सुस्वागतम! सुस्वागतम!! सर्व सन्माननीय शिक्षणप्रेमी वाचक बंधु भगिनींचे आश्रमशाळा शिक्षकमित्र या शैक्षणिक ब्लॉगवर आपले हार्दिक स्वागत आहे

शनिवार, ७ जुलै, २०१८

दिनविशेष ८ जुलै

दिनविशेष ८ जुलै
सर विल्यम एडवर्ड पॅरी - प्रवासी, वैज्ञानिक
८ जुलै १८५५
पॅरी, सर विल्यम एडवर्ड : (१९ डिसेंबर १७९० – ८ जुलै १८५५). ब्रिटिश समन्वेषक. इंग्लंडमधील बाथ येथे जन्म. वयाच्या तेराव्या वर्षी ब्रिटिश नाविक दलात दाखल. १८१८ साली सर जॉन रॉसच्या नेतृत्वाखालील उत्तर ध्रुवाच्या मोहिमेत तो सामील झाला. स्वतंत्रपणे १८१९ साली उत्तर ध्रुवाकडील वायव्य मार्गाच्या मोहिमेवर असताना तो ११४° प. रेखावृत्तापर्यंत जाऊन पोहोचला. या प्रवासातील यशाबद्दल त्याला ब्रिटिश संसदेतर्फे ५,००० पौंडाचे बक्षीस मिळाले. या मोहिमेत त्याने बॅफिनच्या उपसागरात प्रवेश केला आणि बॅरो सामुद्रधुनी, प्रिन्स रीजंट खाडी, व्हायकाउंट मेलव्हिल सामुद्रधुनी, मक्लर सामुद्रधुनी आणि वेलिंग्टन खाडी यांचा शोध लावला. उत्तर ध्रुवाकडील दुसऱ्या मोहिमेत (१८२१–२३) बर्फ वितळण्याची वाट पाहत त्याने मेलव्हिल द्वीपकल्पाच्या पूर्व किनाऱ्याजवळ दोन हिवाळे काढले. या काळात त्याने एस्किमोंचा अभ्यास केला आणि बरीच वैज्ञानिक माहिती गोळा केली. १८२४-२५च्या तिसऱ्या मोहिमेत प्रिन्स रीजंट खाडीत त्याचे एक गलबत फुटले. १८२७ मध्ये स्पिट्सबर्गेनमार्गे उत्तर ध्रुव गाठण्याचा त्याने प्रयत्न केला; परंतु अनेक अडचणींमुळे तो ८२° ४५’ उत्तर अक्षवृत्तापर्यंतच जाऊ शकला. त्यापूर्वी हा टप्पा कोणीच गाठला नव्हता. १८२९ साली पॅरीला ‘सर’ हा किताब देण्यात आला. १८५२ साली त्याला पॅरीला अ‍ॅडमिरल करण्याट आले.आपल्या तीन मोहिमांचे ’जर्नल’ तसेच नॅरेटीव्ह ऑफ अ‍ॅन अटेम्प्ट टू रिच द नॉर्थ पोल इन बोट्स (१८२८) हा ग्रंथ त्याने प्रसिद्ध केला.
Image may contain: 1 person

शुक्रवार, ६ जुलै, २०१८

सामान्यज्ञान प्रश्नसंग्रह भाग - २१

सामान्यज्ञान प्रश्नसंग्रह भाग - २१
प्रश्न-१) खालील पैकी कोणास 'काळकर्ते परांजपे' म्हणून ओळखले जाते ?
उत्तर :- रघुनाथराव परांजपे

प्रश्न-२) "आमचे दोष आम्हाला कधी दिसू लागतील " हा निबंध __ यांनी लिहिला.
उत्तर :- गोपाळ गणेश आगरकर

प्रश्न-३) खालील पैकी कोणी 'डेक्कन एज्युकेशन सोसायटी' चे अध्यक्ष पद भूषविले होते ?
उत्तर :- शाहू महाराज

प्रश्न-४) 'सब भूमी गोपाल की' व 'जय जगत' या घोषणांचे व त्यामागील विचार धारेचे श्रेय __ यांना जाते.
उत्तर :- विनोबा भावे

प्रश्न-५) 'भारतीय सामाजिक परिषदे' च्या स्थापनेचे श्रेय न्यायमूर्ती रानडे यांना जाते, कोणत्या वर्षी या परिषदेची स्थापना करण्यात आली ?
उत्तर :- 1887

प्रश्न-७) ग्रीन हाऊस गॅस उत्सर्जनमध्ये भारताचा कितवा क्रमांक लागतो?
उत्तर :-  तिसरा

प्रश्न-८) वयाची 18 वष्रे पूर्ण केलेल्या तृतीयपंथासाठी सन्मानजनक जीवन जगण्यासाठी सर्वप्रथम कोणत्या राज्याने पेन्शन योजना सुरू केली?
उत्तर :-  दिल्ली

प्रश्न-९) संयुक्त राष्ट्रातर्फे महिलांना समान अधिकार व सशक्तीकरण देण्यासाठी सन 2010 मध्ये निर्माण करण्यात आलेली नवीन संज्ञा कोणी लिहिली?
उत्तर :-  यूएन वूमेन

प्रश्न-१०) मिस इंटरनॅशनल क्वीन 2010 चा पुरस्कार कोणी जिंकला?
उत्तर :-  मिनी (दक्षिण कोरिया)

प्रश्न-११) आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघातर्फे देण्यात येणारा वर्षांतील सर्वोत्कृष्ट खेळाडूचा किताब कोणाला देण्यात आला?
उत्तर :-  जैमी ड्वेअर व लुसयाना आयमर

प्रश्न-१२) World Kidney Day कधी साजरा केला जातो?
उत्तर :-  मार्च 14

प्रश्न-१३) अभिनेता विक्रम गोखले यांना कोणत्या चित्रपटातील अभिनयासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला आहे?
उत्तर :-  अनुमती

प्रश्न-१४)  यंदाचा सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार कोणत्या चित्रपटास जाहीर झाला आहे
उत्तर :-  इन्वेस्टमेंट

प्रश्न-१५)  भारतीय नौसेनेच्या प्रथम एअर स्टेशनचे नाव काय होते?
उत्तर :-  आयएनएस गरुड

प्रश्न-१६)  कॉम्प्यूटरच्या भाषेत एसडीआरएएम चा विस्तार काय आहे?
उत्तर :-  सिंक्रोनस डायनॅमिक रॅम

प्रश्न-१७)  महाराष्ट्रात संपूर्ण विद्युतीकरण झालेला प्रथम जिल्हा कोणता?
उत्तर :-  वर्धा

प्रश्न-१८) महाराष्ट्रातील पश्चिम घाटाला ....... म्हणून ओळखतात.?
उत्तर :-  सह्याद्री

प्रश्न-१९) महाराष्ट्रातील पहिला सहकारी साखर कारखाना कोणता आणि कुठे स्थापन करण्यात आला?
उत्तर :-  अहमदनगर जिल्हा (प्रवरानगर)

प्रश्न-२०) भारतात सर्वात जास्त कापड गिरण्या ......... आहे.?
उत्तर :-  महाराष्ट्रामध्ये आहेत

प्रश्न-२१) महाराष्ट्रात चलनी नोटांचा कारखाना ........ आहे.?
उत्तर :-  नाशिक येथे आहे

सौजन्य - तंत्रस्नेही शिक्षक समूह, महाराष्ट्र

विज्ञान कोडे भाग - २२

विज्ञान कोडे भाग - २२
दिसत नाही कुणालाचमी फक्त जाणवते.  
सजीवांना साऱ्यामी खूप मानवते.
हलके भासणारेआहे एक मिश्रण.  
डोक्यावर सर्वांच्या, आहे हजारो टन.
ओळखा पाहू मी आहे कोण?

उत्तर :-  हवा (AIR)


वैज्ञानिक स्पष्टिकरण:- पृथ्वीच्या भूपृष्ठालगतच्या वायूंच्या मिश्रणास हवा असे म्हणतात. सजीवांना हवा आवश्यक आहे. हवा ही हलकी भासते मात्र हवेला स्वतःचे वजन असते. आपल्या डोक्यावर हजारो टन हवा आहे. पण आपल्याला ती जाणवत नाही. हवेपासून पवनचक्की ने विद्युतनिर्मिती करता येते. हवा हे ऑक्सिजन, कार्बन डाय ऑक्साईड, नायट्रोजन इत्यादी वायूंचे मिश्रण आहे.
Like our Facebook page

     🏼 लेखक 🏼
SANDIP KRUSHNA JADHAO
    Chief Editor
    Noble Science
      7588090801
विज्ञान साक्षरता हाच आमचा ध्यास

ओळख मूलद्रव्यांची भाग - ३७ - कोबाल्ट

ओळख मूलद्रव्यांची भाग - ३७ 

कोबाल्ट

अजैविक स्वरूपातील कोबाल्ट हा जिवाणू, एकपेशीय वनस्पती आणि बुरशी यांचा सूक्ष्म पोषक आहे. 

१७३९ मध्ये स्वीडिश शास्त्रज्ञ जॉर्ज ब्रँट यांनी एका गडद निळ्या रंगाच्या खनिजापासून कोबाल्टचा शोध लावला. निळ्या रंगाची काच तयार होताना येणारा रंग हा बिस्मथमुळे नसून अन्य रासायनिक घटकामुळे आहे. हे सिद्ध करताना हा शोध लागला. मूळ  कोबाल्टची बिस्मथबरोबर रासायनिक अभिक्रिया होऊन निळी रंगद्रव्ये तयार होतात.
कोबाल्ट हे नाव जर्मन कोबोल्ड (सहजासहजी न दिसणारे/ सापडणारे या अर्थाने) या शब्दापासून देण्यात आले. कोबाल्ट हे सामान्यत: निकेल, लोह, तांबे, चांदी मिळविण्याच्या प्रक्रियेतील उपउत्पादन! कोबाल्ट हा करडय़ा रंगाचा कठीण असा धातू. कोबाल्टचे जगात सर्वाधिक उत्पादन (५०%) आफ्रिका खंडाच्या मध्यभागी असणाऱ्या ‘काँगोचे लोकशाही प्रजासत्ताक’या देशातून होते. त्याखालोखाल सेंट्रल आफ्रिकन रिपब्लिक, झाम्बिया, चीन यांचा क्रमांक येतो.
कोबाल्ट सिलिकेट, कोबाल्ट अ‍ॅल्युमिनेट यांसारख्या संयुगांपासून मिळणाऱ्या निळ्या रंगाच्या शाईचा उपयोग काच, सिरॅमिक, वार्निश तसेच शोभेच्या वस्तूंमध्ये केला जातो.
नैसर्गिकदृष्टय़ा कोबाल्ट हे एक स्थिर समस्थानिकआहे. परंतु त्यापासून तयार होणाऱ्या कोबाल्ट-५०, कोबाल्ट-६० याकिरणोत्सारी समस्थानिकांचा वापर व्यावसायिकदृष्टय़ा प्रचंड ऊर्जा असलेले गॅमा किरण तयार करण्यासाठी केला जातो, ज्याचा वापर कर्करोगावरील उपचारात केला जातो.‘वैद्यकीय बंदुकीत’ कोबाल्ट-६० या समस्थानिकाचे कण ठेवून घातक अर्बुदांवर (टय़ूमरवर) त्यांचा मारा केला जातो, यात दूषित पेशी नष्ट होतात. एक न गंजणारा धातू असल्यामुळे कोबाल्टचा उपयोग धातूच्या वस्तूंना मुलामा देण्यासाठी आणि मिश्र धातू तयार करण्यासाठी मोठय़ा प्रमाणात केला जातो. त्याचबरोबर उच्च तापमानात धातू कापण्यासाठी वापरली जाणारी हत्यारे, जेट इंजिन, गॅसवर चालणारी जनित्रे, चुंबक, स्टेनलेस स्टील यामध्येदेखील कोबाल्ट वापरले जाते. कोबाल्टपासून निळी तसेच पिवळी आणि हिरवी रंगद्रव्येदेखील बनविता येतात.
अजैविक स्वरूपातील कोबाल्ट हा जिवाणू, एकपेशीय वनस्पती आणि बुरशी यांचा सूक्ष्म पोषक आहे.
कोबाल्ट हे सर्व प्राणिमात्रांच्या शरीरातील एक महत्त्वाचे खनिज आहे.
ई-१२ व्हिटॅमिनच्या शरीरातील कमतरतेबद्दल अलीकडे सतत ऐकावयास मिळते; ती भरून काढण्यासाठी कोबाल्ट हा एक महत्त्वाचा स्रोत आहे.
– ललित जगन्नाथ गायकवाड
मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२  office@mavipamumbai.org

दिनविशेष ७ जुलै

दिनविशेष ७ जुलै
७ जुलै १९३०
अमेरिकेत हुवर धरणाचे बांधकाम सुरु
हूवर धरण (इंग्लिश: Hoover Dam) हे अमेरिकेच्या नेव्हाडा व अ‍ॅरिझोना राज्यांच्या सीमेवरून वाहणार्‍या कॉलोराडो नदीवरील एक धरण आहे. १९३६ साली बांधून पूर्ण केलेले हूवर धरण ३७९ मी लांब व २२१.४ मी उंच आहे.
नैऋत्य अमेरिकेतील दुष्काळी व वाळवंटी भागांत पाणी तसेच जलविद्युत निर्मितीसाठी हे धरण बांधले गेले. ह्या धरणामधून २०८० मेगावॉट विजनिर्मिती व ११,००० घनमीटर प्रतिसेकंद जलप्रवाह होऊ शकतो. लास व्हेगासशहराच्या ४० किमी आग्नेयेला असलेले हूवर धरण ह्या भागातील एक लोकप्रिय पर्यटक आकर्षण आहे.

Image may contain: bridge, outdoor and water


गुरुवार, ५ जुलै, २०१८

सामान्यज्ञान प्रश्नसंग्रह भाग - २०

सामान्यज्ञान प्रश्नसंग्रह भाग - २०
प्रश्न-१) फोब्सच्या यादीमध्ये या व्यक्तीचे विश्वातील सर्वाधिक शक्तीशाली व्यक्तींच्या यादीमध्ये समावेश असला तरी विश्वातील सर्वात शक्तीशाली महिला या यादीमध्ये समवेश नाही.
उत्तर :-  सोनिया गांधी

प्रश्न-२) फोब्सच्या यादीमध्ये सर्वात शक्तीशाली व्यक्तीमध्ये प्रथम क्रमांक या राष्ट्रपतींचा लागतो?
उत्तर :-  हू जिताओ

प्रश्न-३) सीएनएन या चॅनलद्वारा देण्यात येणारा प्रतिष्ठित ‘सीख ऑफ द इयर’चा पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला?
उत्तर :-  अमरजित सिंह चंडोक

प्रश्न-४) फ्रान्स सरकारतर्फे देण्यात येणारा सर्वोच्च नागरिक पुरस्कार ‘शैवेसिअर डेन्स ऑर्डरी डेस आर्ट्स एट उत्तर :-  हरिप्रसाद चौरसिया

प्रश्न-५) भारताच्या नियंत्रण व महालेखापाल (कॅग) यांनी नवीन लोगो (प्रतीक चिन्ह) स्वीकारले आहे हे प्रतीक यांनी बनवले आहे.
उत्तर :-  शिवम दुआ

प्रश्न-६) डोंगराळ प्रदेशात भूस्खलन होण्याचे करण म्हणजे:
उत्तर :- वनसंहार

प्रश्न-७) जागतिक पर्यावरण दिवस कोणत्या तारखेस प्रत्येक वर्षी साजरा केला जातो?
उत्तर :- 5 जून

प्रश्न-८) खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या ऊर्जाच्या वापराविषयी अनेक लोकाच्या मनात मोठ्या प्रमाणात भीती आहे?
उत्तर :- अणु ऊर्जा

प्रश्न-९) रिख्टर स्केलच्या साहाय्याने काय मोजले जाते?
उत्तर :- भूकपंलहरी

प्रश्न-१०) 1917 व 1934 च्या दरम्यान महात्मा गांधी मुंबईत कोठे रहात असत?
उत्तर :-  मणि भवन

प्रश्न-११) भारतीय नौसेनेच्या प्रथम एअर स्टेशनचे नाव काय होते?
उत्तर :-  आयएनएस गरुड

प्रश्न-१२) कॉम्प्यूटरच्या भाषेत एसडीआरएएम चा विस्तार काय आहे?
उत्तर :-  सिंक्रोनस डायनॅमिक रॅम

प्रश्न-१३) मिनिकॉय, कदमत व बित्रा कोणत्या केंद्रशासीत प्रदेशाचे प्रांत आहेत?
उत्तर :-  लक्षद्वीप

प्रश्न-१४) कॉम्प्यूटरच्या भाषेत एस.एल.आय.पी. (स्लिप) चा विस्तार काय आहे?
उत्तर :-  सिरीअल लाइन इंटरनेट प्रोटोकॉल

प्रश्न-१५) 6001 -7500 या लोकसंख्येसाठी ग्रामपंचायतीची सदस्य संख्या किती ?
उत्तर :- 15

प्रश्न-१६) वित्त , बाधकाम, आरोग्य व शिक्षण या चार समित्यांची सभापती कोण असतात ?
उत्तर :- जिल्हा परिषदेचा उपाध्यक्ष

प्रश्न-१७) पंचायत समितीचा सभापती आपला राजीनामा कोणाकडे देतो ?
उत्तर :- जि. प. अध्यक्ष

प्रश्न-१८)  वसंतराव नाईक समिती कोणत्या दिवशी नेमली गेली ?
उत्तर :- 1 मे 1960 

प्रश्न-१९) महाराष्ट्रातील ग्रामपंचायतीमध्ये स्त्रियांनासाठी किती जागा राखीव असतात ?
उत्तर :- 50%

विज्ञान कोडे भाग - २१

विज्ञान कोडे भाग - २१
राष्ट्रीय प्रतीकाचा मान आहे मला आज
डोलतोय पाण्यावर करून साज.
हात सुपासारखी जरी दांड्या असल्या पोकळ
रूपवान आहे मी जरी घर असले चिखल.
ओळखा पाहू मी आहे कोण?

उत्तर :- कमळ  (LOTUS)


वैज्ञानिक स्पष्टीकरण:- दिसायला सुंदर आकर्षक असणाऱ्या कमळ ह्या फुलाला आपल्या राष्ट्रीय फुलाचा दर्जा देण्यात आला आहे. कमळाच्या दांड्या ह्या पोकळ असतात. त्यामध्ये हवा असल्याने त्या पाण्यावर अलगद तरंगतात. कमळाची पाने मोठमोठी असून त्यावर तेलकट आवरण असल्याने ती पाण्यात राहूनदेखील सडत नाही.

Like our Facebook page

     🏼 लेखक 🏼
SANDIP KRUSHNA JADHAO
    Chief Editor
    Noble Science
      7588090801
विज्ञान साक्षरता हाच आमचा ध्यास

ओळख मूलद्रव्यांची भाग- ३६ - लोह (लोखंड)

ओळख मूलद्रव्यांची भाग- ३६

लोह (लोखंड)

इ.स.पूर्व ३५००च्या सुमारास इजिप्तमध्ये प्रथम लोखंडी वस्तू सापडल्याची नोंद आढळते.

चुंबकाकडे आकर्षलिा जाणारा धातू ही लोहाची (लोखंडाची) पहिली ओळख. आवर्त सारणीतील चौथ्या आवर्तनातील आठव्या श्रेणीतील अणू क्रमांक २६ असलेले हे मूलद्रव्य! लोह हे विश्वातील प्रथम दहा रासायनिक घटकांतील एक समजले जाते. लॅटिन फेरम (Ferrum) या शब्दापासून ोी या संज्ञेने लोह ओळखले जाते. पृथ्वीचा गाभा तसेच पृष्ठभाग हा मोठय़ा प्रमाणात लोहाचा बनलेला आहे. सामान्यपणे मातीमध्ये तसेच मँग्नेटाइट आणि टॅकोनाईट यांसारख्या इतर खनिजांतही लोह आढळते.
व्यापारी-दृष्टय़ा लोह हे कार्बन, चुना, हेमेटाइट (खनिज) किंवा मॅग्नेटाईट आणि चुनखडी यांचे मिश्रण भट्टीत गरम करून तयार करता येते. जगभरात दरवर्षी १.३ अब्ज टन कच्चे पोलादाची निर्मिती होते. ओलसर हवेत लोखंड लगेच गंजते. रासायनिकदृष्टय़ा सक्रिय असल्यामुळे ते सौम्य आम्लामध्ये देखील सहज विरघळते. (लोखंडापासून दुहेरी किंवा तिहेरी शृंखला असलेली रासायनिक संयुगे तयार करता येतात. पोलाद हे त्याचे एक उत्तम उदाहरण म्हणता येईल.)
इ.स.पूर्व ३५००च्या सुमारास इजिप्तमध्ये प्रथम लोखंडी वस्तू सापडल्याची नोंद आढळते. यावरून लोखंडाचे मानवाच्या आयुष्यातील स्थान लक्षात येते. लोखंडातील कार्बनच्या प्रमाणानुसार, त्याचे कच्चे  लोखंड, ओतीव लोखंड आणि पोलाद असे तीन प्रकारतयार होतात. लोखंडापासून पोलाद निर्मिती अठराव्या शतकात सुरू झाली आणि औद्योगिक क्रांतीची मुहूर्तमेढ रोवली गेली. पोलादाचा उपयोग सुईपासून जहाजापर्यंत तर रोजच्या वापरातील भांडय़ापासून विमानापर्यंत केला जातो. पोलाद (स्टील) हा चांदीसारखा चमकदार आणि लवचिक धातू आहे. पोलादामध्ये क्रोमिअम (१०.५ %) मिसळले असता स्टेनलेस स्टील तयार होते. स्टेनलेस स्टील गंजत नसल्याने याचा वापर अधिक प्रमाणात केला जातो. लोखंडाची मजबुती वाढविण्यासाठी त्यात निकेल, मॉलिब्डेनम, टिटॅनिअम आणि तांबे मिसळले जाते. वैद्यकीय उपकरणे, स्थापत्य अभियांत्रिकी अशा विविध क्षेत्रात पोलादाचा वापर केला जातो.
लोह हा आपल्या शरीरातीलसुद्धा एक महत्त्वाचा घटक आहे. मानवी शरीराला दररोज सरासरी १० ते १८ मिलीग्रॅम लोहाची गरज भासते. रक्ताला लाल रंग देखील लोहामुळेच प्राप्त झाला आहे. मांस, हिरव्या पालेभाज्या, सफरचंदासारखी फळे हा अन्नातील लोहाचा प्रमुख स्रोत आहे. रक्तातील लोहाच्या कमतरतेमुळे अशक्तपणा, कमी रक्तदाब यांसारखे आजार होऊ शकतात.
– ललित जगन्नाथ गायकवाड
मराठी विज्ञान परिषदवि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२ 

