विज्ञानकोडे भाग - १५
कुणालाच माहित नाही रंग माझा कसा,
ज्यामधे मिळविला होईल तसा.
तीन अवस्थांचे आहे माझे जीवन,
सर्वच म्हणतात मला वैश्विक द्रावण.
ओळखा पाहू मी आहे कोण?
उत्तर- पाणी (Water)
वैज्ञानिक स्पष्टिकरण:- पाणी हे ऑक्सिजन व हायड्रोजन या दोन मुलद्रव्याचे रंगहीन द्रावण आहे. H2O हे पाण्याचे रेणूसुत्र आहे. स्थायू , द्रव्य व वायु ह्या पाण्याच्या तीन अवस्था आहेत. मात्र सामान्या तापमानाला पाणी द्रव्यरूप असते. पाण्याला वास व चव नसते. निसर्गातील अनेक पदार्थ पाण्यात सहज विरघळतात म्हणून पाण्याला वैश्विक द्रावण म्हणतात. मानवी शरीरात जवळपास ६५% पाणी असते.
Like our Facebook page
✍🏼 लेखक ✍🏼
SANDIP KRUSHNA JADHAO
Chief Editor
Noble Science
7588090801
विज्ञान साक्षरता हाच आमचा ध्यास
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा