सुस्वागतम! सुस्वागतम!! सर्व सन्माननीय शिक्षणप्रेमी वाचक बंधु भगिनींचे आश्रमशाळा शिक्षकमित्र या शैक्षणिक ब्लॉगवर आपले हार्दिक स्वागत आहे
बोधकथा संग्रह लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
बोधकथा संग्रह लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

बुधवार, १८ जुलै, २०१८

बोधकथा - प्रत्येक समस्येचे निराकरण असते.

एका कार बनवणाऱ्या कंपनीतील एका इंजीनियरने एका वर्ल्डक्लास लेव्हलच्या कारचे डिझाईन बनवले आणि कंपनीच्या मालकाला दाखविले. मालक खुप प्रभावित झाला व त्याने त्या इंजीनियरला कार बनविण्यास सांगितले.इंजीनियरने कार बनवली.कार बघुन मालक खुश झाला.
आता ट्रायल घेण्यासाठी कारला कारखान्याच्या बाहेर नेण्याचे ठरले.
पण त्यांच्या लक्षात आले कि कारची उंची कारखान्याच्या बाहेर निघण्याच्या कमानाकृती गेटपेक्षा २ इंचाने जास्त आहे. इंजीनियरला खुप वाईट वाटले. कारण कार बनवतांना त्याने ही गोष्ट लक्षात घेतली नव्हती.
आता कार बाहेर कशी न्यावी असा प्रश्न सर्वांसमोर उभा राहीला.
कारखान्याचा पेंटर म्हणाला,कारला आपण बाहेर नेऊ शकतो,
फक्त वरच्या भागावर थोडे ओरखडे पडतील.
ते आपण कारला बाहेर नेल्या नंतर पुन्हा पेंट करुन मिटवु शकतो.
इंजीनियर म्हणाला, त्यापेक्षा आपण हा गेट तोडुन टाकु. कार बाहेर नेल्यावर गेट पुन्हा बांधता येईल.
पण मालक कोणत्याही कल्पनेने आश्वस्त होत नव्हता.
त्याला ओरखडे पडणे किंवा तोडफोड हे शुभ शकुन नाहीत असे वाटत होते.
दुर उभा असलेला कारखान्याचा चौकीदार हे सर्व बघत होता.
तो हळुच त्यांच्याजवळ आला व म्हणाला,
मी काही सूचवु शकतो का.?
सर्वांना आश्चर्य वाटले कि येथे इतक्या तज्ञ लोकांना उपाय सापडत नाहीये आणि हा सामान्य चौकीदार काय उपाय सुचवणार?
चौकीदार म्हणाला,
"कार गेटपेक्षा फक्त २ इंच उंच आहे.
साधी गोष्ट आहे..
चारही टायर्स मधील हवा थोडी-थोडी कमी करा,
कारची उंची कमी होईल व कारला सहज बाहेर नेता येईल.!!
सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवल्या.
तात्पर्य - 
प्रत्येक समस्येचे समाधान तज्ञाच्या नजरेतुन विश्लेषण केल्यानेच मिळते असे नाही. कधी-कधी एखादी सामान्य व्यक्तीसुद्धा आपल्या समस्येचं निराकरण करु शकते. जीवनातील समस्यांचं देखील काहीसं असंच असतं.

"Think Simple. Do Simple. Live Simple.
Because originally we are Happy Souls."

Release Some Air (Ego). and
Adjust The Height (Attitude).

बुधवार, ११ जुलै, २०१८

बोधकथा - पुण्यवान माणसाच्या आश्रयामुळे ....