दिनविशेष ६ जुलै

दिनविशेष ६ जुलै
गेऑर्ग झिमॉन ओहमबव्हेरियन-जर्मन भौतिकशास्त्रज्ञ, गणितज्ञ
स्मृतिदिन - जुलै ६, इ.स. १८५४
Image may contain: 1 person
गेऑर्ग झिमॉन ओहम [१] (आंग्लीकरणातून उद्भवलेला मराठी नामभेद: जॉर्ज सायमन ओह्म ; जर्मन: Georg Simon Ohm) (मार्च १६, इ.स. १७८९ - जुलै ६, इ.स. १८५४) हा बव्हेरियन-जर्मन भौतिकशास्त्रज्ञ, गणितज्ञ होता. याने शाळेत शिक्षकी पेशा करताना अलेस्सांद्रो व्होल्टा या इटालियन आविष्कारकाने बनवलेल्या विद्युतरासायनिक घटावर अधिक संशोधन करण्यास आरंभ केला. या संशोधनातून घडवलेल्या स्वनिर्मित उपकरणाद्वारे याने संवाहकाच्या दोन टोकांतील विभवांतर आणि संवाहकातून वाहणारी विद्युतधारा यांच्यामधील परस्परसंबंध सिद्ध केला. हा संबंध "ओहमचा नियम" म्हणून प्रसिद्ध आहे.
ओहमचा नियम
संवाहकाच्या दोन टोकांत वाहणारी विद्युतधारा, त्या दोन टोकांमधील विभवांतराच्या समानुपाती असते.

विज्ञानकोडे भाग - २०

विज्ञानकोडे भाग - २०
रंग आहे माझा श्वेत
ज्यात अनेक जीवनसत्व आहेत.
प्रथिनांचा आहे मी राजा
पूर्णान्न खाऊन येईल मजा.
ओळखा पाहू मी आहे कोण?

उत्तर :- दूध  (MILK)


वैज्ञानिक स्पष्टीकरण:- दूध निर्मिती हा सस्तन प्राण्यांचा विशेष गुणधर्म आहे. दुध हे पाणी, मेदाम्ले, प्रथिने आणि लॅक्टोजचे (शर्करा)मिश्रण आहे. दुधापासून दही, ताक, तूप, लोणी, खवा, बासुंदी, पेढा, आईस्क्रीम इत्यादी पदार्थ बनविले जातात. दुधात केसीन नावाचे प्रथिन असते. त्याचबरोबर विविध जीवनसत्वे मेद असतात. सर्वात जास्त पोषक घटक दुधात असल्याने दुधाला पूर्णांन्न असे संबोधले जाते.

Like our Facebook page

     🏼 लेखक 🏼
SANDIP KRUSHNA JADHAO
    Chief Editor
    Noble Science
      7588090801
विज्ञान साक्षरता हाच आमचा ध्यास

ओळख मूलद्रव्यांची भाग - ३५ - मँगनीज

ओळख मूलद्रव्यांची भाग - ३५

काच निर्मात्यांचा साबण मँगेनीज

अणुक्रमांक २५ असलेले मँगेनीज हे मूलद्रव्य राखाडी पांढरट रंगाचे - ठिसूळ, पण कठीण असते.

अणुक्रमांक २५ असलेले मँगेनीज हे मूलद्रव्य राखाडी पांढरट रंगाचे – ठिसूळ, पण कठीण असते. धातू प्रकारातील हे मूलद्रव्य लोहासारखे असले तरी त्याला चुंबकीय गुणधर्म नाहीत. ग्रीकमधील मॅग्नेशिया प्रदेशात सापडणार्‍या मॅग्नेशियाअल्बा व मॅग्नेशिया नेग्रा खनिजांना अनुक्रमे मॅग्नेशियम ऑक्साइड व मँगेनीज डायऑक्साइड संबोधण्यात आले. मँगेनीज डायऑक्साइडमधील मुख्य घटकाचे नामकरण झाले मँगेनीज!
पृथ्वीच्या कवचात विपुल आढळणाऱ्या मूलद्रव्यांच्या क्रमवारीत मँगनीज १२व्या क्रमांकावर असून ते निसर्गात मुक्त अवस्थेत आढळत नाही. पायरोलुझाइट (Pyrolusite) हे त्याचे मुख्य खनिज असून त्यातील प्रमुख घटक मँगेनीज डायऑक्साइड आहे. पायरोलुझाइटचा वापर अश्मयुगीन काळात गुहेतील चित्र रंगवण्यासाठी केल्याचे आढळते. रोम व इजिप्तमध्ये काच तयार करताना पायरोलुझाइट मिसळत. लोह व इतर घटकांच्या भेसळीमुळे काचेला हिरवट रंगाची झाक येई. पायरोलुझाइट मिसळल्याने काच रंगहीन, स्वच्छ व स्पष्ट होई म्हणून त्याला काच धुण्याचा साबण म्हणत असत. ह्य़ाच पायरोलुझाइटचे प्रमाण वाढविले असता काचेला जांभळा रंग येई अशा प्रकारे काचेला रंगहीन व रंगीत करण्यासाठी पायरोलुझाइट वापरत.
लोह व मँगेनीजमधील साधम्र्य व मृदेत एकत्रित आढळणे यामुळे रसायनशास्त्रज्ञांना या दोन मूलद्रव्यांतील फरक कळायला काही अवधी जावा लागला. स्विडिश खनिजतज्ज्ञ जोहान गॉटीलेबने सर्वप्रथम हा फरक ओळखला. स्विडिश शास्त्रज्ञ कार्ल शीलने क्लोरीनच्या निर्मितीसाठी पायरोलुझाइटचा वापर केला तेव्हा त्यात एखादे नवे मूलद्रव्य असण्याची शक्यता वर्तवली. त्या दृष्टीने सन १७००च्या आसपास अनेक शास्त्रज्ञांनी मँगेनीज वेगळे करण्याचा प्रयत्न केला, पण यश आले नाही. सन १७७४मध्ये घान नावाच्या शास्त्रज्ञाने दाखविले की मँगेनीज डायऑक्साइड व कोळसा यांचे मिश्रण तापविले असता मँगेनीज डायऑक्साइडमधील ऑक्सिजनचा कार्बनशी संयुग होऊन वायुरूपी कार्बन डायऑक्साइड मुक्त होतो व मँगेनीज वेगळे होते.मँगेनीजची संयुगे विविध रंगछटा दाखवतात. अ‍ॅमेथिस्ट रत्नातील जांभळा रंग मँगेनीजमुळेच असतो. मँगेनीज ठिसूळ असल्यामुळे शुद्ध धातू म्हणून त्याचा वापर होत नसला तरी त्याची उपयुक्तता विस्तृत असून औद्योगिक, जीवशास्त्र, कृषी, आरोग्य अशा अनेक क्षेत्रांत त्याच्या संयुगांचा वापर केला जातो. खानिजाला सल्फाइड व ऑक्साइड विरहित करण्याच्या गुणधर्मामुळे धातू शुद्धीकरणाच्या क्षेत्रात मँगेनीजला पर्याय नाही.
– मीनल टिपणीस
मराठी विज्ञान परिषद,
वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२ 

दिनविशेष ५ जुलै

दिनविशेष ५ जुलै
निसेफोर निपसे - फोटोग्राफी संशोधन
स्मृतिदिन - ५ जुलै १८३३
हा एक फ्रेंच संशोधक होता. आता सहसा त्याला फोटोग्राफीचा शोधकर्ता म्हणुन मानले जाते. आणि त्या क्षेत्रात एक अग्रणी म्हणून मानले जाते. निओपेसने हेलिओग्राफी या तंत्रज्ञानाच्या साह्याने फोटोग्राफिक प्रक्रियेचे जगातील सर्वात जुने उत्पादन तयार केले. १८२५ मध्ये त्याने फोटोएन्ग्रेव्ह प्रिंटिंग प्लेटद्वारे प्रिंट घेतली. १८२६-२७ मध्ये त्याने प्रत्यक्ष जगाच्या दृश्याचे सर्वात जुने जिवंत फोटोग्राफ काढण्यासाठी एका आदिम कॅमेऱ्याचा वापर केला. ही कल्पना त्याच्या मोठ्या भावाची होती जी त्याने प्रत्यक्षात उतरवी आणि विकसित केली.
👆🏼या पेजला लाईक करा आणि मिळवा रोजच्या रोज दिनविशेष आणि विज्ञानविषयक माहिती.
whatsapp वर रोजच्या रोज माहिती मिळविण्यासाठी 9049491631 या नंबरवर 'Request' टाइप करुन (whatsapp वर) पाठवा.
Image may contain: 1 person

मंगळवार, ३ जुलै, २०१८

सामान्यज्ञान प्रश्नसंग्रह भाग - १९

सामान्यज्ञान प्रश्नसंग्रह भाग - १९
प्रश्न-१) खालील पैकी कोणत्या राज्याने 1 ऑगस्ट 2012 नंतर निवृत्ती वेतनास पात्र असणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या सोयीसाठी 'ई-पेन्शन' पद्धती कार्यान्वित केली ?
 उत्तर :- हरियाणा

प्रश्न-२) कोणत्या राज्याने अलीकडेच 25 ते 40 वर्षे वयो गटातील आणि वार्षिक 36 हजार रुपये पेक्षा कमी उत्पन्न असलेल्या कुटुंबातील बेरोजगारां साठी दरमहा 1000 रुपये बेरोजगार भत्ता सुरु केला ?
 उत्तर :- उत्तरप्रदेश

प्रश्न-३) राज्यातील महिला विकासासाठी काम करणारे कार्यकर्ते व संस्थांना कोणता पुरस्कार देण्यात येतो ?
 उत्तर :- अहिल्याबाई होळकर

प्रश्न-४) महाराष्ट्रातील ___ जिल्ह्यातील मेंढालेखा या गावात लोक सहभागातून जंगल व्यवस्थापन व संवर्धनाचे काम केले जाते.
 उत्तर :- गडचिरोली

प्रश्न-५) भोपाळ वायुदुर्घटना __या वर्षी घडली होती.
 उत्तर :-1984

प्रश्न-६) संसदेच्या दोन अधिवेशनांमधील अंतर .......... महिन्यापेक्षा कमी असावे.
 उत्तर :- सहा

प्रश्न-७) देशातील कायद्यांची निर्मिती करणारी सर्वोच्च संस्था म्हणजे ......... होय.
 उत्तर :- संसद

प्रश्न-८) राज्यघटनेतील कोणत्या कलमानुसार अस्पृश्यता घालविली गेली?
 उत्तर :- 17

प्रश्न-९) कोणत्या घटना दुरुस्तीनुसार मुलभूत कर्तव्यांचा समावेश भारतीय राज्यघटनेत करण्यात आला?
 उत्तर :- 42 वी घटन दुरुस्ती

प्रश्न-१०) राज्यपाल आपला राजीनामा कोणाकडे सादर करतात?
 उत्तर :- राष्ट्रपती

प्रश्न-११)पी. सी. महालनोवीस पुरस्कार 2010
उत्तर-  अभिमान गिते

प्रश्न-१२) द्रोणाचार्य पुरस्कार 2010
उत्तर- सुभाष अग्रवाल

प्रश्न-१३) विष्णुदास भावे पुरस्कार 2010
उत्तर-  फैयाज शेख

प्रश्न-१४) शाहू महाराज पुरस्कार 2010
उत्तर- अ. ह. साळंखे

प्रश्न-१५) ज्ञानोबा- तुकाराम पुरस्कार 2010
उत्तर-  जगन्नाथ पवार

प्रश्न-१६) ग्रामसेवकाच्या कार्यावर कोणाचे नजिकचे नियंत्रण असते ?
उत्तर- गटविकास अधिकार

प्रश्न-१७) वित्त , बाधकाम, आरोग्य व शिक्षण या चार समित्यांची सभापती कोण असतात ?
उत्तर- जिल्हा परिषदेचा उपाध्यक्ष3

प्रश्न-८) ग्रामपंचायत व सहकारी संस्था यामधील महत्वाचा दुवा कोण असतो ?
उत्तर- ग्रामसेवक

प्रश्न-१९)  ग्रामपंचायतीचा कार्यकारी प्रमुख कोण असतो ?
उत्तर- सरपंच

प्रश्न-२०) ग्रामपंचायतीचा सचिव म्हणून कोण कार्य पाहतो ?
उत्तर- ग्रामसेवक

सौजन्य- तंत्रस्नेही शिक्षक समूह महाराष्ट्र

विज्ञान कोडे भाग - १९

विज्ञान कोडे भाग - १९
रंग माझा हिरवा, पिकल्यावर लाल
दिसतोय जसा गुबगुबीत गाल.
प्रत्येक भाजीत माझीच वर्णी
सालादाच्या चकत्यावर मिठाची फोडणी.
ओळखा पाहू मी आहे कोण?

उत्तर :- टोमॅटो (TOMATO)


वैज्ञानिक स्पष्टीकरण :- टोमॅटो ही एक लालभडक आकर्षक रंगाची  फळभाजी आहे. त्याच्या किंचित आंबट चवीमुळे त्याचा वापर भाजीसोबतच जेवतांना कच्चे  खाण्यासाठी, कोशिंबीर म्हणून (सलाद)(सॅलड) सुद्धा करतात टोमॅटो चा उगम पेरू या देशात झाला. टोमॅटो पासून टोमॅटो केचप सुद्धा केला जातो. लायकोपीन या घटनेमुळे टोमॅटोला लाल रंग प्राप्त होतो.
Like our Facebook page

     🏼 लेखक 🏼
SANDIP KRUSHNA JADHAO
    Chief Editor
    Noble Science
      7588090801
विज्ञान साक्षरता हाच आमचा ध्यास