सुस्वागतम! सुस्वागतम!! सर्व सन्माननीय शिक्षणप्रेमी वाचक बंधु भगिनींचे आश्रमशाळा शिक्षकमित्र या शैक्षणिक ब्लॉगवर आपले हार्दिक स्वागत आहे

मंगळवार, १२ जून, २०१८

दिनविशेष १२ जून

दिनविशेष १२ जून- पृथ्वीक्षेपणास्त्राची ११ वी चाचणी यशस्वी
१२ जुन १९९३


"पृथ्वी" हे भारतीय सैन्याचे "पृष्ठभाग ते पृष्ठभाग" (Surface to Surface) निम्न पल्ला प्रक्षेपास्त्र (Short Range Ballistic Missile) आहे. हे प्रक्षेपास्त्र भारतीय संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने "एकीकृत मार्गदर्शक क्षेपणास्त्र विकास कार्यक्रमा" अंतर्गत विकसित केले आहे.

विकास आणि इतिहास
भारत सरकारने वेगवेगळी युद्ध क्षेपणास्त्रे व पृष्ठभाग ते आकाश या मालिकेतील क्षेपणास्त्रांवरील स्वावलंबनासाठी १९८३ साली "एकीकृत मार्गदर्शक क्षेपणास्त्र विकास कार्यक्रम" सुरू केला. या अंतर्गत विकसित केलेले पृथ्वी हे पहिले प्रक्षेपास्त्र आहे. भारतीय संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने याआधी "प्रोजेक्ट डेव्हिल" अंतर्गत सोविएत रशियाच्या एसए-2 पृष्ठभाग ते आकाश या क्षेपणास्त्राची उलट अभियांत्रिकी केली होती. "पृथ्वी"ची प्रणोदन प्राद्योगिकी (Propulsion Technology) ही एसए-2 पासुन उत्पादित केली असल्याचे मानले जाते. या प्रक्षेपास्त्राच्या प्रारूपांमध्ये स्थायू अथवा द्रव, अथवा या दोन्ही प्रकारची इंधने वापरली जातात. युद्धभूमीवरील वापरासाठी विकसित केलेले हे प्रक्षेपास्त्र सामरिक उपयोगासाठी स्फोटक शीर्षावर अण्वस्त्रेसुद्धा वाहून नेऊ शकते.

प्रारूपे
पृथ्वी प्रक्षेपास्त्र प्रकल्पामध्ये भारतीय सेना, नौसेना व वायु सेना या तिन्ही दलांसाठी असलेली "पृथ्वी"ची प्रारूपे अंतर्भूत करण्यात आलेली आहेत. सुरुवातीच्या एकीकृत मार्गदर्शक क्षेपणास्त्र विकास कार्यक्रमांतर्गत असलेल्या प्रकल्पामध्ये पृथ्वी प्रक्षेपास्त्राच्या संरचना रूपरेषेत खालील प्रारूपे अंतर्भूत आहेत.
पृथ्वी - १ (एसएस- १५०) - भारतीय सेनेसाठी (१,००० किलो च्या स्फोटक शिर्षासह १५० किलोमीटर लांबीचा पल्ला)पृथ्वी - २ (एसएस- २५०) - भारतीय वायुसेनेसाठी (५०० किलो च्या स्फोटक शिर्षासह २५० किलोमीटर लांबीचा पल्ला)पृथ्वी - ३ (एसएस- ३५०) - भारतीय नौसेनेसाठी (५०० किलो च्या स्फोटक शिर्षासह ३५० किलोमीटर लांबीचा पल्ला)धनुष - बातमीनुसार धनुष हे भारतीय नौसेनेसाठीचे युद्धनौकेवरून डागण्यात येऊ शकणारे प्रारूप आहे. काही सूत्रांच्या म्हणण्यानुसार धनुष ही संतुलित मंच असलेली अशी रचना आहे की ज्यावरून पृथ्वी - २ व पृथ्वी - ३ अशी दोन्ही प्रक्षेपास्त्रे युद्धनौकेवरून डागण्यात येऊ शकतील. तर काही सूत्रांच्या मते धनुष हे पृथ्वी - २ या प्रक्षेपास्त्राचे प्रारूप आहे.
वर्षानुवर्षे ही वैशिष्ठ्ये अनेक बदलांमधून गेली. भारताने लष्करी वापराकरिता तयार केलेल्या या वर्गातील कुठल्याही क्षेपणास्त्राला पृथ्वी या कूटनामाने ओळखले जाते. मात्र नंतरच्या विकसनशील प्रारूपांना पृथ्वी-२ आणि पृथ्वी-३ या नावाने ओळखले जाते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा