विज्ञान कोडे भाग - २३
अंग माझे खवलेदार,
भाजी होते शानदार.
चव आहे माझी सर्वात कडू,
आजाराला अंगावर नाही देत चढू .
खाईल मला तो तोंड करेल वाकडा,
टांगलाय वेलीवर जसा हिरवा चुडा.
ओळखा पाहू मी आहे
कोण?
उत्तर :- कारले (Bitter Gourd)
वैज्ञानिक स्पष्टिकरण:- कारले हे चवीला अत्यंत कडू असणारी फळभाजी आहे. ही एक आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे. कारल्यामध्ये कॅल्शियम, फॉस्फोरस, जीवनसत्त्व, कार्बोदके व प्रथिने असतात. कच्च्या कारल्याचे ज्युस पिल्याने रोगप्रतिकार शक्ती वाढते. कारले हे मधुमेहावर अत्यंत गुणकारी आहे.
Like
our Facebook page
✍🏼 लेखक ✍🏼
SANDIP KRUSHNA
JADHAO
Chief
Editor
Noble
Science
7588090801
विज्ञान साक्षरता हाच आमचा ध्यास
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा