सुस्वागतम! सुस्वागतम!! सर्व सन्माननीय शिक्षणप्रेमी वाचक बंधु भगिनींचे आश्रमशाळा शिक्षकमित्र या शैक्षणिक ब्लॉगवर आपले हार्दिक स्वागत आहे
विज्ञान कोडे लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
विज्ञान कोडे लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

रविवार, २९ जुलै, २०१८

विज्ञान कोडे भाग - ४४

विज्ञान कोडे भाग - ४४
ओबड-धोबड आहे त्वचा पृथ्वीची.
व्यवस्था करतो सजीवांच्या निवाऱ्याची.
करून ठेवतो पाण्याला धारण.
वनस्पतीच्या वाढीचे मुख्य साधन.
रेताड, खडकाळ तर कुठे सपाट.
शेती, घरे व डोंगराळ घाट.


उत्तर - जमीन (Land)

Like our Facebook page

     🏼 लेखक 🏼
SANDIP KRUSHNA JADHAO
    Chief Editor
    Noble Science
      7588090801
विज्ञान साक्षरता हाच आमचा ध्यास

विज्ञान कोडे भाग - ४३

विज्ञान कोडे भाग - ४३
नैसर्गिक व कृत्रिम असे दोन माझे प्रकार,
मला देता येतो वेगवेगळा आकार,
विशिष्ट झाडाच्या चीकापासून होते माझी निर्मिती,
ब्राझील देशात आढळते माझी मुबलक प्रजाती,
टणक माझ्या रूपामुळे दळणवळणात झाली क्रांती,
व्हल्कनायझेशनच्या शोधामुळे तुमच्या जीवनात झाली प्रगती.

उत्तर- रबर ( Rubber)

Like our Facebook page

     🏼 लेखक 🏼
SANDIP KRUSHNA JADHAO
    Chief Editor
    Noble Science
      7588090801
विज्ञान साक्षरता हाच आमचा ध्यास

शनिवार, २८ जुलै, २०१८

विज्ञान कोडे भाग - ४२

विज्ञान कोडे भाग - ४२
निसर्गाची मी आहे शोभा.
जन्मापासून आहे सदैव उभा.
अन्न आहे माझे सूर्यप्रकाश नि पाणी.
अंगाखाद्यावर बसून पक्षी गातात गाणी.
माझ्यामुळे तुम्हाला प्राणवायू मिळतो.
तुम्हाला सावली देताना मी उन्हात तळतो.

उत्तर- झाड ( Tree)

Like our Facebook page

     🏼 लेखक 🏼
SANDIP KRUSHNA JADHAO
    Chief Editor
    Noble Science
      7588090801

विज्ञान साक्षरता हाच आमचा ध्यास

विज्ञान कोडे भाग - ४१

विज्ञान कोडे भाग - ४१
चव असते माझी आंबट गोड, 
वेलीला टांगला असतो घड.
पक्व फळ माझे आहे उत्तम खाद्य, 
काही प्रजातीपासून बनवितात मद्य.
रसाळ मृदुफळे गोलसर बांधणी, 
आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत जास्त आहे मागणी.


उत्तर- द्राक्षे    ( Grapes )

Like our Facebook page

     🏼 लेखक 🏼
SANDIP KRUSHNA JADHAO
    Chief Editor
    Noble Science
      7588090801
विज्ञान साक्षरता हाच आमचा ध्यास

विज्ञान कोडे भाग - ४०

विज्ञान कोडे भाग - ४०
कृत्रिम मानवाचा आधुनिक प्रकार, 
विद्युत उपकरण माझे वेगवेगळे आकार.
स्वयंचलित बहुपयोगी यांत्रिक उपकरण, 
विकासासाठी माझ्या अहोरात्र संशोधन.
उद्योगात आहे माझा सर्रास वापर, 
सांगकामे काम माझे संगणक अज्ञावलीवर.
ओळखा पाहू मी आहे कोण?


उत्तर- यंत्रमानव (Robot)

Like our Facebook page

     🏼 लेखक 🏼
SANDIP KRUSHNA JADHAO
    Chief Editor
    Noble Science
      7588090801
विज्ञान साक्षरता हाच आमचा ध्यास

विज्ञान कोडे भाग - ३९

विज्ञान कोडे भाग - ३९
कीटकजन्य एक मधुर पदार्थ, 
आयुर्वेदातून वर्णिले औषधी गुणधर्म.
दडलेला असतो सुंदर फुलात. 
साठविला जातो षट्कोनी पोळ्यात.
संरक्षक माझी सैनिकी माशी, 
टांगली झाडावर मेणाची पोळी, 
ओळखा पाहू मी आहे कोण?


उत्तर- मध  (Honey)

Like our Facebook page

     🏼 लेखक 🏼
SANDIP KRUSHNA JADHAO
    Chief Editor
    Noble Science
      7588090801
विज्ञान साक्षरता हाच आमचा ध्यास

विज्ञान कोडे भाग - ३८

विज्ञान कोडे भाग - ३८
स्वयंपोशी वनस्पतींचे वैशिष्ट्य महान, 
वनस्पतीच्या वाढीची प्रक्रिया छान.
गरज असते सूर्यप्रकाशाची, 
पाणी आणि कार्बन डाय ऑक्साइडची.
अन्न तयार करणारी प्रणाली वनस्पतीची, 
महत्वाची भूमिका हरितलवकाची.
ओळखा पाहू मी आहे कोण?


उत्तर- प्रकाश संश्लेषण (Photosynthesis)

Like our Facebook page

     🏼 लेखक 🏼
SANDIP KRUSHNA JADHAO
    Chief Editor
    Noble Science
      7588090801
विज्ञान साक्षरता हाच आमचा ध्यास

विज्ञान कोडे भाग - ३७

विज्ञान कोडे भाग - ३७
रस्त्यावर असणारा उंचवटा, 
ब्रेक दाबा पटापटा.
भरधाव वाहनांचा कमी करतो वेग, 
देतो मी चालकाला सावधगिरीचा संदेश.
अपघातापासून करतो बचाव, 
रस्ते सुरक्षा उत्तम उपाय, 
ओळखा पाहू मी आहे कोण?


उत्तर- गतिरोधक (Speed Breaker)

Like our Facebook page

     🏼 लेखक 🏼
SANDIP KRUSHNA JADHAO
    Chief Editor
    Noble Science
      7588090801
विज्ञान साक्षरता हाच आमचा ध्यास

शुक्रवार, २० जुलै, २०१८

विज्ञान कोडे भाग - ३६

विज्ञान कोडे भाग - ३६
हवेतील ओलावा मोजतो मी, 
पावसाचा अंदाज सांगतो मी
गरजेनुसार वापर विविध प्रकाराचा, 
मार्गदर्शक आहे औद्योगिक प्रक्रियेचा
हवेतील आर्द्रतेवर बाष्पीभवनाचा वेग, 
प्रसरण पावतो जोडलेला केस

उत्तर- आर्द्रतामापी  (Hygrometer)

Like our Facebook page

     🏼 लेखक 🏼
SANDIP KRUSHNA JADHAO
    Chief Editor
    Noble Science
      7588090801
विज्ञान साक्षरता हाच आमचा ध्यास



विज्ञान कोडे भाग - ३५

विज्ञान कोडे भाग - ३५
कळपात राहतो जंगल माझे घर, 
शिंगे असणारा ओळखावा नर
शिंगांच्या वैशिष्ट्यावरून ठरते माझी जात, 
धावतांना करतो सर्वांवर मात
खुरे पायाला शाखा माझ्या शिंगाला, 
अन्न म्हणून खातो झाडपाला गवताला,
ओळखा पाहू मी आहे कोण?


उत्तर- हरीण (Deer)

Like our Facebook page

     🏼 लेखक 🏼
SANDIP KRUSHNA JADHAO
    Chief Editor
    Noble Science
      7588090801
विज्ञान साक्षरता हाच आमचा ध्यास

विज्ञान कोडे भाग - ३४

विज्ञान कोडे भाग - ३४
वृक्षवासी प्राणी शेपूट गोंडेदार, 
कृतक आहे माझा परिवार.
चाहूल लागताच जाते पळून, 
तात्पुरते अन्न तोंडात साठवून.
बीया फळे फुले आहे माझे अन्न, 
घरट्यात देते पिलांना जन्म. 
ओळखा पाहू मी आहे कोण?

उत्तर- खार / खारूताई (Squirrel)

Like our Facebook page

     🏼 लेखक 🏼
SANDIP KRUSHNA JADHAO
    Chief Editor
    Noble Science
      7588090801
विज्ञान साक्षरता हाच आमचा ध्यास

विज्ञान कोडे भाग - ३३

विज्ञान कोडे भाग - ३३
आकाशस्त वस्तूचे झाकले जाणे, 
अडविली जातात सूर्य किरणे.
खेळ आहे सर्व सावलीचा, 
एका रेषेत आलेल्या त्रिकुटाचा
सूर्यबिंबाला वेढनारा प्रकार. 
बदलत जातो माझा आकार, 
ओळखा पाहू मी आहे कोण?

उत्तर- ग्रहण (Eclipse)

Like our Facebook page

     🏼 लेखक 🏼
SANDIP KRUSHNA JADHAO
    Chief Editor
    Noble Science
      7588090801
विज्ञान साक्षरता हाच आमचा ध्यास

विज्ञान कोडे भाग - ३२

विज्ञान कोडे भाग - ३२
कार्बनचे एक महत्वाचे अपरुप, 
चकचकीत काळपट माझे स्वरूप.
अधातु असणारा विद्युत चालक, 
गुळगुळीत भासणारा उष्णता वाहक.
अणुभट्टी मध्ये करतो मदत, 
शाळेच्या दप्तरात नेहमी सोबत, 
ओळखा पाहू मी आहे कोण?


उत्तर- ग्राफाईट  (Graphite)

Like our Facebook page

     🏼 लेखक 🏼
SANDIP KRUSHNA JADHAO
    Chief Editor
    Noble Science
      7588090801

विज्ञान साक्षरता हाच आमचा ध्यास

बुधवार, १८ जुलै, २०१८

विज्ञान कोडे भाग - ३१

विज्ञान कोडे भाग - ३१
मनगटावर शोभे तुमच्या छान, 
करून देतो वेळेचे भान.
असते मला दोलकाची जोड, 
अचूक करतो वेळेची फोड.
लहान मोठे तीन सहकारी, 
तिघांची असते स्पर्धा भारी, 
ओळखा पाहू मी आहे कोण?


 उत्तर- घड्याळ (Watch)

Like our Facebook page

     🏼 लेखक 🏼
SANDIP KRUSHNA JADHAO
    Chief Editor
    Noble Science
      7588090801
विज्ञान साक्षरता हाच आमचा ध्यास

विज्ञान कोडे भाग - ३०

विज्ञान कोडे भाग - ३०
सस्तन प्राणी केसाळ माझे अंग, 
जंगलात राहतो दुरून ओळखतो गंध
झोपेत घोरतो कर्कश आवाजात, 
काही प्रजाती माझ्या शीतनिद्रेत जातात
आवड आहे मला फुल, फळ नि मधाची, 
झाडावर चढण्यास मदत घेतो नखाची,
ओळखा पाहू मी आहे कोण?


उत्तर-अस्वल( Bear)

Like our Facebook page

     🏼 लेखक 🏼
SANDIP KRUSHNA JADHAO
    Chief Editor
    Noble Science
      7588090801

विज्ञान साक्षरता हाच आमचा ध्यास

विज्ञान कोडे भाग - २९

विज्ञान कोडे भाग - २९
समुद्राच्या पाण्याचा आवर्ती चढउतार, 
चंद्राच्या आकर्षणाने घडणारा प्रकार
कमीजास्त होतो पाण्याचा विस्तार, 
दिवसातून दोन वेळा घडणारा प्रकार, 
ओळखा पाहू मी आहे कोण?


उत्तर- भरती - ओहोटी (Tide)

Like our Facebook page

     🏼 लेखक 🏼
SANDIP KRUSHNA JADHAO
    Chief Editor
    Noble Science
      7588090801
विज्ञान साक्षरता हाच आमचा ध्यास

विज्ञान कोडे भाग - २८

विज्ञान कोडे भाग - २८
आम्ही आहे भावंडे आठ, 
होत नाही कधीच आमची भेटगाठ
परिवलन स्वतःभोवती, 
ताऱ्याभोवती परिभ्रमण, 
अस्वयंप्रकाशीत गोळ्यांचे वैशिष्ट्य गुरुत्वाकर्षण
वेगवेगळे आहेत गुणधर्म, आकार, 
खडकाळ वायूमय आमचे प्रकार, 
ओळखा पाहू मी आहे कोण?


उत्तर- ग्रह (Planet)

Like our Facebook page

     🏼 लेखक 🏼
SANDIP KRUSHNA JADHAO
    Chief Editor
    Noble Science
      7588090801
विज्ञान साक्षरता हाच आमचा ध्यास