ओळख शास्त्रज्ञांची - बेंजामीन फ्रँकलीन
अमेरिकन इतिहासातील
एक मोठे
मिथक म्हणून
आजही ज्याची
नोंद आहे,
ते बेंजामिन फ्रॅंकलिन आणि त्यांचा पतंग. शाळेच्या पुस्तकातून आपण
वाचत आलो,
की बेन्जामिन
महाशय एकदा
बाहेर पडले
असतांना, अचानक
आलेल्या भर
वादळात त्यांनी
आपला पतंग
उडवला आणि
त्या पतंगावर
वीज कोसळली.
अशा प्रकारे
बेंजामिन यांनी
अपघाताने का
होईना, विजेचा
शोध लावला.
सुदैवाची गोष्ट
अशी, की
बेंजामिन यांचे
नशीब त्यावेळी
त्याहून जोरदार
होते. अहो,
जर ती
वीज खरोखरच
त्या पतंगावर
पडली असती,
तर आमचे
बेंजामिनमहाशय त्यानंतर झालेल्या अमेरिकेच्या ऐतिहासिक
स्वातंत्र्य जाहीरनाम्यावर सही करण्यास उपस्थित
राहू शकले
नसते.
१७४६ मधील
बॉस्टन शहराच्या भेटीच्या वेळी
बेंजामिन फ्रॅंकलिन यांच्यासमोर
डॉ. अॅडॅम स्पेन्सर
या स्कॉटिश प्राध्यापकाने विद्युत शक्तीवरील एका प्रयोग
करून दाखवला.
स्थिर विद्युतशक्तीच्या
या प्रयोगात
अति उच्च
दाबामुळे उडालेल्या
ठिणग्या पाहून फ्रॅंकलिन महाशय अत्यंत प्रभावित
झाले. त्यांनी
स्पेन्सर यांचे
ते उपकरण
विकत घेऊन
टाकले. त्याशिवाय
आणखी काही
प्रयोग करण्याच्या
नादात फ्रॅंकलिन इतके पडले की
पीटर कोलीन्सन
या त्यांच्या
इंग्लंडमधील मित्राने, आणखी काही सामग्री
तसेच त्याने
केलेल्या प्रयोगांच्या
नोंदी बेन्जामिन
यांना पाठवल्या.
हा सारा
विषय फ्रॅंकलिन यांना इतका भावला
की त्यांनी
त्याबाबतीत युरोपमधील काही आघाडीच्या संशोधकांशी
संपर्क साधला.
त्यांचा असा
दावा होता
की ही
विद्युतशक्ती दोन प्रकारची आहे. एखादी
काचेची कांडी घासली, की त्यात स्थिर विद्युत
शक्ती निर्माण होते आणि ती कांडी
एखादा हलका
चेंडू आकर्षित करू शकते. फ्रॅंकलिन यांच्या प्रयोगांमुळे युरोपात उत्साहाची लाटच जणू आली. विद्युत
शक्तीचा अभ्यास करणा-या या व्यक्तिमत्वाविषयी
कुतूहल निर्माण झाले.
वयाची बेचाळीस वर्षे पूर्ण होत
असतांना मुद्रणाच्या व्यवसायात नाव कमावणा-या फ्रॅंकलिन यांनी आता
आपले लक्ष विद्युत शक्तीतील प्रयोगांवर केद्रित केले. त्यांना आता
जाणून घ्यायचे
होते की
आकाशातली वीज
आणि स्थिर विद्युत शक्ती यांचा काही परस्परांशी निकटचा संबध आहे की
काय, त्यांचे मूळ एकच आहे
की काय
? एका ढगातून दुस-या
ढगाकडे आणि त्या ढगापासून पृथ्वीकडे होणारा विद्युत शक्तीचा
प्रवास, हीच
कोसळणा-या
वीजेबाबतची आपली संकल्पना बरोबर आहे
की काय,
हे पडताळून पाहण्यासाठी
मग १७४९ मध्ये फिलाडेल्फिया
येथे प्रयोग केले गेले. तरीही त्यांना हवे
होते की हा वादळी
वातावरणातील ढगातून कडाडून
होणारा विजेचा कल्लोळ कसा काय
“पकडता” येईल. आणि मग तसे
झाले तर,
तो एखाद्या कुपीत साठवून त्यावर
अभ्यास करता
येईल काय
? म्हणून त्यांनी ढगातून होणा-या
विद्युत भारावर
प्रयोग करण्याचे
योजले. ते असे काहीसे होते
:-
” एखाद्या उंचच उंच मनो-यावर
अथवा सुळक्यावर पहारेक-याच्या
खोलीसारख्या (sentry-box) एका बंद
कक्षाची स्थापना करा की
ज्यात एक माणूस व एक
विद्युत टेबल (electrical stand) असेल.
त्या टेबलाच्या मध्यभागी एक लोखंडी रॉड उभा करा. त्याचे टोक वाकवून वरच्या दिशेला वीस ते
तीस फूट एवढे दाराबाहेर आणा. ते टेबल
मात्र स्वच्छ आणि कोरडे ठेवायला पाहिजे. जेव्हा आकाशात ढग
त्या मनो-याजवळून जात असतील तेव्हा त्या
खोलीतील माणसाने टेबलावर उभे राहावे. विजेचा
धक्का किंवा
विजेच्या लोळातून निर्माण होणा-या
ठिणग्या यांपासून त्या माणसाला इजा
न होण्याची
प्रतिबंधक योजना करा. “
प्रिस्टले लिहिलेल्या
प्रयोगाच्या वृत्तांतातील एक
वाक्य वाचा
:-
” एक आशेचा
ढग आला
आणि काहीही
न घडता
निघून गेला.
तेवढ्यात दोरी
सैल झालेली
आढळली. फ्रॅंकलिन यांनी आपल्या बोटाने
ती किल्ली
धरली आणि
शोधाची समाप्ती
झाली. फ्रॅंकलिन यांना एक जाणवेल
असा विजेचा हलकासा धक्का
बसला होता. “
फ्रॅंकलिन यांच्या किल्लीवर ठिणग्या पडत होत्या आणि विद्युत शक्ती एका घटामध्ये
(Leyden jar) जमा होत होती. येथे एक महत्वाची गोष्ट नमूद केली पाहिजे, की कोणत्याही क्षणी फ्रॅंकलिन यांच्या पतंगावर वीज कोसळली नव्हती. ढगातून कोणत्याही प्रकारचा धक्का पतंगाला जाणवला नव्हता. खरे पाहिले तर तो फ्रॅंकलिन यांचा उद्देशही नव्हता. त्यांना फक्त ढगामधून दोरीच्या माध्यमातून विद्युत भार जमा करायचा होता. ती दोरी फ्रॅंकलिन जमिनीला लावेपर्यंत विद्युत भारीत झाली होती आणि फ्रॅंकलिन
यांचे बोट त्या किल्लीला लागल्यावर तो भार त्यांच्या शरीरातून जमिनीत गेला होता.