सुस्वागतम! सुस्वागतम!! सर्व सन्माननीय शिक्षणप्रेमी वाचक बंधु भगिनींचे आश्रमशाळा शिक्षकमित्र या शैक्षणिक ब्लॉगवर आपले हार्दिक स्वागत आहे

गुरुवार, २१ जून, २०१८

विज्ञानकोडे भाग-६

विज्ञानकोडे भाग-६
निकेल, लोह, क्रोमिअमचे आहे मिश्रण
उष्णतेने होते माझे प्रसरण
चकचकीत आहे, नाही गंजत कधी
पसंती असते माझी सर्वात आधी
अद्ययावत पदार्थ म्हणून सर्वत्र वापर

भांड्याच्या रूपात आहे घराघरात वावर

उत्तर- स्टेनलेस स्टील – Stainless steel

वैज्ञानिक स्पष्टीकरण
निकेल, क्रोमियम, लोह व कार्बन यांच्या संमिश्राला स्टेनलेस स्टिल असे म्हणतात. यामध्ये लोह 70 ते 90 टक्के व कार्बन 0.1 ते 0.7 टक्के असतो. क्रोमियम धातुमूळे पोलादाच्या गंजण्याच्या प्रक्रियेला आळा बसतो. त्यामुळे स्टिलच्या वस्तू न गंजता जास्त दिवस टिकतात. स्टेनलेस स्टिल हा चकचकीत पदार्थ असून त्यापासून विविध भांडी तयार केली जातात. विविध वाहनांचे भाग व औद्योगिक उपकरणे तयार करण्यासाठी स्टेनलेस स्टिलचा वापर केला जातो. 
--------------------------------------
Like our Facebook page
https://www.facebook.com/noblesciencemagazine/

       ✍🏼 Writer✍🏼
SANDIP KRUSHNA JADHAO
    Chief Editor
    Noble Science
      7588090801
विज्ञान साक्षरता हाच आमचा ध्यास

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा