सुस्वागतम! सुस्वागतम!! सर्व सन्माननीय शिक्षणप्रेमी वाचक बंधु भगिनींचे आश्रमशाळा शिक्षकमित्र या शैक्षणिक ब्लॉगवर आपले हार्दिक स्वागत आहे

बुधवार, ११ जुलै, २०१८

सामान्यज्ञान प्रश्नसंग्रह भाग - २२

सामान्यज्ञान प्रश्नसंग्रह भाग - २२
प्रश्न- १)  देशातील पहिले इंटरनेट न्यायालय?
उत्तर :-  अहमदाबाद (गुजरात)

प्रश्न- २) राष्ट्रीय बाल हक्क आयोग कधी लागू झाला?
उत्तर :--  23 फेब्रुवारी, 2007

प्रश्न- ३) हॉकीचा पहिला विश्व कप कधी झाल आणि कोणी जिंकला होता?
उत्तर :-  1971 मध्ये झाला आणि पाकिस्तान ने जिंकला होता

प्रश्न- ४) जागतिक बँकेचे ठिकाण कुठे आहे?
उत्तर :-  वाशिंग्टन (अमेरिका)

प्रश्न- ५) भारताची 2011 ची जनगणना कितवी आहे:?
उत्तर :-  15 वी

प्रश्न- ६)  जांभूळ चे लेखक कोण?
उत्तर :-  विठ्ठल उमाप

प्रश्न- ७) नियोजित जैतापूर अणुउर्जा प्रकल्प रत्नागिरी जिल्ह्यातील ................ तालुक्यात आहे?
उत्तर :-  माडबन

प्रश्न- ८) सर्वाधिक साक्षरता या संघराज्यात (केंद्रशासित प्रदेश) आहे?
उत्तर :-  चंदिगड

प्रश्न- ९) 2010-11 मध्ये GDP ........... नि वाढला?
उत्तर :-  8.6%

प्रश्न- १०) शासकीय कर्मचाऱ्यांना ई-पेमेंट सुविधा देणारे देशातील पहिले राज्य कोणते?
उत्तर :-  ओडीसा (सुरवात 10 ऑगस्ट 2012)

प्रश्न- ११) पोलो खेळाचा उगम कोणत्या राज्यात झाला आहे?
उत्तर :-  मणिपूर

प्रश्न- १२) स्वतंत्र भारतात जन्म घेऊन लोकसभेचे सभापती असा मान मिळणारी पहिली व्यक्ती कोण?
उत्तर :-  जी.एम.सी. बालयोगी

प्रश्न- १३) भारतीय घटने नुसार कलम 199 काय आहे?
उत्तर :-  धन विधेयकाची व्याख्या

प्रश्न- १४) भारतातील सर्वांत जूनी आयआयटी कोठे आहे?
उत्तर :-  खरगपूर

प्रश्न- १५) कॉम्प्यूटरच्या भाषेत 'CAD' चा अर्थ काय आहे?
उत्तर :-  कॉम्प्यूटर ऍडेड डिझाइन

प्रश्न- १६) सूर्यमालेतील आठ ग्रहाच्या उपग्रहाची संख्या किती?
उत्तर :-  165 उपग्रह

प्रश्न- १७) विनोबा भावेंचे गुरु कोण??
उत्तर :-  जमानलाल बजाज

प्रश्न- १८) जगातील सर्वात वेगवान रेल्वे कोणत्या देश्यात आहे?
उत्तर :-  चीन मध्ये आहे. वेग: 350 किमी/तासी

प्रश्न- १९) विधवा विवाह कायदा
उत्तर :-  1856

प्रश्न- २०) विवाह नोंदणी कायदा
उत्तर :-  1976

सौजन्य- तंत्रस्नेही शिक्षक समूह, महाराष्ट्र

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा