सुस्वागतम! सुस्वागतम!! सर्व सन्माननीय शिक्षणप्रेमी वाचक बंधु भगिनींचे आश्रमशाळा शिक्षकमित्र या शैक्षणिक ब्लॉगवर आपले हार्दिक स्वागत आहे

रविवार, २९ जुलै, २०१८

सामान्यज्ञान प्रश्नसंग्रह भाग - ३१

सामान्यज्ञान प्रश्नसंग्रह भाग - ३१


प्रश्न-१) दुधात नेहमी काय टाकून प्यावे?
Ans:- हळद

प्रश्न-२) दूधात हळद टाकून का प्यावे?
Ans:- कैंसर न होण्यासाठी

प्रश्न-३) कोणती चिकित्सा पद्धति आरोग्यसाठी चांगली आहे?
Ans:- आयुर्वेद

प्रश्न-४) सोन्याच्या भांड्यातील पानी केव्हा पीणेे चांगले असते?
Ans:- ऑक्टोम्बर ते मार्च (हिवाळयात)

प्रश्न-५) तांब्याच्या भांडीतील पानी केव्हा पिने चांगले असते?
Ans:- जून ते सप्टेंबर (पावसाळयात)

प्रश्न-६)  ‘मूग गिळणे ‘ या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ द्या . -
Ans:- काही उत्तर न देता मुकाट्याने स्वस्थ बसणे.

प्रश्न-७)  खालील शब्दातील 'कटिबध्द' या अर्थाचा शब्द ओळखा.
Ans:- मेखला

प्रश्न-८) ..... जळले तरी पीळ जात नाही
Ans:- सुंभ

प्रश्न-९) उंबराचे फूल
उत्तर :- कधीही घडणारी गोष्ट

प्रश्न-१०) तिचे जीवन उदास झाले या वाक्यातील काळ ओळखा
उत्तर :- पुर्ण भूतकाळ

प्रश्न-११) मध्य प्रदेश सरकारतर्फे देण्यात येणारा लता मंगेशकर पुरस्काराने 2009-10 कोणाला सन्मानित करण्यात आले?
उत्तर :-  अनुराधा पौडवाल

प्रश्न-१२) मिस अर्थ स्पर्धा 2010-11 कोठे पार पडली?
उत्तर :-  व्हिएतनाम

प्रश्न-१३) 2010-11 चा मिस अर्थ किताब पटकावणारी सुंदरी?
उत्तर :-  निकोल फारिया (भारत)

प्रश्न-१४) अमेरिकेने सुरू केलेले ऑपरेशन
उत्तर :-  इराकी फ्रिडमचे राष्ट्रपती बराक ओबामा यांनी केलेले नामकरण ऑपरेशन न्यू डॉन

प्रश्न-१५) शहरातील कोणत्याही ठिकाणचे वायू प्रदूषण, वायू गुणवत्ता यांचे पूर्वानुमान लावण्यासाठी सुरू करण्यात आलेली नवीन प्रणाली
उत्तर :-  सफर

प्रश्न-१६) किशोरी आमोणकर कोणत्या घराण्याशी संबंधित आहेत?
उत्तर :-  जयपुर

प्रश्न-१७) धर्म व धर्मशास्त्र यांच्या वर अधिक चर्चा व्हावी या उद्देशाने कोणत्या समाज सुधारकाने 1815 मध्ये आत्मीय सभेची सुरुवात केली होती?
उत्तर :-  राजा राममोहन राय

प्रश्न-१८) कानपुर मेमोरियल चर्च' कोणाच्या स्मृतिप्रित्यर्थ बनवले गेले होते?
उत्तर :-  1857 च्या मृत इंग्रज सैनिकांसाठी

प्रश्न-१९) गोवरी' कोणत्या भारतीय राज्यातील नृत्य-नाटक आहे?
उत्तर :-  राजस्थान

प्रश्न-२०) असेट इंटरनॅशनल हा कोणत्या संस्थानाचा तंत्रज्ञान प्रशिक्षण विभाग आहे?
उत्तर :-  ऍप्टेक लिमिटेड

सौजन्य- तंत्रस्नेही शिक्षक समूह, महाराष्ट्र राज्य

विज्ञान कोडे भाग - ४४

विज्ञान कोडे भाग - ४४
ओबड-धोबड आहे त्वचा पृथ्वीची.
व्यवस्था करतो सजीवांच्या निवाऱ्याची.
करून ठेवतो पाण्याला धारण.
वनस्पतीच्या वाढीचे मुख्य साधन.
रेताड, खडकाळ तर कुठे सपाट.
शेती, घरे व डोंगराळ घाट.


उत्तर - जमीन (Land)

Like our Facebook page

     🏼 लेखक 🏼
SANDIP KRUSHNA JADHAO
    Chief Editor
    Noble Science
      7588090801
विज्ञान साक्षरता हाच आमचा ध्यास

ओळख मूलद्रव्यांची भाग - ६० - चांदी

ओळख मूलद्रव्यांची भाग - ६०

बहुपयोगी ‘चांदी’!

नाण्यांच्या जगतात मात्र आजही चांदी मोठय़ा प्रमाणात वापरली जाते.

दागिन्यांच्या विश्वात सोन्यानंतर चांदीचा क्रमांक असला तरी नाण्यांच्या जगतात मात्र आजही चांदी मोठय़ा प्रमाणात वापरली जाते. फार पूर्वीपासून, आपल्या देशात ‘चांदी’चा उपयोग चलन म्हणून केला जात असे. आयुर्वेदाच्या काळात तर कौटिल्य या बुद्धिवंताने, धातूच्या वस्तू तयार करणाऱ्या व्यापाऱ्यांना अनेक मोलाच्या सूचना केल्या होत्या. त्या काळी तांब्याची नाणी तयार केली जात असत. पण तांब्याची नाणी तयार करताना त्यात चार भाग चांदी, अकरा भाग तांबं आणि एक भाग लोखंड किंवा अन्य काही धातू घालावा असं नाणं तयार करण्याचं सूत्रच त्याने घालून दिलं होत; जेणेकरून नाणी उत्तम प्रकारे वापरता येण्यासाठीचे सारे गुणधर्म त्यात सामावले जातील.
चांदीवर नैसर्गिक आम्लांचा फारसा परिणाम होत नाही. हवेत जर गंधक किंवा गंधकाची संयुगे असतील तर मात्र चांदीचे सल्फाईड होते व चांदी काळवंडते. चांदी हा एवढा लवचीक धातू आहे की त्याची पातळ अशी फिल्मही तयार करता येते. चांदीला कोणतीही चव किंवा स्वाद नसतो, पण चांदी खायला काही हरकत नसते. त्यामुळे अन्नपदार्थ ठेवण्यासाठी आणि कधी अन्नपदार्थ सुशोभित करण्यासाठी, आपल्या देशातच नव्हे तर इतर अनेक देशांमध्ये, चांदीचा उपयोग करतात. ०.२ मायक्रॉन एवढी कमी जाडी असलेली ही पातळ चांदीची फिल्म खाद्यपदार्थाला चिकटून राहते आणि ती इतकी ठिसूळ असते की आपल्या हाताने बाजूलाही करता येत नाही.
पूर्वी कृष्णधवल फोटो असायचे. या फोटोग्राफीमध्ये तर चांदीचं आयोडाईड असल्याखेरीज कामच होत नाही. पाणी शुद्धीकरणासाठी चांदीचं ऑक्साइड तर आरसे, काचा, तर कधी चक्क काही प्रकारची शाई तयार करण्यासाठी चांदीच्या नायट्रेटचा वापर करतात. कृत्रिम पाऊस पडण्यासाठीही चांदीच्या आयोडाईडचा उपयोग केला जातो.
चांदी हा मौल्यवान धातू उत्तम विद्युतवाहक असल्याने त्याची इतर धातूंबरोबरची संमिश्रं विद्युत उपकरणांमध्ये वापरतात. चांदी उत्तम उष्णतावाहकही आहे. त्यामुळेच तर स्विचगिअर्स, थर्मोस्टॅट्स, सॉल्डर्स अशा तद्दन विद्युत आणि उष्णतेसंबंधित उपकरणांमध्ये चांदीच्या अनेक संमिश्रांचा वापर होतो.
डॉ. मानसी राजाध्यक्ष
मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२ 
office@mavipamumbai.org

दिनविशेष २९ जुलै

दिनविशेष २९ जुलै
डोरोथी क्रोफूट हॉजकिन - नोबेल पारितोषिक विजेत्या ब्रिटिश रसायनशास्त्रज्ञ
स्मृतिदिन - २९ जुलै १९९४
Image may contain: 1 person, smiling, closeup
डोरोथी मेरी क्रोफूट हॉजकिन (१२ मे, १९१०:कैरो, इजिप्त- २९ जुलै, १९९४:इल्मिंग्टन, वॉरविकशायर, इंग्लंड) या नोबेल पारितोषिक विजेत्या ब्रिटिश रसायनशास्त्रज्ञ होत्या. त्यांनी प्रोटीन क्रिस्टलोग्राफीचे तंत्र विकसित करुन त्याद्वारे पेनिसिलिन आणि व्हिटामिन ब१२च्या अणूरचनेबद्दलचे अंदाज शाबित केले. यासाठी त्यांना १९६४ सालचे रसायनशास्त्रातील नोबेल पारितोषिक देण्यात आले. त्यांच्या अनेक विद्यार्थ्यांमध्ये युनायटेड किंग्डमच्या पंतप्रधान मार्गारेट थॅचर आणि गाय डॉड्सनचा समावेश आहे.

विज्ञान कोडे भाग - ४३

विज्ञान कोडे भाग - ४३
नैसर्गिक व कृत्रिम असे दोन माझे प्रकार,
मला देता येतो वेगवेगळा आकार,
विशिष्ट झाडाच्या चीकापासून होते माझी निर्मिती,
ब्राझील देशात आढळते माझी मुबलक प्रजाती,
टणक माझ्या रूपामुळे दळणवळणात झाली क्रांती,
व्हल्कनायझेशनच्या शोधामुळे तुमच्या जीवनात झाली प्रगती.

उत्तर- रबर ( Rubber)

Like our Facebook page

     🏼 लेखक 🏼
SANDIP KRUSHNA JADHAO
    Chief Editor
    Noble Science
      7588090801
विज्ञान साक्षरता हाच आमचा ध्यास