सुस्वागतम! सुस्वागतम!! सर्व सन्माननीय शिक्षणप्रेमी वाचक बंधु भगिनींचे आश्रमशाळा शिक्षकमित्र या शैक्षणिक ब्लॉगवर आपले हार्दिक स्वागत आहे

शनिवार, १६ जून, २०१८

ओळख मूलद्रव्यांची भाग-१६ फुलेरिन

ओळख मूलद्रव्यांची भाग-१६

फुलेरिन – कार्बनचे प्रसिद्ध अपरूप

निसर्गात काही मूलद्रव्ये एकापेक्षा अधिक रूपांत आढळतात.

निसर्गात काही मूलद्रव्ये एकापेक्षा अधिक रूपांत आढळतात. या रूपांत रासायनिक गुणधर्म यासारखे असतात; मात्र भौतिक गुणधर्म भिन्न असतात, त्यांना मूलद्रव्याची अपरूपे म्हणतात. १९८५ मध्ये कार्बनच्या अपरूपाच्या सर्वात नवीन सदस्याने आपली उपस्थिती दर्शविली. रिचर्ड स्मॉली, रॉबर्ट कर्ल आणि हॅरी क्रोटो या तीन शास्त्रज्ञांनी, वातावरणात आढळणाऱ्या कार्बन समूहावर एकत्र संशोधन केले. ज्यात कार्बनचे अणू एकमेकांवर आदळून गोलाकार विशिष्ट रचना तयार करतात. आश्चर्याची गोष्ट म्हणजे हे संशोधन हस्टन (यू.एस.ए.) येथील राईस विद्यापीठात पंधरा दिवसात झाले. लगेचच या संशोधनाची दखल, नेचर या मासिकाने घेतली. या संशोधनाने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले. विज्ञानाच्या क्षेत्रात कुठल्याही संशोधनाला क्वचितच मिळाली असेल अशी प्रसिद्धी या संशोधनाला मिळाली. पुढली ५-१० वर्षे शास्त्रज्ञ कार्बनच्या या अपरूपाचे गुणधर्म, अभिक्रिया आणि त्याची साधिते (डेरिव्हेटिव्ह) सांगण्यात व्यस्त होते.१९९६मध्ये या शोधाबद्दल तीनही शास्त्रज्ञांना रसायनशास्त्राचे नोबेल पारितोषिक मिळाले.रिचर्ड बकिमस्टर फुलर या अमेरिकन वास्तुविशारदाने केलेल्या गोलाकार घुमटाच्या आकाराच्या असलेल्या साम्यामुळे फुलेरिन हे नाव या अपरूपाला देण्यात आले. फुलेरिन ६० या कार्बनच्या अपरूपात २० षटकोन आणि १२ पंचकोन जोडलेले असतात.  कोणताही पंचकोन दुसऱ्या पंचकोनाला जोडलेला नसतो. याचा आकार साधारणपणे फुटबॉलसारखा दिसतो. फुलेरिनच्या या विशिष्ट रचनेमुळे अभियांत्रिकी, गणित, वास्तुशास्त्र यातील विज्ञान संशोधनाच्या शाखा आणखी उलगडत गेल्या.सुरुवातीला फुलेरिनचे रेणू हे १२,५०० निरनिराळ्या संरचनेचे फलित असेल असे प्रस्तावित होते. त्यामुळे फुलेरिन हे बेंझीनप्रमाणे किंवा त्यापेक्षा कैकपटीने जास्त रासायनिक स्थिरता प्राप्त झालेले पाहायला मिळाले असते, पण तसे नव्हते. फुलेरिन हे रासायनिकदृष्टय़ा बरेच सक्रिय आहे.   फुलेरिन अणू सहज इलेक्ट्रॉन देतो किंवा घेतो. त्याच्या या गुणधर्मामुळे बॅटरी तसेच अन्य विद्युतउपकरणांमध्ये फुलेरिन वापरला जाऊ शकतो.फुलेरिनची साधिते अनेक क्षेत्रांत उपयुक्त आहेत. अल्कलीधातूंबरोबर फुलेरिन अतिसंवाहक (superconductor)  आहे. याला फुलराइड्स असेही म्हणतात. फुलेरिन आयन असलेले हे रासायनिक संयुग आहे. वैद्यकीय आणि भौतिक विज्ञान क्षेत्रात फुलेरिनचे अनेक उपयोग  आहेत. जलशुद्धीकरणात फुलेरिनचा उत्प्रेरक म्हणून वापर प्रस्तावित आहे.
-डॉ. अनिल कर्णिक
मराठी विज्ञान परिषद,
वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२ 

दिनविशेष १६ जून

दिनविशेष १६ जून
१६ जुन १९६३-व्हॅलेन्तिना तेरेश्कोवा जगातील पहिली स्त्री अंतराळयात्री झाली
वालेंतिना व्लादिमिरोव्ना तेरेश्कोवा (रशियन: Валенти́на Влади́мировна Терешко́ва; जन्म: ६ मार्च १९३७) ही रशियन व्यक्ती अंतराळात पोचलेली जगातील पहिली महिला आहे. वोस्तोक ६ हे अंतराळयान चालवण्यासाठी सुमारे ४०० हून अधिक अर्जदारांमध्ये व सोडतीच्या अंतिम फेरीत पोचलेल्या पाच उत्सुक व्यक्तींमध्ये तेरेश्कोवाची निवड झाली. पेशाने एक यंत्रमाग कामगार असलेल्या तेरेश्कोवाला अंतराळयात्री बनवण्यासाठी अगोदर सोव्हियेत वायूसेनेमध्ये दाखल करण्यात आले. १६ जून १९६३ रोजी तिने वोस्तोक ६ हे यान उडवले. ती २ दिवस, २३ तास व १२ मिनिटे अंतराळामध्ये होती.

तेरेश्कोवाला सोव्हियेत संघामध्ये प्रचंड लोकप्रियता मिळाली व १९६९ साली तिने सोव्हियेत संघाच्या कम्युनिस्ट पक्षाचेसदस्यत्व घेतले. तेरेश्कोवाला सोव्हियेत संघाचा वीर हा देशामधील सर्वोच्च पुरस्कार तसेच बहुसंख्य राष्ट्रीय पुरस्कार मिळाले. तेरेश्कोवा राजकारणामध्ये कार्यरत राहिली व तिने सोव्हियेतमध्ये व जगात अनेक संस्थांमध्ये महत्त्वाची पदे भूषवली. तेरेश्कोवा सोत्शी येथील २०१४ हिवाळी ऑलिंपिक स्पर्धेसाठी ऑलिंपिक ध्वजरोहक होती

ओळख मूलद्रव्यांची- भाग-१५- कार्बन

ओळख मूलद्रव्यांची- भाग-१५

अफलातून कार्बन

इतिहासपूर्व काळापासून मानवाला कोळसा व काजळी हे कार्बनचे प्रकार ज्ञात होते.

अणुक्रमांक सहा असलेल्या कार्बन या मूलद्रव्याचा आवाका अचंबित करणारा आहे. सध्या ज्ञात असलेल्या कार्बनी संयुगांची संख्या जवळजवळ दहादशलक्षच्या घरात आहे. रसायनशास्त्रज्ञांच्या मतानुसार ९५ टक्के पदार्थाचा मुख्य घटक कार्बन असावा. आपल्या आजूबाजूला असलेल्या अनेक पदार्थामध्ये अस्तित्व असलेल्या कार्बनच्या अणूंची रचना साध्यापासून जटिल प्रकारापर्यंत वेगवेगळी असते. हे मूलद्रव्य अविश्वसनीय वाटावे असे आहे. अणूंची रचना विशिष्ट पद्धतीने झाली असता कार्बनचा अत्यंत मृदू असा ग्रॅफाइट प्रकार मिळतो तर त्याच रचनेत काही फेरफार घडता तोच जगातील सर्वात कठीण पदार्थ हिरा असतो.इतिहासपूर्व काळापासून मानवाला कोळसा व काजळी हे कार्बनचे प्रकार ज्ञात होते. तसेच प्राचीन काळी चीनमध्ये हिरा हा कार्बनचा आणखी एक प्रकार वापरात होता. परंतु कार्बनची मूलद्रव्य म्हणून ओळख अठराव्या शतकाच्या उत्तरार्धात झाली. काबरे (कोळसा) या लॅटिन शब्दावरून याचे नामकरण कार्बन असे केले. फ्रेंच शास्त्रज्ञ अ‍ॅन्टोनी लॅवोझिएरने काही प्रयोग करून सिद्ध केले की ग्रॅफाइटप्रमाणेच हिऱ्याच्या ज्वलनानंतर कार्बन डायऑक्साइड तयार होतो.विश्वात सापडणाऱ्या विपुल मूलद्रव्यांमध्ये कार्बनचा चौथा क्रमांक लागतो. सूर्य अणि इतर तारे, धूमकेतू तसेच अनेक ग्रहांच्या वातावरणात (कार्बन डायऑक्साइडच्या स्वरूपात) कार्बन आढळतो. ताऱ्यांच्या गर्भात केन्द्रकीय संमीलन प्रक्रियेतून कार्बनची निर्मिती होते. पृथ्वीतलावर जीवसृष्टीसाठी आवश्यक असणाऱ्या घटकांमध्ये कार्बनचा सिंहाचा वाटा आहे. कार्बनची नैसर्गिक विपुलता, विशिष्ट विविधता व स्वत:च्या अणूंशी जोडणी करीत बहुवारिके (पॉलिमर) तयार करण्याची क्षमता, यामुळे तो सर्व सजीवसृष्टीचा समान व मूलभूत घटक आहे. कार्बनशिवाय वनस्पतींना अन्न तयार करणे शक्य नाही, तयार केलेल्या अन्नाचा कार्बन हा घटक असून त्याच्याशिवाय प्राणिमात्रांचे पोषण होऊ शकत नाही. मानवाच्या शरीरात त्याचे वस्तुमान दुसऱ्या क्रमांकाचे १८.५ टक्के  इतके आहे.कार्बनचक्र हे निसर्गातील पुनर्चक्राचे उत्तम उदाहरण आहे. पर्यावरणातील जैविक व अजैविक घटकांतील कार्बनचे विविधरूपी हस्तांतरण. निसर्गाकडून घेतलेले कार्बनजन्य घटक निसर्गाला परत केले जातात. जेणेकरून मूलद्रव्यी कार्बन कमी होत अथवा वाढत नाही, यात जैविक घटकांचे पोषण होते व त्यांच्या टाकाऊ पदार्थातून वायुरूपी कार्बनचा निसर्गात समतोल राखला जातो.
मीनल टिपणीस :
मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२ office@mavipamumbai.org

ओळख शास्त्रज्ञांची - आधुनिक आवर्तसारणी

ओळख शास्त्रज्ञांची-

कुतूहल – आधुनिक आवर्तसारणी

आज एकूण ११८ मूलद्रव्ये ज्ञात असून त्यांची मांडणी आधुनिक आवर्तसारणीत शास्त्रोक्त पद्धतीने केली आहे.

आज एकूण ११८ मूलद्रव्ये ज्ञात असून त्यांची मांडणी आधुनिक आवर्तसारणीत शास्त्रोक्त पद्धतीने केली आहे. हेन्री मॉसले यांनी मेंडेलिव्ह सिद्धांत सुधारताना आधुनिक आवर्तसारणीत मूलद्रव्यांची मांडणी त्यांच्या अणुक्रमांकानुसार केल्याने मेंडेलिव्हच्या आवर्तसारणीतील त्रुटी दूर झाल्या. मूलद्रव्यांचे भौतिक व रासायनिक गुणधर्म त्यांच्या अणुक्रमांकाचे आवर्ती कार्य आहे असा सिद्धांत त्याने मांडला. आधुनिक आवर्तसारणी या सिद्धांतावर आधारित आहे. आवर्तसारणीच्या रचनेत आडव्या रांगांना आवर्त (पिरियड) तर उभ्या स्तंभांना गण (ग्रूप) म्हणतात.आधुनिक आवर्तसारणीत मूलद्रव्यांची मांडणी सात आवर्त व अठरा गणांमध्ये केली आहे. आवर्ताचा क्रमांक मूलद्रव्यातील ऊर्जा-स्तरांची (एनर्जी लेव्हल्स) संख्या दर्शवितो. जसे चौथ्या आवर्तामधील मूलद्रव्यांमध्ये ऊर्जेचे चार स्तर (K, L, M, N) आढळतात. प्रत्येक आवर्ताच्या सुरुवातीचे मूलद्रव्य अत्यंत क्रियाशील तर शेवटचे निष्क्रिय असते. आवर्त क्र. १ मध्ये दोन मूलद्रव्ये, क्र. २ व ३ मध्ये आठ मूलद्रव्ये, क्र. ४ व ५ मध्ये १८ मूलद्रव्ये, क्र. ६ मध्ये ३२ मूलद्रव्ये व क्र. ७ मध्ये सध्या ३२ मूलद्रव्ये असून त्यांना अनुक्रमे लघुतम, लघु, लांब, अति लांब व अपूर्ण आवर्त असे म्हणतात.आधुनिक आवर्तसारणीत समान इलेक्ट्रॉन संरूपण असलेली मूलद्रव्ये एकाखालोखाल एक येऊन त्यांचा गण तयार होतो. मूलद्रव्याचे रासायनिक गुणधर्म त्याच्या लेक्ट्रॉन संरूपणावर अवलंबून असतात म्हणूनच ठरावीक अंतराने गुणधर्माची पुनरावृत्ती होते. गणातील मूलद्रव्ये एका कुटुंबातील सदस्यांप्रमाणे स्वतंत्र असली तरी समान वैशिष्टय़े दाखवतात. त्यांच्या गुणधर्मात चढ- उताराचा निश्चित कल दिसून येतो. ग्रूप क्र. १, २, १३, १४, १५, १६ व १७  मधील मूलद्रव्यांना सामान्य तसेच क्र ३, ४, ५, ६, ७, ८, ९, १०, ११  व १२ च्या मूलद्रव्यांना संक्रमण तर १८व्या ग्रूपमधील मूलद्रव्यांना निष्क्रिय वायू (इनर्ट अथवा नोबल गॅस) म्हणतात.खालच्या बाजूस दोन रकान्यांत मांडलेल्या मूलद्रव्यांना अनुक्रमे लँथनाइड व अ‍ॅक्टिनाइड म्हणतात. बाकीचे ग्रूप्स विस्कळीत न होता सुसूत्रता साधण्यासाठी सदर मूलद्रव्यांची मांडणी स्वतंत्रपणे केली गेली. अधिक माहितीसाठी :
– मीनल टिपणीस मराठी विज्ञान परिषद,  वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२

दिनविशेष १५ जून

दिनविशेष १५ जून
             १५ जुन १७५२ - बेंजामिन फ्रँकलिनने आकाशातील वीज ही वीज असल्याचे सिद्ध केले.
वैज्ञानिक शोधांमागील सत्यकथांच्या मालिकेला सुरुवात करतांना अमेरिकेच्या ज्या एका महान व्यक्तिमत्वाचा आणि त्याच्या पतंग उडविण्याच्या ऐतिहासिक घटनेचा ओझरता उल्लेख केला होता, त्यावर आज तपशीलात जाऊन विस्ताराने  लिहिणार आहे. अमेरिकन इतिहासातील एक मोठे मिथक म्हणून आजही ज्याची नोंद आहे, ते म्हणजे  बेंजामिन फ्रॅंकलिन आणि त्यांचा  पतंग. शाळेच्या पुस्तकातून आपण वाचत आलो, की बेन्जामिन महाशय एकदा बाहेर पडले असतांना, अचानक आलेल्या भर वादळात त्यांनी आपला पतंग उडवला आणि त्या पतंगावर वीज कोसळली. अशा प्रकारे बेंजामिन यांनी अपघाताने का होईना, विजेचा शोध लावला.
सुदैवाची गोष्ट अशी, की बेंजामिन यांचे नशीब त्यावेळी त्याहून जोरदार होते. अहो, जर ती वीज खरोखरच त्या पतंगावर पडली असती, तर आमचे बेंजामिनमहाशय त्यानंतर झालेल्या अमेरिकेच्या ऐतिहासिक स्वातंत्र्य जाहीरनाम्यावर सही करण्यास उपस्थित राहू शकले नसते. 
१७४६ मधील बॉस्टन शहराच्या भेटीच्या वेळी  बेंजामिन फ्रॅंकलिन यांच्यासमोर डॉ. अ‍ॅडॅम स्पेन्सर या स्कॉटिश प्राध्यापकाने  विद्युत शक्तीवरील एका प्रयोग करून दाखवला. स्थिर विद्युतशक्तीच्या या प्रयोगात अति उच्च दाबामुळे उडालेल्या ठिणग्या पाहून फ्रॅंकलिन महाशय अत्यंत प्रभावित झाले. त्यांनी स्पेन्सर यांचे ते उपकरण विकत घेऊन टाकले. त्याशिवाय आणखी काही प्रयोग करण्याच्या नादात  फ्रॅंकलिन इतके पडले की पीटर कोलीन्सन या त्यांच्या इंग्लंडमधील मित्राने,  आणखी काही सामग्री तसेच त्याने केलेल्या प्रयोगांच्या नोंदी बेन्जामिन यांना पाठवल्या.
हा सारा विषय फ्रॅंकलिन यांना इतका भावला की त्यांनी त्याबाबतीत युरोपमधील काही आघाडीच्या संशोधकांशी संपर्क साधला. त्यांचा असा दावा होता की ही विद्युतशक्ती दोन प्रकारची आहे. एखादी काचेची कांडी घासली, की त्यात  स्थिर विद्युत शक्ती निर्माण होते आणि ती कांडी एखादा हलका चेंडू आकर्षित करू शकते. फ्रॅंकलिन यांच्या प्रयोगांमुळे युरोपात उत्साहाची लाटच जणू आली. विद्युत शक्तीचा अभ्यास करणा-या या व्यक्तिमत्वाविषयी  कुतूहल निर्माण झाले.
वयाची  बेचाळीस वर्षे पूर्ण होत असतांना मुद्रणाच्या व्यवसायात नाव कमावणा-या फ्रॅंकलिन यांनी आता आपले लक्ष विद्युत शक्तीतील प्रयोगांवर केद्रित केले. त्यांना आता जाणून घ्यायचे होते की आकाशातली वीज आणि स्थिर विद्युत शक्ती यांचा काही परस्परांशी निकटचा संबध आहे की काय,  त्यांचे  मूळ  एकच आहे की काय ? एका ढगातून दुस-या ढगाकडे आणि त्या ढगापासून  पृथ्वीकडे   होणारा विद्युत शक्तीचा प्रवास, हीच कोसळणा-या वीजेबाबतची आपली संकल्पना  बरोबर आहे की काय,  हे  पडताळून पाहण्यासाठी  मग १७४९ मध्ये फिलाडेल्फिया येथे प्रयोग केले गेले. तरीही त्यांना हवे होते की हा वादळी वातावरणातील ढगातून कडाडून होणारा विजेचा कल्लोळ कसा काय “पकडता” येईल. आणि मग तसे झाले तर,  तो एखाद्या कुपीत साठवून त्यावर अभ्यास करता येईल काय ? म्हणून त्यांनी ढगातून होणा-या विद्युत भारावर प्रयोग करण्याचे  योजले. ते असे काहीसे होते :-
      ” एखाद्या उंचच उंच मनो-यावर अथवा सुळक्यावर पहारेक-याच्या खोलीसारख्या (sentry-box) एका बंद कक्षाची स्थापना करा की ज्यात एक माणूस व एक विद्युत टेबल (electrical stand)  असेल.  त्या टेबलाच्या मध्यभागी एक लोखंडी रॉड उभा करा. त्याचे टोक वाकवून  वरच्या दिशेला वीस ते तीस  फूट एवढे दाराबाहेर आणा. ते टेबल मात्र स्वच्छ आणि कोरडे ठेवायला पाहिजे. जेव्हा आकाशात ढग त्या मनो-याजवळून जात असतील तेव्हा त्या खोलीतील माणसाने टेबलावर उभे राहावे. विजेचा धक्का किंवा विजेच्या  लोळातून निर्माण होणा-या ठिणग्या यांपासून त्या माणसाला इजा न होण्याची प्रतिबंधक  योजना करा. “
प्रिस्टले लिहिलेल्या प्रयोगाच्या  वृत्तांतातील एक वाक्य वाचा  :-
” एक आशेचा ढग आला आणि काहीही न घडता निघून गेला. तेवढ्यात दोरी सैल झालेली आढळली. फ्रॅंकलिन यांनी आपल्या बोटाने ती किल्ली धरली आणि शोधाची समाप्ती झाली. फ्रॅंकलिन यांना एक जाणवेल असा विजेचा हलकासा धक्का बसला होता. “

फ्रॅंकलिन यांच्या किल्लीवर ठिणग्या पडत होत्या आणि विद्युत शक्ती एका घटामध्ये (Leyden jar)    जमा होत होती. येथे एक महत्वाची गोष्ट नमूद केली पाहिजे, की कोणत्याही क्षणी फ्रॅंकलिन यांच्या पतंगावर वीज कोसळली नव्हती. ढगातून कोणत्याही प्रकारचा धक्का पतंगाला जाणवला नव्हता. खरे पाहिले तर तो फ्रॅंकलिन यांचा उद्देशही नव्हता. त्यांना फक्त ढगामधून दोरीच्या माध्यमातून विद्युत भार जमा करायचा होता. ती दोरी फ्रॅंकलिन जमिनीला लावेपर्यंत विद्युत भारीत झाली होती आणि फ्रॅंकलिन  यांचे बोट त्या किल्लीला लागल्यावर तो भार त्यांच्या शरीरातून जमिनीत गेला होता.

ओळख मूलद्रव्यांची भाग -१४ - बोरॉन

ओळख मूलद्रव्यांची भाग -१४

बोरॉन

बोरॉन हे बोरॉन-१० आणि बोरॉन-११ या दोन समस्थानकाच्या स्वरूपात आढळते.

निसर्गात बोरॉन हे बोरेट, बोरॅक्स आणि केर्नायीट या खनिजांच्या स्वरूपात मिळते. आपल्याला बोरॉनची ओळख ही बोरिक अ‍ॅसिड या औषधी पदार्थामुळे झालेली असते. कधी कुठे खरचटले किंवा थोडी ओलसर जखम झाली की लावा बोरिक अ‍ॅसिड.सन १८०८ मध्ये ‘सर हम्फ्री डेव्ही (ब्रिटिश)’ आणि त्याच वर्षी ‘जोसेफ लुईस गे-लुसेक’ व ‘लुईजॅक थिनर्ड (फ्रांस)’ यांना बोरॉनच्या संयुगापासून बोरॉन हे मूलद्रव्य वेगळे करण्यात यश आले.बोरॉन हे बोरॉन-१० आणि बोरॉन-११ या दोन समस्थानकाच्या स्वरूपात आढळते. बोरॉनचे खडे काळसर चंदेरी असतात, पण त्यांची पूड केली कीमात्र त्याचा रंग तपकिरी दिसतो.साधी काच जिला आपण सोडालाइम काच म्हणतो ती बराच वेळ तापवल्यावर तडकते, पण बोरॉनयुक्त बोरोसिलीकेट काच मात्र कितीही तापमानापर्यंत तापविल्यावरसुद्धा तडकत नाही. बरेचसे बोरॉन अशी काच बनविण्यात वापरले जाते, तर काही बोरॉन ग्लासफायबर आणि फायबर ग्लास बनविण्यात वापरले जाते.असे म्हटले जाते की, बोरॉनच्या उपस्थितीमुळे मंगळ ग्रहावर सर्वप्रथम आर.एन.ए. बनले आणि ते नंतर एका लघुग्रहाच्या धडकीमुळे पृथ्वीवर येऊन पडले ज्यातून जीवनाचा उगम झाला.आपल्या आरोग्यासाठी जी मूलद्रव्ये उपयुक्त म्हटली जातात त्यात बोरॉन हे तसे अपरिचितच नाव वाटते; पण शेतीसाठी जसे याचे महत्त्व अनन्यसाधारण आहे तसेच आपल्या आरोग्यातही याचा वाटा विसरता येण्याजोगा नाही. मजबूत हाडे, स्नायूंचा समन्वय, पुरुषांमधील प्रजनन क्षमतेची कमतरता, एवढेच नाही तर विचारशक्ती वाढण्यासाठीही याची आत्यंतिक गरज पडते. संधिवात झाल्यास किंवा टेस्टोस्टेरॉनची पातळी कमी झाल्यास बोरॉनयुक्त औषधे दिली जातात.आजच्या युगात कॅन्सर हा रोग दुर्धर मानला जातो. केमोथेरपी केल्यास रोगी पेशींबरोबरच निरोगी पेशीही मारल्या जातात; पण बोरॉन न्यूट्रॉन कॅपचर थेरपी वापरल्यास फक्त रोगी पेशीच मारल्या जातात. या संशोधनाचे श्रेय जी. एल. लोच्रर यांनी १९३६ साली केलेल्या संशोधनाला दिले जाते.अशा तऱ्हेने पृथ्वीवर सर्व मूलद्रव्यांमध्ये अवघे ०.००००८६ टक्के एवढाच वाटा असणारे बोरॉन एका दुर्धर रोगापासून मानवाला वाचवणारे वरदान ठरत आहे.
– डॉ. विद्यागौरी लेलेमुंबई
मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्गचुनाभट्टी,  मुंबई २२ 

ओळख शास्त्रज्ञांची- आवर्त सारणीचा पितामह मेंडेलिव्ह

ओळख शास्त्रज्ञांची-

आवर्तसारणीचा पितामह मेंडेलिव्ह

मूलद्रव्यांना योग्य स्थान देऊन त्यांची शास्त्रोक्त पद्धतीने मांडणी करण्याचा ध्यास त्यांनी घेतला होता.

महान रशियन शास्त्रज्ञ ‘दिमित्री मेंडेलिव्ह’ रसायनशास्त्राला मान्य असलेल्या आवर्तसारणीचे जनक! त्यांना रसायनशास्त्राविषयी आत्मीयता होतीच, पण मूलद्रव्यांना योग्य स्थान देऊन त्यांची शास्त्रोक्त पद्धतीने मांडणी करण्याचा ध्यास त्यांनी घेतला होता. मूलद्रव्यांची मांडणी अणुवस्तुमानाच्या चढत्या क्रमाने करताना समान गुणधर्म असलेली मूलद्रव्ये एकाखालोखाल येऊन त्यांचे उभे स्तंभ तयार झाले. मेंडेलिव्हने मूलद्रव्यांची विभागणी केलेल्या आठ उभ्या स्तंभांमधील पहिल्या स्तंभामध्ये हायड्रोजन, लिथिअम, सोडिअम, पोटॅशिअम इत्यादी मूलद्रव्ये टाकली. परंतु आडव्या रांगेत लिथिअम, बेरिलिअम, बोरॉन, कार्बन अशी चढत्या अणुवस्तुमानानुसार मांडणी केली. तिसऱ्या उभ्या गटामध्ये या आडव्या रांगेत त्यांनी जागा रिकाम्या सोडल्या. असे का ते आता पाहू! मेंडेलिव्हने असे बघितले की टिटॅनिअमचे रासायनिक व भौतिक गुणधर्म कार्बन व सिलिकॉनसारखे आहेत. म्हणून त्यांनी कार्बन-सिलिकॉननंतर टिटॅनिअम ठेवला. परंतु कॅल्शिअमनंतरची जागा रिकामी ठेवली. त्यानंतर दोन जागाही िझकनंतर रिकाम्या ठेवल्या. त्यांना खात्री वाटत होती की बोरॉन, अ‍ॅल्युमिनिअम व सिलिकॉनच्या गुणधर्माप्रमाणे नवीन मूलद्रव्ये भविष्यात शोधली जातील. रिकाम्या जागेतील मूलद्रव्यांना नावे देताना ‘इका’   या शब्दाचा वापर त्यांनी केला. इका बोरॉन (स्कँडिअम), इका अ‍ॅल्युमिनिअम (गॅलिअम ), इका सिलिकॉन (जम्रेनिअम), इका मँगनीझ (टेक्निशिअम) अशा शोध न लागलेल्या चार मूलद्रव्यांच्या अस्तित्वाची त्यांना खात्री होती. खरोखरच काही काळानंतर स्कँडिअम, गॅलिअम, जम्रेनिअम, टेक्निशिअम यांनी मेंडेलिव्हच्या रिकाम्या जागा घेतल्या.खरे तर जसजसे मूलद्रव्यांविषयी अधिक संशोधन होत गेले तसतसे त्यांचे रासायनिक गुणधर्म निश्चित होत गेले, तसेच त्यांच्या अणुभारामध्येही अचूकता आली.  पण अगदी सुरुवातीला म्हणजे इ.स. १८६७ मध्ये मेंडेलिव्हने अगोदर निश्चित केलेल्या काही अणुवस्तुमानांबद्दल शंका व्यक्त केली होती. प्रयोगानंतर ती शंका खरी ठरली. या प्रकारे मेंडेलिव्ह हा द्रष्टा वैज्ञानिक ठरला. मेंडेलिव्हना तीन वेळा नोबेल पारितोषिकासाठी नामांकन मिळूनसुद्धा त्यापासून वंचित राहावे लागले. म्हणून त्यांच्या योगदानाचे महत्त्व कमी होत नाही. १०१ अणुक्रमांकाच्या मूलद्रव्याला मेंडेलेव्हिअम तसेच चंद्रावरील एका विवराला त्यांचे नाव देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. जगाने त्यांना आवर्तसारणीचा पितामह मानले.
– जयंत श्रीधर एरंडे
मराठी विज्ञान परिषदवि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२ 

सामान्यज्ञान प्रश्नसंग्रह भाग-१०

सामान्यज्ञान प्रश्नसंग्रह भाग-१०
प्रश्न-१) महाराष्ट्रातील सर्वात जास्त अवर्षणग्रस्त जिल्हा कोणता?
उत्तर:-   अहमदनगर जिल्हा!

प्रश्न-२) ज्या संख्येला 2 ने पूर्णपणे भाग जातो त्या संखेला ......... म्हणतात?
उत्तर:-   सम संख्या!

प्रश्न-३) ज्या संखेच्या शेवटी (एकक स्थानी) 0, 2, 4, 6 आणि 8 यापैकी जर एखादा येत असेल तर त्या संख्येला ................... म्हणतात?
उत्तर:-   सम संख्या!

प्रश्न-४) ज्या संख्येला 2 ने पूर्णपणे भाग जात नाही त्या संख्येला ...................... म्हणतात?
उत्तर:-   विषम संख्या!

प्रश्न-५) ज्या संख्येस त्याच संख्येने किंवा 1 ने पूर्णपणे भाग जातो त्या संख्येला ............................ म्हणतात?
उत्तर:-   मूळ संख्या (फक्त 2 हि सम संख्या मूळ संख्या आहे; बाकी सर्व संख्या मूळ संख्या ह्या विषम संख्या आहेत.)

प्रश्न-६) ठगांचा बंदोबस्त कोणत्या गव्हर्नर जनरल ने केला?
उत्तर:-   लॉर्ड विल्यम बेंटीक (1828 ते 1833)!

प्रश्न-७) भ्रहण हत्त्या व बाल हत्त्या थांबविण्याचा प्रयत्न कोणत्या गव्हर्नर जनरल ने केला?
उत्तर:-   लॉर्ड विल्यम बेंटीक (1829)!

प्रश्न-८) भारतामाध्ये विस्तारवादी धोरण राबविणारा गव्हर्नर जनरल कोण होता?
उत्तर:-  लॉर्ड विल्यम बेंटीक!

प्रश्न-९) भारतामध्ये औधगिक विध्यालायाची सुरवात कोणत्या गव्हर्नर जनरल ने केली?
उत्तर:-   लॉर्ड विल्यम बेंटीक (1829)!

प्रश्न-१०) भारतामध्ये स्त्री व्यापार बंदी आणि सनदी नोकर्यांच्या भरती करणास प्रारभ कोणत्या ब्रिटीश गव्हर्नर जनरलने कला?
उत्तर:-  लॉर्ड विल्यम बेंटीक (1829)!

प्रश्न-११) Table Land नावाने कोणता भाग ओळखला जातो?
उत्तर:-   पाचगणी

प्रश्न-१२) हाफलांग हे पर्वतीय पर्यटन स्थळ कोणत्या राज्यात आहे?
उत्तर:-   आसाम

प्रश्न-१३) पोलो खेळाचा उगम कोणत्या राज्यात झाला आहे?
उत्तर:-   मणिपूर

प्रश्न-१४) पृथ्वीच्या पृष्ठभागावरील सर्वांत खोल भाग कोणता?
उत्तर:-   मरियाना गर्ता

प्रश्न-१५) गोवरी' कोणत्या भारतीय राज्यातील नृत्य-नाटक आहे?
उत्तर:-   राजस्थान

प्रश्न-१६) सायलेंट व्हॅली कोणत्या राज्यात आहे?
उत्तर:-   केरळ

प्रश्न-१७) जामनगर हे भारतातील कोणत्या राज्यात आहे?
उत्तर:-  गुजरात

प्रश्न-१८) जगातील सर्वात लांब कालवा कोणत्या राज्यात आहे?
उत्तर:-  राजस्थान

प्रश्न-१९) हिमालयाच्या रोहतांग खिंडीनजीक कोणत्या नदीचा उगम आहे?
उत्तर:-  बियास

सौ्जन्य- तंत्रस्नेही शिक्षक समूह महाराष्ट्र

दिनविशेष १४ जून

दिनविशेष १४ जून

सामान्यज्ञान प्रश्नसंग्रह भाग-९

सामान्यज्ञान प्रश्नसंग्रह भाग-९
प्रश्न-१) हार्ड डिस्क हे डिव्हाईस एक पोर्टेबल स्टोअरेज डिव्हाईस आहे का ?
उत्तर:- हार्ड डिस्क हे डिव्हाईस एक पोर्टेबल स्टोअरेज डिव्हाईस नाही.

प्रश्न-२) स्टोअरेज डीव्हाइस मध्ये डेटा व प्रोग्राम्स प्रत्यक्ष राखून ठेवणाऱ्या मटेरियल ला काय म्हणतात ?
उत्तर:- स्टोअरेज डीव्हाइस मध्ये डेटा व प्रोग्राम्स प्रत्यक्ष राखून ठेवणाऱ्या मटेरियल ला मिडिया म्हणतात.

प्रश्न-३)सीडी रॉमचे संपूर्ण रूप म्हणजे -
उत्तर:- कॉपेक्ट डिस्क रीड ओन्ली मेमरी

प्रश्न-४)सीडी - आरचे संपूर्ण रूप म्हणजे

उत्तर:- सीडी रेकॉर्डेबल

प्रश्न-५) सीडी - आरचे डब्ल्यु डिस्क म्हणजे-

उत्तर:- सीडी - आरचे डब्ल्यु डिस्क म्हणजे - सीडी रीरायटेबल.

प्रश्न-६) ट्रॅक म्हणजे काय?
उत्तर:- ट्रॅक म्हणजे एक समकेंद्र वलय ( Concentric Ring ) असते.

प्रश्न-७) प्रत्येक ट्रँक हा कोणत्या नावाच्या पाचरीसारख्या (वेड्स) आकाराच्या तुकड्यांमध्ये विभागलेला असतो?
उत्तर:- प्रत्येक ट्रँक हा सेक्टर्स ह्या नावाच्या पाचरीसारख्या (वेड्स) आकाराच्या तुकड्यांमध्ये विभागलेला असतो.

प्रश्न-८) डॉट कॉम हे कोणत्या प्रकारच्या संस्थेची वेबसाईट दर्शवितात ?
उत्तर:- डॉट कॉम हे वाणिज्य ह्या प्रकारच्या संस्थेची वेबसाईट दर्शवितात.

प्रश्न-९) मेल टु एॅड्रेसीज कशाला म्हटले जाते ?
उत्तर:- .gov, .edu, .net ह्या एक्सटेन्शन्सना मेल टु एॅड्रेसीज म्हटले जाते.

प्रश्न-१०) ई-मेल म्हणजे काय ?
उत्तर:- ई-मेल म्हणजे इलेक्ट्रॉनिक मेलिंग.

प्रश्न-११) कोणते सर्च एंजीन आहे ?
उत्तर:- एचटीटीपी हे सर्च एंजीन आहे.

प्रश्न-१२)प्रोटोकॉल कशाला म्हणतात ?
उत्तर:- कॉम्प्युटर - कॉम्प्युटरमधील डेटाची अदलाबदल करण्यासाठी असलेल्या नियमांना प्रोटोकॉल म्हणतात.

प्रश्न-१३) कोणत्या प्रोग्राममुळे साईट्स रोखण्यास आणि इंटरनेट एक्सेसवर कालमर्यादा घालण्यास मदत होते उत्तर:- फिल्टर्स प्रोग्राममुळे साईट्स रोखण्यास आणि इंटरनेट एक्सेसवर कालमर्यादा घालण्यास मदत होते.

प्रश्न-१४) ब्राउजर्स हे इंटरनेट आणि वेब डॉक्युमेंट्सना ब्राउज करण्यासाठी काय करते ?
उत्तर:- ब्राउजर्स हे इंटरनेट आणि वेब डॉक्युमेंट्सना ब्राउज करण्यासाठी एक बिनगुंतागुंतीचा इंटरफेस देऊ करते.

प्रश्न-१५) हायपरलिंक्स हे कोणत्या स्वरुपात दिसते ?
उत्तर:- हायपरलिंक्स हे अंडरलाईन व कलर्ड टेक्स किंवा इमेजेसच्या स्वरुपात दिसते.

प्रश्न-१६) जावा काय आहे ?
उत्तर:- जावा ही, वर्ल्ड वाईड वेबसाठी एॅनिमेशन व गेम्स लिहिण्यासाठी वापरण्यात येणारी नवीन कॉम्प्युटर लँग्वेज आहे.

प्रश्न-१७) जावा हे कोणते प्रोग्राम्स आहे ?

उत्तर:- जावा हे वेब रिसोर्सेस मध्ये एॅक्सेस देऊ करणारे प्रोग्राम्स आहेत.

प्रश्न-१८) अलिकडेच निर्माण करण्यात आलेले राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणचे अध्यक्षपदी यांची निवड करण्यात आली.
उत्तर:-  लोकेश्वरसिंह पाटा

प्रश्न-१९) राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाचे मुख्यालय कोठे आहे?
उत्तर:-  दिल्ली

प्रश्न-२०) देशातील पहिला 3 डी डिस्प्ले मोबाईल ‘क्यूडी’ची निर्मिती या कंपनीने करण्याची घोषणा केली.
उत्तर:-  स्पाईस

प्रश्न-२१) पेन्शनधारकांसाठी बायोमॅट्रिक स्मार्ट कार्डची निर्मिती करण्याचा निर्णय घेणारे देशातील पहिले राज्य.
उत्तर:-  हिमाचल प्रदेश

प्रश्न-२२) ‘सच अ लाँग जर्नी’चे लेखक कोण?
उत्तर:-  रोहिग्टन मिस्त्री

प्रश्न-२३) 1919 साली भरलेल्या अखिल भारतीय खिलापत चळवळीचे अध्यक्ष म्हणून कोणाची निवड झाली होती ?
उत्तर:- महात्मा गांधी

प्रश्न-२४) खालील पैकी कोणी देशी वृत्तपत्र कायदा संमत करून भारतीयांचा रोष ओढवून घेतला होता ?
उत्तर:- लॉर्ड लिटन

प्रश्न-२५) आपण समाजवादी असल्याचे कॉंग्रेस च्या कोणत्या अध्यक्षाने स्पष्टपणे जाहीर केले होते ?
उत्तर:- पंडित नेहरू

प्रश्न-२६) आंध्र राज्य हे भाषिक तत्वावर निर्माण झालेले भारतातील पहिले राज्य कोणत्या साली अस्तित्वात आले ?
उत्तर:- 1953

प्रश्न-२७) चीन ने भारतावर हल्ला केला, त्यावेळी भारताचे संरक्षण मंत्री कोण होते ?
उत्तर:- व्ही. के. कृष्ण मेनन

सौ्जन्य- तंत्रस्नेही शिक्षक समूह महाराष्ट्र

ओळख शास्त्रज्ञांची- आवर्तसारणीची गोष्ट

ओळख शास्त्रज्ञांची-

आवर्तसारणीची गोष्ट

अनेक शास्त्रज्ञांनी आपापल्या निरीक्षणानुसार सिद्धांत मांडून मूलद्रव्यांची वर्गवारी केली.

१७ व्या शतकात निसर्गातील मोजकीच मूलद्रव्य माहीत होती. परंतु नवनव्या शोधांमुळे मूलद्रव्यांची यादी वाढत गेली व एकेका मूलद्रव्याचा स्वतंत्र अभ्यास करणे अवघड झाले. मूलद्रव्यांचा शास्त्रोक्त अभ्यासासाठी मूलद्रव्यांची वर्गवारी करण्याची गरज निर्माण झाली. मूलद्रव्यांच्या गुणधर्मातील साधर्म्य, त्यांची संयुगे होण्याची शक्यता या बाबींसाठी त्याची निकड होतीच.
अनेक शास्त्रज्ञांनी आपापल्या निरीक्षणानुसार सिद्धांत मांडून मूलद्रव्यांची वर्गवारी केली. सुरुवातीच्या काळात मूलद्रव्यांची विभागणी धातू व अधातू अशी केली, परंतु लवकरच असे निदर्शनास आले की काही मूलद्रव्ये दोन्ही वर्गाचे गुणधर्म दाखवतात. १८१५ मध्ये मांडलेल्या प्राऊट्ज गृहीतकानुसार (Hypothesis) हायड्रोजनचा अणू सर्व मूलद्रव्यांचा मूलभूत घटक मानून इतर मूलद्रव्यांची निर्मिती हायड्रोजनपासून झाल्याचे मानणारा, हा युनिटरी सिद्धांत.
१८१५ मध्ये डोबेरायनर यांनी एकसारखे गुणधर्म असलेल्या ३/३ मूलद्रव्यांचे गट तयार केले व त्या त्रिकुटांचे नामकरण केले डोबेरायनरची त्रिके (triad). यातील मूलद्रव्यांची मांडणी त्यांच्या चढत्या अणुवस्तुमानानुसार केली असता मधल्या मूलद्रव्याचे अणुवस्तुमान हे इतर दोन मूलद्रव्यांच्या अणुवस्तुमानाच्या सरासरी इतके असते. जसे लिथीयम(७)-सोडीयम(२३)-पोटॅशियम(३९) यांचे त्रिकूट याच प्रकारात मोडणारी अन्य दोन त्रिके म्हणजे क्लोरीन-ब्रोमिन-आयोडीन व कॅल्शिअम-बेरीअम-स्ट्राँशिअम. परंतु तेव्हा ज्ञात असलेल्या इतर मूलद्रव्यांबाबत अशी मांडणी करता आली नाही. १८६४ मध्ये न्यूलँड्सची सप्तके (Octave) हा सिद्धांत आला. यानुसार मूलद्रव्यांची मांडणी त्यांच्या वाढत्या अणुवस्तुमानानुसार केल्यास प्रत्येक सात सोडून आठव्या मूलद्रव्याचे गुणधर्म पहिल्या मूलद्रव्याच्या गुणधर्माशी जुळतात. या मांडणीची तुलना संगीतातल्या सप्तसुरांशी केली. अशी वर्गवारी कॅल्शिअमपर्यंतच्या मूलद्रव्यांची करता येते. तसेच निष्क्रिय वायू मूलद्रव्यांचा शोध लागल्यावर त्यांचा समावेश केल्यामुळे संपूर्ण मांडणी विस्कटली. रासायनिक, रूक्ष मूलद्रव्यांच्या गर्दीत सप्तसुरांची लय शोधणाऱ्या तरल मनाच्या व किचकट शास्त्रात देखील कलेचं सौंदर्य दाखवणाऱ्या दर्दी शास्त्रज्ञाच्या दृष्टीला सलाम!१८६९ मध्ये लॉदर मेयरचा आण्विक आकारमान (Atomic Volume) सिद्धांत आला. मूलद्रव्यांच्या अणूचे आकारमान व अणूचे वस्तुमान यांचा आलेख मांडला असता असे दिसून आले की समान गुणधर्म असलेली मूलद्रव्ये आलेखावर एकाच वळणावर दिसतात. मूलद्रव्यांचे हे गुणधर्म त्यांच्या आण्विक आकारमानाचे आवर्ती कार्य होय;  हाच तो सिद्धांत!
मीनल टिपणीस मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२  office@mavipamumbai.org

ओळख मूलद्रव्यांची भाग-१३

ओळख मूलद्रव्यांची भाग-१३

अणुभार

रासायनिक प्रक्रियांमध्ये त्या-त्या मूलद्रव्यांचे अणू सहभागी असतात

रासायनिक प्रक्रियांमध्ये त्या-त्या मूलद्रव्यांचे अणू सहभागी असतात; ते जोडले जातात, विलग होतात अथवा त्यांची रचना बदलते; असे सर्व प्रथम ब्रिटिश रसायनशास्त्रज्ञ जॉन डाल्टन यांनी मांडले. आज मान्यता पावलेला अणू सिद्धांत अंशत: सर्वप्रथम त्यांनी जगापुढे ठेवला आणि एकच प्रोटॉन असलेल्या हायड्रोजनचा अणुभार एक हे एकक मानून १८०३ मध्ये जवळपास सहा मूलद्रव्यांचा सापेक्ष अणुभार त्यांनी मांडला. यात त्यावेळी ज्ञात असणाऱ्या हायड्रोजन, ऑक्सिजन, नायट्रोजन, कार्बन, सल्फर आणि फॉस्फरस या मूलद्रव्यांचा समावेश होता. पुढे साधारणपणे शतकानंतर, १९०९ सालचे नोबेल पारितोषिक विजेता जर्मन रसायनशास्त्रज्ञ फ्रीड्रिख विल्हेम ऑस्टवल्ड यांनी हायड्रोजनऐवजी आठ अणुक्रमांक असणाऱ्या आणि न्युक्लिअसमध्ये आठ  प्रोटॉन व आठ न्युट्रॉन असणाऱ्या ऑक्सिजनच्या अणुभाराचा एक सोळांश (१/१६) भाग एकक मानून त्याप्रमाणे सर्व मूलद्रव्यांचा सापेक्ष अणुभार मोजण्याचा विचार मांडला व पुढे ही पद्धत थोडय़ाफार फरकाने वर्ष १९६१ पर्यंत चालू होती. कारण, सुमारे १९२९ मध्ये निसर्गत: फार मोठय़ा प्रमाणावर उपलब्ध असणाऱ्या ऑक्सिजनच्या- त्यापेक्षा थोडे जड असणाऱ्या- अन्य दोन समस्थानिकांचा शोध लागला आणि मग मुळातच प्रमाण मानलेल्या गृहीतकात फरक आढळल्याने त्यात या समस्थानिकांचा विचार क्रमप्राप्त झाला.इंटरनॅशनल युनियन फॉर प्युअर एण्ड अप्लाइड केमिस्ट्री (आयुपॅक) या रसायनशास्त्रातील प्रमाणके ठरविणाऱ्या आंतराष्ट्रीय संघटनेने काही गोष्टी निश्चित केल्या. यात, सापेक्ष अणुभार ठरविताना ज्या समस्थानिकांचा विचार करावयाचा ती समस्थानिके पृथ्वीवर स्थिर अवस्थेत निसर्गत: उपलब्ध असावीत. या समस्थानिकांचा विचार करून १९६१मध्ये ऑक्सिजनऐवजी सहा अणुक्रमांकी कार्बनच्या -१२ या समस्थानिकाच्या अणुभाराच्या एक बारांश (१/१२) राशी एकक मानण्यात आली. या अणुभारांस एकीकृत अणुभार एकक (युनिफाइड अ‍ॅटोमिक मास युनिट) हे संबोधन मिळाले आणि त्यास इंग्रजी (४) अथवा (ऊं)ने दर्शविले जाऊ लागले. (ऊं) हे एकक जॉन डाल्टन यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ!
निसर्गात समस्थानिकांच्या उपलब्धतेमध्ये भिन्न समस्थानिकांची विपुलता वेगवेगळी असते. ही सापेक्ष विपुलता लक्षात घेऊन पुढे सर्व ज्ञात मूलद्रव्यांचे अणुभार निश्चित करण्यात आले. मूलद्रव्याच्या संबोधनात वर त्याचा अणुक्रमांक, मध्ये त्याचे रोमन लिपीतील अक्षर, नंतर नाव आणि खाली त्याचा अणुभार, असे लिहिण्याची पद्धत रूढ आहे.
– विनायक कर्णिक
मराठी विज्ञान परिषद,
वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२ 

शुक्रवार, १५ जून, २०१८

दिनविशेष १३ जून

दिनविशेष १३ जून
 १३ जुन १९८३-पायोनियर १० हे अंतराळयान
पायोनियर १० हे अंतराळयान सूर्यमाला सोडून जाणारी पहिली मानवनिर्मित वस्तू ठरली.
पायोनियर १० एक २५८ किलोग्राम का अमेरिकी अंतरिक्ष यान है। इसे २ मार्च १९७२ को अमेरिकी अंतरिक्ष अनुसन्धान संस्था नासा ने एक ऐटलस-सेंटौर रॉकेट के ज़रिये अंतरिक्ष में छोड़ा। १५ जुलाई १९७२ से १५ फ़रवरी १९७३ के काल में यह हमारे सौर मंडल के क्षुद्रग्रह घेरे (ऐस्टरौएड बॅल्ट) को पार करने वाला पहला मानव-कृत यान बना। ६ नवम्बर १९७३ को इसने बृहस्पति ग्रह की तस्वीरें लेना शुर किया और ४ दिसम्बर १९७३ को बृहस्पति से केवल १,३२,२५२ किमी की दूरी पर पहुँचकर फिर उस से आगे निकल गया। चलते-चलते यह हमारे सौर मंडल के बाहरी क्षेत्रों में जा पहुँचा है। कम ऊर्जा के कारण २३ जनवरी २००३ के बाद इस यान का पृथ्वी से संपर्क टूट गया। उस समय यह पृथ्वी से १२ अरब किमी (८० खगोलीय ईकाईयों) की दूरी पर था।

मंगळवार, १२ जून, २०१८

सामान्यज्ञान प्रश्नसंग्रह भाग - ८

सामान्यज्ञान प्रश्नसंग्रह भाग - ८
प्रश्न-१) बल्लारपूर कागद गिरणी कोणत्या जिल्ह्यात आहे?
उत्तर :- चंद्रपूर

प्रश्न-२) राज्यातील पहिले कायम स्वरूपी बालन्यायालय खालील पैकी कोणत्या जिल्ह्यात सुरु करण्यात आले आहे?
उत्तर :- नाशिक

प्रश्न-३) पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना कोणी केली?
उत्तर :- डॉ. बाबासाहेब आंबेडकर

प्रश्न-४) खालील पैकी कोणते शहर महाराष्ट्राचा 'हरित पट्टा' म्हणून ओळखले जाते?
उत्तर :- नाशिक

प्रश्न-५) 2011 ची जनगणना स्वातंत्र्या नंतरची कितवी जनगणना होती?
उत्तर :- 7 वी

प्रश्न-६) कोणत्या खेळात भारताने पहिले कॉमनवेल्थ पदक मिळवले ?
उत्तर :- रेसलिंग (wrestling)

प्रश्न-७) धारा 371 कोणत्या दोन भारतीय राज्यांच्या विशेष व्यवस्थेशी संबंधित आहे ?
उत्तर :- महाराष्ट्र व गुजरात

प्रश्न-८) मिठाचा कायदा मोडून महात्मा गांधीजींनी सुरू केलेली चळवळ ?
उत्तर :- सविनय कायदेभंग चळवळ

प्रश्न-९) खालील पैकी कोणता राष्ट्रीय महामार्ग भारतातील सर्वात लांब राष्ट्रीय महामार्ग आहे ? (By Length)
उत्तर :- NH7

प्रश्न-१०) कला व कलेचा प्रचार करण्यासाठी 1954 मध्ये कोणत्या संस्थेची स्थापना केली गेली होती ?
उत्तर :- ललित कला अकादमी

प्रश्न-११) महाराष्ट्रात कोणत्या नदीची लांबी सर्वात कमी आहे ?
उत्तर :- नर्मदा

प्रश्न-१२) 'श्रीशैल्यम जलविद्युत प्रकल्प' कोणत्या नदीवर बांधलेला आहे ?
उत्तर :-  कृष्णा

प्रश्न-१३) महाराष्ट्राने भारताचा किती टक्के भाग व्यापलेला आहे?
उत्तर :-  9%

प्रश्न-१४)महाराष्ट्रातील कोणत्या सीमेला सातपुडा पर्वतांची रांग आहे?
उत्तर :- उत्तर सीमेला

प्रश्न-१५) महाराष्ट्राला किती किमी चा समुद्रकिनारा लाभला आहे?
उत्तर :-  720 किमी

प्रश्न-१६) भारतीय पठारी प्रदेशाने किती क्षेत्र व्यापले आहे?
उत्तर :- 12 लाख चौ.कि.मी.

प्रश्न-१७) नर्मदा नदीच्या दक्षिण भागात असलेले भारतातील सर्वात मोठे पठार __.
उत्तर :-  दख्खनचे पठार

प्रश्न-१८) महाराष्ट्रास लागून कोणत्या राज्याची सीमा सर्वात जास्त लांब आहे?
उत्तर :- मध्य प्रदेश

प्रश्न-१९) महाराष्ट्राच्या _ कडे सातपुडा पर्वतरांगा व गाविलगड टेकड्या आहेत?
उत्तर :- उत्तरे

प्रश्न-२०) परभणी व नांदेड जिल्ह्यातील डोंगरांच्या रांगेला _ म्हणतात.
उत्तर :-  निर्मळ रांग

सौ्जन्य- तंत्रस्नेही शिक्षक समूह महाराष्ट्र

ओळख मूलद्रव्यांची भाग - १२

ओळख मूलद्रव्यांची भाग - १२

अणूची रचना

अणू हे वस्तूचे अविभाज्य रूप म्हटले म्हणजे अणूला वस्तुमान हे आलेच.

मध्यभागी केंद्रक (न्यूक्लिअस) आणि सभोवताली विशिष्ट कक्षेत फिरणारे ऋण-भारीत इलेक्ट्रॉन (e-) अशी अणूची सर्वसाधारण रचना- काहीशी सूर्याभोवती फिरणाऱ्या बुध, शुक्र, पृथ्वी, मंगळादी ग्रहांसारखी! न्यूक्लियसमध्ये धन-भारित प्रोटॉन (p+) आणि त्या सोबत उदासीन न्यूट्रॉन (n0) म्हणून सर्व धन-विद्युत भार केंद्रस्थानी. इलेक्ट्रॉनवरील ऋण-विद्युतभार आणि प्रोटॉनवरील धन-विद्युतभार एकसारखा असल्याने तसेच या अणूंमध्ये प्रोटॉनची संख्या व इलेक्ट्रॉनची संख्या एकसारखी असल्याने कोणत्याही मूलद्रव्याच्या अणूचा विद्युतभार मात्र शून्य/ उदासीन. कक्षेत फिरणाऱ्या इलेक्ट्रॉनच्या संख्येत बदल झाला तर मात्र या अणूचा विद्युतभार ऋण अथवा धन होतो आणि मग अशा अणूला ‘आयन’ म्हटले जाते.
अणू हे वस्तूचे अविभाज्य रूप म्हटले म्हणजे अणूला वस्तुमान हे आलेच. हे वस्तुमान अर्थात हा भार त्यातील इलेक्ट्रॉन, प्रोटॉन आणि न्यूट्रॉनचा असतो. इलेक्ट्रॉन आणि प्रोटॉनचा विद्युतभार एकसारखा असला तरी त्यांच्या वस्तुमानात मात्र फार फरक आहे.  इलेक्ट्रॉनचे वस्तुमान प्रोटॉनच्या तुलनेत फारच कमी आणि प्रोटॉनचे वस्तुमान हे जवळपास न्यूट्रॉनच्या वस्तुमानाइतके! यामुळे एकूण पाहाता अणूचे वस्तुमान अथवा भार हा अणुच्या केंद्रस्थानी न्यूक्लिअसमध्ये एकवटलेला असतो आणि तो प्रोटॉन व न्यूट्रॉनच्या संख्येवर अवलंबून असतो. एखाद्या मूलद्रव्याच्या अणुमधील ही प्रोटॉनची संख्या म्हणजे त्या मूलद्रव्याचा ‘अणूअंक/ अणुक्रमांक (अ‍ॅटोमिक नंबर)’, या अणूच्या न्यूक्लिअसमधील प्रोटॉन अधिक न्यूट्रॉनची एकत्रित संख्या हा त्या मूलद्रव्याचा ‘वस्तुमानांक (मास नंबर)’ आणि त्यांचे एकत्रित वस्तुमान हा ‘अणू भार (अ‍ॅटोमिक मास/वेट)’. इथे महत्त्वाचा भाग म्हणजे एकाच मूलद्रव्याच्या अणू-केंद्रकात प्रोटॉनची संख्या बदलत नसली तरी न्यूट्रॉनची संख्या बदललेली असू शकते. अशा भिन्न न्यूट्रॉन-संख्या असणाऱ्या परंतु प्रोटॉन-संख्या एकच असणाऱ्या मूलद्रव्याच्या फरकास त्या मूलद्रव्याची समस्थानिके म्हणतात. उदाहरणार्थ कार्बन-१२, कार्बन-१४; यातील फरक म्हणजे कार्बन-१२च्या न्यूक्लिअसमध्ये ६ प्रोटॉन, ६ न्यूट्रॉन; कार्बन-१४च्या न्यूक्लिअसमध्ये ६ प्रोटॉन, ८ न्यूट्रॉन. हायड्रोजनची डय़ुटेरिअम व ट्रीशिअम ही समस्थानिके आपण पाहिली आहेतच. असाच प्रकार अणुबॉम्बमध्ये वापरल्या जाणाऱ्या किरणोत्सारी युरेनिअम या मूलद्रव्याचा! ९२ अणुक्रमांक असणाऱ्या या मूलद्रव्याची युरेनिअम-२३२, २३३, २३४, २३५, २३६ आणि २३८ अशी सहा समस्थनिके आहेत. ५४ अणुक्रमांक असलेल्या  ‘झेनॉन’ला तर १३ समस्थानिके आहेत.
– विनायक कर्णिक
मराठी विज्ञान परिषद,
वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२ 

ओळख शास्त्रज्ञांची - दिमित्री मेंडेलिव्ह

ओळख शास्त्रज्ञांची - दिमित्री मेंडेलिव्ह

हेच मेंडेलिव्हचे ‘इका-बोरॉन’!

दिमित्रि मेंडेलिव्ह यांनी १८६९ मध्ये आपल्या आवर्त सारणीत मूलद्रव्यांना त्यांच्या गुणधर्मानुसार स्थान दिलं.

दिमित्रि मेंडेलिव्ह यांनी १८६९ मध्ये आपल्या आवर्त सारणीत मूलद्रव्यांना त्यांच्या गुणधर्मानुसार स्थान दिलं. बोरॉन व अ‍ॅल्युमिनिअम यांच्यानंतर तिसऱ्या गटात दोन व सिलिकॉननंतर चौथ्या गटात एक अशी तीन मूलद्रव्यं असू शकतात, असं त्यांनी भाकीत केलं. त्या मूलद्रव्यांना त्यांनी इका-बोरॉन (बोरॉनप्रमाणे), इका-अ‍ॅल्युमिनिअम व इका-सिलिकॉन अशी नावं दिली. पुढे १९०० सालापर्यंत या तीनही मूलद्रव्यांचा शोध लागल्यानंतर इका-बोरॉनला स्कँडिअम, इका-अ‍ॅल्युमिनिअमला गॅलिअम व इका-सिलिकॉनला जम्रेनिअम अशी नावं दिली गेली.
सन १८६९मध्येच, स्वीडिश रसायनशास्त्रज्ञ लार्स फ्रेडरिक निल्सन हे युक्झेनाईट (euxenite) आणि गॅडोलिनाईट (gadolinite) या खनिजांचा अभ्यास करत होते. वर्णपंक्ती तपासताना त्यांना एक नवीन मूलद्रव्य त्यात असल्याचं आढळलं. स्कँडिनेव्हिया येथील खनिजांतून हे मूलद्रव्य मिळालं होतं; म्हणून निल्सन यांनी त्या मूलद्रव्याला नाव दिलं ‘स्कँडिअम.’ ४४.९ अणुभार असलेल्या या मूलद्रव्याचा अणुभार ४४ असल्याचंही त्यांच्या लक्षात आलं. स्वीडिश रसायनशास्त्रज्ञ क्लेव्ह यानी मेंडेलिव्हनी सूचित केलेलं इका-बोरॉन म्हणजेच स्कँडिअम असलं पाहिजे, हे निदर्शनास आणून दिलं.
खनिजांतून स्कँडिअम वेगळं करण्यासाठी निल्सन यांनी बरेच प्रयत्न केले. १० किलोग्रॅम युक्झेनाईटमधून फक्त २ ग्रॅम स्कँडिअम ऑक्साईड मिळवण्यात त्यांना यश आलं खरं, पण शुद्ध स्कँडिअम धातू मिळण्यासाठी १९३७ साल उजाडलं. जर्मन शास्त्रज्ञ फिशर यांनी सहकाऱ्यांच्या मदतीने उच्चतापमानाला स्कँडिअमक्लोराईडचं विद्युत अपघटन करून शुद्ध स्कँडिअम धातू प्रयोगशाळेत मिळवला. पण मोठय़ा प्रमाणात ९९ टक्के शुद्ध स्कँडिअम धातू प्रथम १९६० साली मिळवता आला.पृथ्वीवर विपुल प्रमाणात मिळणाऱ्या मूलद्रव्यांच्या यादीत स्कँडिअमचा क्रमांक ३१वा लागतो. पृथ्वीवर स्कँडिअमची खनिजं सर्व पृष्ठभागावर पसरलेली असल्याने ती शोधताना अडचण येते. त्याची जवळपास ८०० खनिजं आहेत. बहुतेक खनिजांमध्ये स्कँडिअम ऑक्साईडच्या आणि फ्लोराईडच्या रूपात असतं.
दरवर्षी सुमारे १० टन स्कँडिअम हे ऑक्साईडच्या स्वरूपात उपउत्पादन म्हणून खनिजांतून वेगळं केलं जातं. मात्र शुद्ध स्कँडिअम अगदीच कमी मिळत असल्याने महागडय़ा धातूंच्या यादीत स्कँडिअमची गणना होते. स्कँडिअम खनिजांपासून वेगळं करण्याची किचकट प्रक्रिया, कमी उत्पादन आणि जास्त किंमत यांमुळे स्कँडिअमचा वापर मर्यादित आहे. तरीही स्कँडिअमचे गुणधर्म लक्षात घेता, त्याची मागणी वाढत चालली आहे. युक्रेन, रशिया आणि चीन हे देश स्कँडिअम निर्मितीत आघाडीवर आहेत.
– चारुशीला जुईकर
मराठी विज्ञान परिषदवि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२ 

दिनविशेष १२ जून

दिनविशेष १२ जून- पृथ्वीक्षेपणास्त्राची ११ वी चाचणी यशस्वी
१२ जुन १९९३


"पृथ्वी" हे भारतीय सैन्याचे "पृष्ठभाग ते पृष्ठभाग" (Surface to Surface) निम्न पल्ला प्रक्षेपास्त्र (Short Range Ballistic Missile) आहे. हे प्रक्षेपास्त्र भारतीय संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने "एकीकृत मार्गदर्शक क्षेपणास्त्र विकास कार्यक्रमा" अंतर्गत विकसित केले आहे.

विकास आणि इतिहास
भारत सरकारने वेगवेगळी युद्ध क्षेपणास्त्रे व पृष्ठभाग ते आकाश या मालिकेतील क्षेपणास्त्रांवरील स्वावलंबनासाठी १९८३ साली "एकीकृत मार्गदर्शक क्षेपणास्त्र विकास कार्यक्रम" सुरू केला. या अंतर्गत विकसित केलेले पृथ्वी हे पहिले प्रक्षेपास्त्र आहे. भारतीय संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने याआधी "प्रोजेक्ट डेव्हिल" अंतर्गत सोविएत रशियाच्या एसए-2 पृष्ठभाग ते आकाश या क्षेपणास्त्राची उलट अभियांत्रिकी केली होती. "पृथ्वी"ची प्रणोदन प्राद्योगिकी (Propulsion Technology) ही एसए-2 पासुन उत्पादित केली असल्याचे मानले जाते. या प्रक्षेपास्त्राच्या प्रारूपांमध्ये स्थायू अथवा द्रव, अथवा या दोन्ही प्रकारची इंधने वापरली जातात. युद्धभूमीवरील वापरासाठी विकसित केलेले हे प्रक्षेपास्त्र सामरिक उपयोगासाठी स्फोटक शीर्षावर अण्वस्त्रेसुद्धा वाहून नेऊ शकते.

प्रारूपे
पृथ्वी प्रक्षेपास्त्र प्रकल्पामध्ये भारतीय सेना, नौसेना व वायु सेना या तिन्ही दलांसाठी असलेली "पृथ्वी"ची प्रारूपे अंतर्भूत करण्यात आलेली आहेत. सुरुवातीच्या एकीकृत मार्गदर्शक क्षेपणास्त्र विकास कार्यक्रमांतर्गत असलेल्या प्रकल्पामध्ये पृथ्वी प्रक्षेपास्त्राच्या संरचना रूपरेषेत खालील प्रारूपे अंतर्भूत आहेत.
पृथ्वी - १ (एसएस- १५०) - भारतीय सेनेसाठी (१,००० किलो च्या स्फोटक शिर्षासह १५० किलोमीटर लांबीचा पल्ला)पृथ्वी - २ (एसएस- २५०) - भारतीय वायुसेनेसाठी (५०० किलो च्या स्फोटक शिर्षासह २५० किलोमीटर लांबीचा पल्ला)पृथ्वी - ३ (एसएस- ३५०) - भारतीय नौसेनेसाठी (५०० किलो च्या स्फोटक शिर्षासह ३५० किलोमीटर लांबीचा पल्ला)धनुष - बातमीनुसार धनुष हे भारतीय नौसेनेसाठीचे युद्धनौकेवरून डागण्यात येऊ शकणारे प्रारूप आहे. काही सूत्रांच्या म्हणण्यानुसार धनुष ही संतुलित मंच असलेली अशी रचना आहे की ज्यावरून पृथ्वी - २ व पृथ्वी - ३ अशी दोन्ही प्रक्षेपास्त्रे युद्धनौकेवरून डागण्यात येऊ शकतील. तर काही सूत्रांच्या मते धनुष हे पृथ्वी - २ या प्रक्षेपास्त्राचे प्रारूप आहे.
वर्षानुवर्षे ही वैशिष्ठ्ये अनेक बदलांमधून गेली. भारताने लष्करी वापराकरिता तयार केलेल्या या वर्गातील कुठल्याही क्षेपणास्त्राला पृथ्वी या कूटनामाने ओळखले जाते. मात्र नंतरच्या विकसनशील प्रारूपांना पृथ्वी-२ आणि पृथ्वी-३ या नावाने ओळखले जाते.

ओळख शास्त्रज्ञांची- डॉ. होमी भाभा

ओळख शास्त्रज्ञांची - डॉ. होमी भाभा

अणुऊर्जा विकासाचे जनक डॉ. भाभा

आपले संशोधन कार्य सांभाळत असतानाच होमी भाभा टाटा मूलभूत संशोधन संस्थेचे संचालक झाले.

भारतीय अणुऊर्जा आणि अण्वस्त्र विकास कार्यक्रमाचे प्रणेता, पारशी समाजातले डॉ. होमी भाभा आपले इंजिनिअरिंग, गणित आणि न्यूक्लीयर फिजिक्सचे शिक्षण पूर्ण करून १९३९ साली भारतात परतले. काही काळ भाभांनी इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ सायन्समध्ये काम केल्यावर १९४५ साली टाटा मूलभूत संशोधन संस्थेची स्थापना करण्यास त्यांनी मदत केली. आपले संशोधन कार्य सांभाळत असतानाच होमी भाभा टाटा मूलभूत संशोधन संस्थेचे संचालक झाले. भाभांनी या संशोधन संस्थेसाठी सर दोराबजी टाटा ट्रस्टकडून मोठय़ा रकमेची देणगी मिळवून ‘कॉस्मिक रे रिसर्च युनिट’ सुरू केले. त्याच दरम्यान त्यांनी स्वतंत्ररीत्या अण्वस्त्रविषयक संशोधन सुरू केले. यातूनच त्यांच्या पुढाकाराने भारत सरकारचे अ‍ॅटॉमिक एनर्जी कमिशन म्हणजेच अणुऊर्जा आयोगाची स्थापना मुंबईत १९४८ साली करण्यात आली. डॉ. होमी भाभा या अणुऊर्जा आयोगाचे पहिले अध्यक्ष. याच वर्षी तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी अणुऊर्जा आयोगाच्या पुढच्या योजनांची जबाबदारी भाभांवर सोपवून अण्वस्त्रनिर्मितीची योजना तयार करण्यास सांगितले.
भारतीय स्वातंत्र्यानंतर होमी भाभांनी जगभरात विखुरलेल्या भारतीय वंशाच्या शास्त्रज्ञांना अणुऊर्जा आयोगासाठी भारतात येऊन संशोधन करण्याचे आवाहन केले आणि त्यातून त्यांना होमी सेठना, विक्रम साराभाईंसारखे सहकारी शास्त्रज्ञ मिळाले. होमी भाभांच्या अथक परिश्रमांमुळेच भारतात अणुभट्टीची स्थापना झाली. पुढे अनेक ठिकाणी अणुभट्टय़ा सुरू होऊन त्यांचा वीजनिर्मितीसाठी उपयोग होऊ लागला. अणुशक्तीचा वापर शांततेच्याच मार्गाने व्हावा असे मत संयुक्त राष्ट्रांच्या सभेत ठामपणे मांडणारे भाभा हे पहिले वैज्ञानिक.संयुक्त राष्ट्रांच्या सभेला ते जात होते.  २४ जानेवारी १९६६ रोजी फ्रान्सच्या हद्दीत असताना त्यांचे विमान आल्प्स पर्वतावर कोसळून त्यांचे निधन झाले. त्यानंतर ट्रॉम्बे येथील अणू संशोधन केंद्राचे नाव ‘भाभा अणू संशोधन केंद्र’ असे करण्यात आले.
सुनीत पोतनीस sunitpotnis@rediffmail.com

ओळख मूलद्रव्यांची भाग - ११

ओळख मूलद्रव्यांची भाग - ११

मूलद्रव्य कशाला म्हणावे?

मूलद्रव्यांच्या पुढील प्रवासाला जाण्यापूर्वी या सर्वाची थोडक्यात माहिती करून घेऊ या.

