विज्ञान कोडे भाग - १८
ऐका मित्रानो सांगतो माझी कहाणी,
साम्राज्य माझे ऊन, वारा, पाणी.
ऐकेकाळचा मी अजस्त्र प्राणी,
आज मात्र फक्त जीवाश्मांच्या आठवणी.
ओळखा पाहू मी आहे
कोण?
उत्तर :- डायनासोर
वैज्ञानिक स्पष्टीकरण :- डायनासोर हे करोडो वर्षांपूर्वी पृथ्वीवर वास्तव्य करत होते. त्यांच्या अनेक प्रजाती होत्या. काही प्रजाती पाण्यात काही जमिनीवर तर काही आकाशात उडत असत. एक महाकाय उल्का पृथ्वीवर आदळली व तिच्या आघाताने पृथ्वीवर धुळीचे ढग निर्माण झाले. खूप काळापर्यंत जमिनीवर सूर्यप्रकाश पडत नव्हता वनस्पती, अनेक प्राण्यासह डायनासोर नष्ट झाले व आज त्यांचे फक्त जीवाश्म सापडतात. (fossil)(जमिनीत वा खडकात गाडले गेलेले प्राण्यांचे अवशेष)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा