सुस्वागतम! सुस्वागतम!! सर्व सन्माननीय शिक्षणप्रेमी वाचक बंधु भगिनींचे आश्रमशाळा शिक्षकमित्र या शैक्षणिक ब्लॉगवर आपले हार्दिक स्वागत आहे

शनिवार, १६ जून, २०१८

दिनविशेष १६ जून

दिनविशेष १६ जून
१६ जुन १९६३-व्हॅलेन्तिना तेरेश्कोवा जगातील पहिली स्त्री अंतराळयात्री झाली
वालेंतिना व्लादिमिरोव्ना तेरेश्कोवा (रशियन: Валенти́на Влади́мировна Терешко́ва; जन्म: ६ मार्च १९३७) ही रशियन व्यक्ती अंतराळात पोचलेली जगातील पहिली महिला आहे. वोस्तोक ६ हे अंतराळयान चालवण्यासाठी सुमारे ४०० हून अधिक अर्जदारांमध्ये व सोडतीच्या अंतिम फेरीत पोचलेल्या पाच उत्सुक व्यक्तींमध्ये तेरेश्कोवाची निवड झाली. पेशाने एक यंत्रमाग कामगार असलेल्या तेरेश्कोवाला अंतराळयात्री बनवण्यासाठी अगोदर सोव्हियेत वायूसेनेमध्ये दाखल करण्यात आले. १६ जून १९६३ रोजी तिने वोस्तोक ६ हे यान उडवले. ती २ दिवस, २३ तास व १२ मिनिटे अंतराळामध्ये होती.

तेरेश्कोवाला सोव्हियेत संघामध्ये प्रचंड लोकप्रियता मिळाली व १९६९ साली तिने सोव्हियेत संघाच्या कम्युनिस्ट पक्षाचेसदस्यत्व घेतले. तेरेश्कोवाला सोव्हियेत संघाचा वीर हा देशामधील सर्वोच्च पुरस्कार तसेच बहुसंख्य राष्ट्रीय पुरस्कार मिळाले. तेरेश्कोवा राजकारणामध्ये कार्यरत राहिली व तिने सोव्हियेतमध्ये व जगात अनेक संस्थांमध्ये महत्त्वाची पदे भूषवली. तेरेश्कोवा सोत्शी येथील २०१४ हिवाळी ऑलिंपिक स्पर्धेसाठी ऑलिंपिक ध्वजरोहक होती

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा