तांबे मिळविताना निकेलचा शोध लागला. निकेल गंजत नाही, त्यामुळे लोखंडापेक्षा चांगला आणि चांदीसारखा चकाकणारा धातू म्हणून निकेलच्या वापराला प्राधान्य दिले जात असे. गंजत नसल्यामुळे निकेलचा उपयोग बऱ्याच देशांच्या चलनामध्ये (नाणी तयार करण्यासाठी) मोठय़ा प्रमाणावर केला जातो. एकोणिसाव्या शतकाच्या मध्यापासून निकेल धातू नाण्यांमध्ये वापरला गेला. एकविसाव्या शतकात मात्र निकेलच्या वाढत्या किमतीमुळे हा वापर कमी झाला आहे.
निकेल स्टेनलेस स्टील, नायक्रोम अशा संमिश्रांमध्ये वापरला जातो. इस्त्री, पाणी गरम करण्याचे उपकरण अशा विजेवर उष्णता निर्माण करणाऱ्या उपकरणांमध्ये निकेल आणि क्रोमिअमचा संमिश्र असलेल्या नायक्रोमचा वापर केला जातो. निकेल रासायनिक दृष्टीने अतिक्रियाशील असल्याने उत्प्रेरक म्हणून वापरला जातो. निकेलच्या सर्वात जास्त खाणी रशिया, कॅनडा, ऑस्ट्रेलिया आणि इंडोनेशिया या देशांत आहेत. भारत मात्र निकेल संपूर्णपणे आयात करतो. चुंबक, बॅटरी, रिचार्जेबल बॅटरी जसे, निकेल कॅडमिअम तसेच निकेल धातू हायड्राईड बॅटरीमध्येदेखील निकेल हा अतिशय महत्त्वाचा घटक आहे. काचेमध्ये निकेल मिसळले असता काचेला हिरवा रंग येतो. अल्निको या निकेलच्या संमिश्रापासून कायमस्वरूपी चुंबक तयार केले जातात. अल्निको हे लोखंडाचे संमिश्र आहे ज्यात लोखंडाबरोबर अॅल्युमिनिअम, निकेल आणि कोबाल्ट यांचा समावेश असतो. काही वेळा तांबे आणि टिटॅनिअमही यात असते.बुरशीसारख्या परजीवी तसेच काही जिवाणूमध्ये निकेल आढळते. निकेल मानवी शरीरासाठी घातक आहे. त्याचे शरीरातील जास्त प्रमाण हे श्वसनाच्या विकारांना निमंत्रण देऊ शकते. तसेच काही जणांना निकेल धातूच्या अॅलर्जीमुळे त्वचा विकारही संभवतात. निकेलची बारीक पूड श्वसनामार्फत शरीरात गेली असता कर्करोग होऊ शकतो.
– ललित जगन्नाथ गायकवाड
मराठी विज्ञान परिषद,
वि. ना. पुरव मार्ग, चुनाभट्टी, मुंबई २२
विज्ञान कोडे भाग - २३
विज्ञान कोडे भाग - २३
अंग माझे खवलेदार,
भाजी होते शानदार.
चव आहे माझी सर्वात कडू,
आजाराला अंगावर नाही देत चढू .
खाईल मला तो तोंड करेल वाकडा,
टांगलाय वेलीवर जसा हिरवा चुडा.
ओळखा पाहू मी आहे
कोण?
उत्तर :- कारले (Bitter Gourd)
वैज्ञानिक स्पष्टिकरण:- कारले हे चवीला अत्यंत कडू असणारी फळभाजी आहे. ही एक आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे. कारल्यामध्ये कॅल्शियम, फॉस्फोरस, जीवनसत्त्व, कार्बोदके व प्रथिने असतात. कच्च्या कारल्याचे ज्युस पिल्याने रोगप्रतिकार शक्ती वाढते. कारले हे मधुमेहावर अत्यंत गुणकारी आहे.
Like
our Facebook page
✍🏼 लेखक ✍🏼
SANDIP KRUSHNA
JADHAO
Chief
Editor
Noble
Science
7588090801
विज्ञान साक्षरता हाच आमचा ध्यास
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)