आतापर्यंत मूलद्रव्यांपकी काही सुरुवातीची मूलद्रव्ये आपण पाहिली; सोबतच्या चित्रांत काही अंकांचा उल्लेख, काही इंग्रजी अक्षरे, विशिष्ट पद्धतीची मांडणी आदि गोष्टी होत्या. त्याचप्रमाणे काही शास्त्रीय संज्ञांचा वापरही लेखांमध्ये होता – अणुक्रमांक, अणुभार, प्रोटॉन, न्युट्रॉन, इलेक्ट्रॉन, संयुजा, समस्थनिके इत्यादी. मूलद्रव्यांच्या पुढील प्रवासाला जाण्यापूर्वी या सर्वाची थोडक्यात माहिती करून घेऊ या.
मूलद्रव्य नेमके कशाला म्हणावे? एखाद्या वस्तूचे इतके साधे-सोपे रूप, ज्याचे अन्य कोणत्याही रूपात रासायनिक प्रक्रियेने विघटन करता येणार नाही आणि त्याचबरोबर त्याचे सर्व अणु हे एकसारखे आहेत, त्यास मूलद्रव्य म्हणता येईल. उदाहरण द्यायचे झाले तर पाणी हे मूलद्रव्य नाही. कारण त्याचे रासायनिक प्रक्रियेने विघटन केले असता हायड्रोजन आणि ऑक्सिजन मिळतो. परंतु हायड्रोजन अथवा ऑक्सिजनचे अशा प्रकारे रासायनिक विघटन करता येत नाही. म्हणून पाणी हे मूलद्रव्य नाही आणि हायड्रोजन तसेच ऑक्सिजन ही मूलद्रव्ये आहेत. मिठाचे रासायनिक प्रक्रियेने सोडियम, क्लोरीन आदींमध्ये विघटन करता येते, त्यामुळे मीठ मूलद्रव्य नाही. परंतु, सोडियम तसेच क्लोरीन ही अविघटनशील असल्याने मूलद्रव्ये आहेत. मूलद्रव्य हे रोमन लिपीतील अक्षरांनी दर्शविले जाते, उदा. हायड्रोजन (H), कार्बन (C), नायट्रोजन (N), ऑक्सिजन (O). जिथे दोन अक्षरांचा वापर होतो अशा ठिकाणी हेलिअम (He), मॅग्नेशिअम (Mg), निकेल (Ni).अणु कशाला म्हणावे, तर अशा मूलद्रव्याचा छोटय़ात छोटा, अविभाज्य अर्थात ज्याचे विभाजन करता येत नाही असा कण, की जो त्या मूलद्रव्याचे सर्व भौतिक-रासायनिक गुणधर्म स्वत:मध्ये टिकवून ठेवतो. याचा अर्थ अणूचे विभाजन होत नाही असे नाही, अणूचेही विभाजन होते. इलेक्ट्रॉन (ऋण-विद्युतभार असलेले कण, e-), प्रोटॉन (धन-विद्युतभार असलेले कण, p+) आणि न्युट्रॉन (उदासीन अर्थात कोणताही विद्युतभार नसलेले कण, n0); ही नावे आपण ऐकली असतील. प्रत्येक मूलद्रव्याचा अणु वेगळा! या भिन्न मूलद्रव्यांच्या अणूचा आकार शास्त्रीय परिभाषेत सुमारे ६० ते ६०० पिकोमीटर (१पिकोमीटर = १x १० – १२ मीटर). हे सोपे करायचे झाले तर असे म्हणता येईल -सर्वसाधारण माणसाच्या डोक्यावरील केसाच्या सरासरी जाडीमध्ये सरासरी आकाराचे सुमारे पाच लक्ष अणु बसतील.
– विनायक कर्णिक , मुंबई
मराठी विज्ञान परिषद,
वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२ 

दिनविशेष ११ जून

दिनविशेष ११ जून
 ११ जुन १९३५-एडविन आर्मस्ट्राँग
एडविन आर्मस्ट्राँगने पहिल्यांदा एफ.एम. लहरींचे प्रसारण केले.


एफ.एम. हे फ्रीक्वेंसी मॉड्युलेशन (Frequency modulation) चे लघुरुप आहे. या मध्ये तरंगलांबी किंवा तरंगउंची न बदलता वारंवारिता बदल करून संदेशाचे प्रसारण केले जाते.


याचा वापर रेडिओमध्ये करण्याचा शोध एड्विन आर्मस्ट्राँग याने १९१४ मद्ये लावला. याव्दारे बाह्य वातावरणातील आवाज संदेशातुन वगळले जातात.

रविवार, १० जून, २०१८

अभ्यासविषये व त्यांची नावे

अभ्यासविषये व त्यांची नावे

) हवामनाचा अभ्यास- मीटिअरॉलॉजी

२) रोग व आजार यांचा अभ्यास- पॅथॉलॉजी

३) ध्वनींचा अभ्यास- अॅकॉस्टिक्स

४) ग्रह-ताऱ्यांचा अभ्यास- अॅस्ट्रॉनॉमी

५) वनस्पती जीवनांचा अभ्यास- बॉटनी

६) मानवी वर्तनाचा अभ्यास- सायकॉलॉजी

७) प्राणी जीवांचा अभ्यास- झूलॉजी

८) पृथ्वीच्या पृष्ठ भागावरील पदार्थांचा अभ्यास- जिऑलॉजी

९) कीटकजीवनाचा अभ्यास- एन्टॉमॉलॉजी

१०) धातूंचा अभ्यास- मेटलर्जी

११) भूगर्भातील पदार्थांचा (खनिज वगैरे) अभ्यास- मिनरॉलॉजी

१२) जिवाणूंचा अभ्यास- बॅकेटेरिओलॉजी

१३) विषाणूंचा अभ्यास- व्हायरॉलॉजी

१४) हवाई उड्डाणाचे शास्त्र- एअरॉनाटिक्स

१५) पक्षी जीवनाचा अभ्यास- ऑर्निथॉलॉजी

१६) सरपटनाऱ्या प्राण्यांचे शास्त्र- हर्पेटलॉलॉजी

१७) आनुवांशिकतेचा अभ्यास- जेनेटिक्स

१८) मज्जासंस्थेसंबंधीचा अभ्यास- न्यूरॉलॉजी

१९) विषासंबंधीचा अभ्यास- टॉक्सिकॉलॉजी

२०) ह्रदय व त्यांची कार्ये यांच्याशी संबंधीत शास्त्र- कार्डिऑलॉजी

२१) अवकाश प्रवासशास्त्र- अॅस्ट्रॉनॉटिक्स

२२) प्राणी शरीर शास्त्र- अॅनाटॉमी

२३) मानववंशशास्त्र (मानव जातीचा अभ्यास)- अँथ्रापॉलॉजी

२४) जीव-रसायनशास्त्र- बायोकेमिस्ट्री

२५) सजीवानसंबंधीचा अभ्यास (जीवशास्त्र)- बायोलॉजी

२६) रंगविज्ञानाचे शास्त्र- क्रोमॅटिक्स

२७) विविध मानववंशासंबंधीचा अभ्यास- एथ्नॉलॉजी

२८) उद्यानरोपन, संवर्धन व व्यवस्थापन यांचे शास्त्र- हॉर्टिकल्चर

२९) शरीर-इंद्रिय-विज्ञानशास्त्र- फिजिअॉलॉजी

३०) फलोत्पादनशास्त्र- पॉमॉलॉजी

३१) मृतप्राणी भूसा भरून ठेवण्याचा शास्त्र- टॅक्सीडर्मी

३२) भूपृष्ठांचा अभ्यास- टॉपोग्राफी

महाराष्ट्रातील महामंडळे व त्यांची स्थापना

महाराष्ट्रातील महामंडळे व त्यांची स्थापना

१) महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ - दिनांक १ ऑगस्ट, १९६२

२) महाराष्ट्र राज्य औद्योगिक व गुंतवणूक महामंडळ - ३१ मार्च, १९६६

३) महाराष्ट्र राज्य वित्तीय महामंडळ - दिनांक १ एप्रिल, १९६२

४) महाराष्ट्र राज्य लघु उद्योग विकास महामंडळ - १९६२

५) महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन - १९७८

६) महाराष्ट्र राज्य खादी ग्रामोद्योग मंडळ - १९६२

७) महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ - १९७५

८) महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ -१९६१

९) महाराष्ट्र राज्य शेती महामंडळ (मर्यादित) - १९६३

१०) महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळ - १९६५

११) मराठवाडा विकास महामंडळ - १९६७

१२) कोकण विकास महामंडळ (मर्यादित) - १९७०

१३) विदर्भ विकास महामंडळ (मर्यादित) - १९७०

१४) महाराष्ट्र कृष्ण खोरे महामंडळ - १९९६

१५) विदर्भ सिंचन विकास महामंडळ - १९९७

१६) कोकण सिंचन विकास महामंडळ - १९९७

१७) तापी सिंचन विकास महामंडळ - १९९७

१८) गोदावरी मराठवाडा सिंचन विकास महामंडळ - १९९८

१९) महात्मा फुले मागास वर्ग विकास महामंडळ - १९७८

२०) म्हाडा - १९७६


सामान्यज्ञान प्रश्नसंग्रह भाग-७

सामान्यज्ञान प्रश्नसंग्रह भाग-७
प्रश्न-१)  या पैकी कोणत्या बेटाचे नाव स्पॅनिश भाषेतील जमीनीवर आढळणार्‍या कासवांच्या नावावरून ठेवले गेले होते?
उत्तर:-  गेलापॅगोस

प्रश्न-२) कॉम्प्यूटरमध्ये वापरल्या जाणार्‍या संचार नियमांना काय म्हटले जाते?
उत्तर:-  प्रोटोकॉल

प्रश्न-३) हिमाचल प्रदेशात कोणता सण देशातील इतर स्थानांपेक्षा तीन दिवस नंतर साजरा केला जातो?
उत्तर:-  दसरा

प्रश्न-४) 2001 मध्ये कोणत्या भारतीय खेळाडूला संयुक्त राष्ट्र शांतिदूत नियुक्त केले गेले होते?
उत्तर:-  विजय अमृतराज

प्रश्न-५) पूर्वी घाटातील सर्वोच्च शिखर अर्मा कोंडा कोणत्या भारतीय राज्यात आहे?
उत्तर:-  आंध्र प्रदेश

प्रश्न-६) राष्ट्रीय क्रिडा दिवास कुठला?
उत्तर:-  29 ऑगस्ट

प्रश्न-७) राष्ट्रीय ग्रामीण संस्था कुठे आहे?
उत्तर:-  हैद्रबाद

प्रश्न-८) राज्य शासणाने ग्राम शिक्षण संस्थेची स्थापना कधी केली?
उत्तर:-  1990!

प्रश्न-९) कितव्या व्या घटना दुरुस्तीने व्यापारामध्ये वाढ करण्यात आली?
उत्तर:-  60 व्या!

प्रश्न-१०) सौदी अरब देशामध्ये किती नद्या आहेत?
उत्तर:-  एक हि नदी नाही.!

अवकाशविषयक माहिती
प्रश्न-१) चंद्रावर पहिले पाऊल पहिले अंतराळवीर कोण?
उत्तर:- नील आर्मस्ट्रॉंग हे १९६९ साली चंद्रावर पहिले पाऊल ठेवणारे पहिले अंतराळवीर आहे.

प्रश्न-२) मानवाने तयार केलेला पहिला उपग्रह, अवकाशात कोणत्या राष्ट्राने सोडला?
उत्तर:- मानवाने तयार केलेला पहिला उपग्रह, अवकाशात रशिया राष्ट्राने सोडला.

प्रश्न-३) अवकाशात गेलेला पहिला अंतराळवीर कोण?
उत्तर:- अवकाशात गेलेला पहिला अंतराळवीर युरी गागारीन आहे.

प्रश्न-४) भास्कर १ चे वजन किती होते?
उत्तर:- भास्कर १ चे वजन ४४४ किलोग्रॅम होते.

प्रश्न-५) चंद्रावर कोणत्या राष्ट्राने पहिले अवकाशयान उतरविण्यात यश संपादन केले?
उत्तर:- चंद्रावर अमेरिका या राष्ट्राने पहिले अवकाशयान उतरविण्यात यश संपादन केले.

प्रश्न-६) पृथ्वीच्या ६० किलो वजनाच्या माणसाचे वजन चंद्रावर किती भरेल ?
उत्तर:- पृथ्वीच्या ६० किलो वजनाच्या माणसाचे वजन चंद्रावर १० किलो भरेल.

प्रश्न-७) अमेरिकेच्या कोणत्या यानातून अंतराळवीरांनी चंद्रावर प्रथम पाऊल ठेवले?
उत्तर:- अमेरिकेच्या अपोलो- ११ या यानातून अंतराळवीरांनी चंद्रावर प्रथम पाऊल ठेवले.

प्रश्न-८) भारताने कोणत्या वर्षी अवकाशात पहिला उपग्रह सोडला?
उत्तर:- १९७५ साली भारताने अवकाशात पहिला उपग्रह सोडला.

प्रश्न-९) भारताने अवकाशात सोडलेल्या पहिल्या उपग्रहाचे नाव कोणते?
उत्तर:- भारताने अवकाशात सोडलेल्या पहिल्या उपग्रहाचे आर्यभट आहे.

प्रश्न-१०) स्कायलॅब ही अंतरीक्ष प्रयोगशाळा कोणत्या वर्षी अटलांटिक महासागरात पडली?
उत्तर:- ११ जुलै १९७९ साली स्कायलॅब ही अंतरीक्ष प्रयोगशाळा अटलांटिक महासागरात पडली.

प्रश्न-११) ११ जुलै १९७६ रोजी मंगलवार पाठविलेल्या अंतराळ्यानाचे नाव कोणते?
उत्तर:- ११ जुलै १९७६ रोजी मंगलवार पाठविलेल्या अंतराळ्यानाचे नाव व्ह्यांयकिंग- १ आहे.

प्रश्न-१२) रशियाच्या कोणत्या उपग्रहात लायका नावाची कुत्री होती?
उत्तर:- रशियाच्या स्पुटनिक-२ या उपग्रहात लायका नावाची कुत्री होती.

प्रश्न-१३) कोणत्या राष्ट्रातील अवकाशयानाने अंतरिक्षात अधिक उंचावर जाण्यात यश मिळविले आहे?
उत्तर:- रशिया राष्ट्रातील अवकाशयानाने अंतरिक्षात अधिक उंचावर जाण्यात यश मिळविले आहे.


प्रश्न-१४) ज्युपिटर ह्या ग्रहावर, अमेरिकेने कुठलाही प्राणी नसलेला जो उपग्रह प्रक्षेपित केला त्याचे नाव काय?
उत्तर:- ज्युपिटर ह्या ग्रहावर, अमेरिकेने कुठलाही प्राणी नसलेला जो उपग्रह प्रक्षेपित केला त्याचे नाव पायोनियर -१० हे आहे.

प्रश्न-१५) श्वेतबटू हे कसले नाव आहे?
उत्तर:- श्वेतबटू हे तेजस्वी ताऱ्यायाचे नाव आहे.

सौ्जन्य- तंत्रस्नेही शिक्षक समूह महाराष्ट्र

सामान्यज्ञान प्रश्नसंग्रह भाग-६

सामान्यज्ञान प्रश्नसंग्रह भाग-६
प्रश्न-१) .............. पासून अॅल्सुमिनिअम मिळवले जाते.
उत्तर:-  मँगनिज

प्रश्न-२) चंद्र मावळतो त्या वेळेस तो कसा दिसतो?
उत्तर:-  पूर्वीपेक्षा मोठा

प्रश्न-३) दाल सरोवर कोठे आहे?
उत्तर:- जम्मु काश्मीर

प्रश्न-४) महाराष्ट्राच्या पठारी विभागामध्ये ------- मृदा मोठया प्रमाणात विखुरलेली आढळते.
उत्तर:- काळी

प्रश्न-५) सध्या भारताचा राष्ट्रीय प्राणी कोणता आहे?
उत्तर:- वाघ

प्रश्न-६) राजवाडे ऐतिहासिक संशोधन मंडळ खालील पैकी कोणत्या शहरात आहे?
उत्तर:- धुळे

प्रश्न-७) मोबाईल तंत्र ज्ञानात नेहमी उल्लेख होत असलेल्या जी .एस.एम. (GSM) मधील 'एस' म्हणजे__?
उत्तर:-System

प्रश्न-८) आदिवासी वन संरक्षण कायदा कोणत्या साली पारित झाला?
उत्तर:- 2004

प्रश्न-९) बाभळी प्रकल्प कोणत्या दोन राज्यामधील वादाचा मुद्दा बनला?
उत्तर:-महाराष्ट्र - आंध्रप्रदेश

प्रश्न-१०) मुंबई पुणे द्रुतगती मार्गास (Express Way) कोणाचे नाव देण्यात आले आहे?
उत्तर:- यशवंतराव चव्हाण

प्रश्न-११) अमेरिकेतील सर्वात मोठे बर्फमय सरोवर कोणते?
उत्तर:- अगास्सिझ हे अमेरिकेतील सर्वात मोठे बर्फमय सरोवर आहे.

प्रश्न-१२) उव्हारोव्हाईट काय आहे?
उत्तर:- उव्हारोव्हाईट गार्नेट हा लहान, चमकदार हिरवा स्फटिकच्या रूपात मिळणारा अतिशय दुर्मिळ माणिक आहे.

प्रश्न-१३) व्हेरिओलेशन बद्दल तुम्हाला माहित आहे का ?
उत्तर:- व्हेरिओलेशन हा देवीची लस टोचण्याचा प्रकार होता. यात सौम्य रूपात देवी आलेल्या रोग्यांच्या लहानशा फोडची लागन दुसऱ्या रोग्याला केली जात असे.

प्रश्न-१४) वाहू काय आहे?
उत्तर:- वाहू हा जगात सर्वत्र व विशेषतः विषुववृत्तीय भागात अधिक सापडणारा अत्यंत बलवान व गतिमान आणि शिकारीसाठी व भक्षणासाठीही योग्य हिंस्त्र मासा आहे. त्याची शिकार हा एक खास खेळ असतो. शिवाय तो खाण्यासाठीही उपयोगी पडतो.

प्रश्न-१५) वॉककिपर काय आहे?
उत्तर:- वॉककिपर हा मध्य आशिया व दक्षिण युरोपात आढळणारा एक डोंगरपक्षी आहे.

प्रश्न-१६) वॉलस्ट्रीट हे अनपेक्षितरित्या होणारे इंग्रजाचे हल्ले थोपवण्यासाठी कोणत्या साली डच वसाहतकारांनी बांधलेल्या मातीच्या भिंतीमुळे पडले?
उत्तर:- वॉलस्ट्रीट हे अनपेक्षितरित्या होणारे इंग्रजाचे हल्ले थोपवण्यासाठी इ.स. १६५३ साली डच वसाहतकारांनी बांधलेल्या मातीच्या भिंतीमुळे पडले.

प्रश्न-१७) फुलांचा सर्वात मोठा लिलाव कुठे होतो?
उत्तर:- फुलांचा सर्वात मोठा लिलाव ‘आल्समीर’ या नेदरलँडच्या पुष्पपैदास केंद्रामध्ये होतो.

प्रश्न-१८) चार्ल्स बॅबेज यांनी कसली निर्मिती केली?
उत्तर:- चार्ल्स बॅबेज यांनी इंग्लिश गणिती व संशोधकाने पहिल्या डिजिटल संगणकांची निर्मिती केली.

प्रश्न-१९) कॅमेरूनचे पहिले अध्यक्ष कोण होते?
उत्तर:- अहमदू अहिदजो हे कॅमेरूनचे पहिले अध्यक्ष, आधी रेडिओसंचालक होते.

प्रश्न-२०) आल्प्स पर्वतातील सर्वात लांब हिमनदी कोणती?
उत्तर:- अ‍ॅलेश ही आल्प्स पर्वतातील सर्वात लांब हिमनदी आहे.

प्रश्न-२१) मूळ इटालियन वाद्य कोणते?
उत्तर:- व्हायोलिन हे मूळ इटालियन वाद्य आहे.

सौ्जन्य- तंत्रस्नेही शिक्षक समूह महाराष्ट्र

सामान्यज्ञान प्रश्नसंग्रह भाग-५

सामान्यज्ञान प्रश्नसंग्रह भाग-५
प्रश्न-१) नुकतेच कोणत्या देशातील संसदेने 1984 सालच्या शीख विरोधी दंग्यांना "जाती संहार" (Genocide) म्हणून निवेदन जारी केले आहे?
उत्तर-  ऑस्ट्रेलिया

प्रश्न-२) 2 ते 6 जानेवारी 2013 ह्या कालावधीत कोची (केरळ) येथे झालेल्या प्रवासी भारतीय दिवसाचे मुख्य अतिथी कोण?
उत्तर-  राजकेश्वर पुरयाग (Mauritius)

प्रश्न-३)  डिसेंबर 2012 मध्ये आयोजित बारामती (जिल्हा: पुणे) येथे होणार्‍या नाटय़संमेलनाचे अध्यक्षस्थान कोण भूषविणार आहे?
उत्तर-  डॉ. मोहन आगाशे

प्रश्न-४) World Economic Forum ने जारी केलेल्या आर्थिक विकास सूची मध्ये भारताचा क्रमांक कितवा आहे?
उत्तर-   40वा

प्रश्न-५) 2012 चा इंदिरा गांधी राष्ट्रीय एकात्मता पुरस्कार कोणास मिळाला आहे?
उत्तर-  गुलजार

प्रश्न-६) सत्यकथामधून ज्ञानेश्वर नाडकर्णी यांनी या नावाने लेखन केले.
उत्तर-   तुकाराम शेंगदाणे

प्रश्न-७) साहित्य क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणार्या साहित्यिकास दिला जाणारा विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्काराचा पहिला मानकरी
उत्तर-   विजया राजाध्यक्ष

प्रश्न-८) जागतिक ओझोन पुरस्कार 2010
उत्तर-  डॉ. राजेन्द्र शेळे

प्रश्न-९) जागतिक प्रियदर्शनी अकादमी पुरस्कार 2010
उत्तर-   डॉ. अनिल काकोडकर

प्रश्न-१०) साहित्याचा नोबेल पुरस्कार 2010
उत्तर-  मारीओ लोसा (स्पॅनिश)

प्रश्न-११) भारतात पोलीस खात्याची स्थापना कोण्या गव्हर्नर जनरलच्या काळात करण्यात आली?
उत्तर-   वार्न हेस्टीग्ज!

प्रश्न-१२) कायामधारा पद्धत कोणत्या गव्हर्नर जनरलच्या काळात चालू करण्यात आली?
उत्तर-  लॉर्ड कॉंर्नवालीस (1786 ते 1793 व 1805)!

प्रश्न-१३) भारतीय सनदी सेवांचा जनक कोणत्या गव्हार्र जनरल म्हणतात?
उत्तर-   लॉर्ड कॉंर्नवालीस!

प्रश्न-१४) ब्रिटीश नागरी सेवाची सुरवात कोणत्या गव्हर्नर जनरलने केली ?
उत्तर-   लॉर्ड कॉंर्नवालीस!

प्रश्न-१५)मद्रास प्रेसिडेन्सीची स्थापना कोणत्या गव्हर्नर जनरलच्या काळात झाली?
उत्तर-   लॉर्ड वेलस्ली (1798 ते 1805)!

प्रश्न-१६) खालीलपैकी कोणत्या धातूशी पार्‍याचा संयोग होत नाही?
उत्तर-   लोह

प्रश्न-१७) कॉम्प्यूटरच्या क्षेत्रात 'एफएलओपी'चे विस्तृत रूप काय आहे?
उत्तर-   फ्लोटिंग पॉइंट ऑपरेशन्स पर सेकंड

प्रश्न-१८) इरुवका हा सण कोणत्या भारतीय राज्यातील शेतकर्‍यांद्वारे साजरा केला जातो?
उत्तर-   आंध्र प्रदेश

प्रश्न-१९) ढाका येथील नवाब सलीमुल्लाने 1906 मध्ये कोणत्या संस्थेची स्थापना केली होती?
उत्तर-   मुस्लिम लीग

प्रश्न-२०) 'मालाबार प्रिन्सेस' कोणत्या गोष्टीसाठी प्रसिद्ध आहे?
उत्तर-  एअर इंडियाचे आंतरराष्ट्रीय उड्डाण भरणारे प्रथम विमान

सौ्जन्य- तंत्रस्नेही शिक्षक समूह महाराष्ट्र