बोधकथा -
पुण्यवान माणसाच्या आश्रयामुळे ....
एका जंगलामध्ये एक म्हतारी आणि तिची नात राहत होती . आणि त्याच जंगलामध्ये चार दरोडेखोर लुटमार करण्यासाठी येत असंत .
एके दिवशी लुटमार करता करता संध्याकाळ झाली आणि विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची सुरुवात झाली . ते चार दरोडेखोर जंगलामध्ये आश्रयासाठी सैरभैर पळु लागले . अचानक त्यांना म्हतारीची झोपडी दिसली . आणि ते म्हतारीच्या झोपडीकडे गेले. म्हतारीने त्यांना रात्री साठी आश्रय दिला  जेवण बनवले सर्वजन जेवायला बसले आणि जेवता जेवता पाप पुण्याचा विषय निघाला.
प्रत्येकजण आपल्या परीने विषय मांडत होता.
शेवटी म्हतारीने पैज लावली. बाहेर विजा पडत आहेत प्रत्येकाने त्या समोरच्या झाडाला शिवुन पुन्हा झोपडीमध्ये यायचे  ज्याच्या अंगावर विज पडेल तो पापी आणि जो सुखरुप पुन्हा झोपडीत येईल तो पुण्यवान.
प्रथम १ ला दरोडेखोर गेला झाडाला शिवुन सुखरुप झोपडीत आला.
असे दुसरा गेला , तिसरा गेला , चौथा गेला. आणि सर्वजण सुखरुप झोपडीत आले ....
आता पाळी आली म्हतारी आणि तिच्या नातीवर म्हतारीला मनामध्ये प्रश्न पडला की हे चारही दरोडेखोर पुण्यवान निघाले आपण नक्कीच पापी आहोत , विज आपल्याच अंगावर पडणार असा विचार करत असताना तिने नातीला कडेवर घेतले आणी झोपडीच्या बाहेर पाऊल टाकले. त्याचक्षणी विजेचा कडकडाट होऊन विज त्या झोपडीवर पडली आणि क्षणार्धात ते चारही दरोडेखोर जागीच भस्मसात झाले.

तात्पर्य :- 
एका पुण्यवान माणसाच्या आश्रयामूळे आजही चार पापी माणसं जगु शकतात. पण त्याने साथ सोडली तर ते चारही भस्मसात होऊ शकतात. म्हणून पुण्याचा वाटा नेहमी घेत रहा. ते कधी संकटाच्या वेळी आडवे येइल हे आपल्याला ही नाही समजणार .

! लाईफ सही तो ... जीवन सही !

रविवार, १ जुलै, २०१८

बोधकथा - प्रणाम का महत्त्व

 बोधकथा - प्रणाम का महत्त्व
 महाभारत का युद्ध चल रहा था -
 एक दिन दुर्योधन के व्यंग्य से आहत होकर "भीष्म पितामह" घोषणा कर देते हैं कि -
 "मैं कल पांडवों का वध कर दूँगा"
उनकी घोषणा का पता चलते ही पांडवों के शिविर में बेचैनी बढ़ गई -
भीष्म की क्षमताओं के बारे में सभी को पता था इसलिए सभी किसी अनिष्ट की आशंका से परेशान हो गए|        तब - श्रीकृष्ण ने द्रौपदी से कहा अभी मेरे साथ चलो -
श्रीकृष्ण द्रौपदी को लेकर सीधे भीष्म पितामह के शिविर में पहुँच गए -
शिविर के बाहर खड़े होकर उन्होंने द्रोपदी से कहा कि - अन्दर जाकर पितामह को प्रणाम करो -
द्रौपदी ने अन्दर जाकर पितामह भीष्म को प्रणाम किया तो उन्होंने -
 "अखंड सौभाग्यवती भव" का आशीर्वाद दे दिया , फिर उन्होंने द्रोपदी से पूछा कि !!
"वत्स, तुम इतनी रात में अकेली यहाँ कैसे आई हो, क्या तुमको श्रीकृष्ण यहाँ लेकर आये है" ?
तब द्रोपदी ने कहा कि - "हां और वे कक्ष के बाहर खड़े हैं"
तब भीष्म भी कक्ष के बाहर आ गए और दोनों ने एक दूसरे से प्रणाम किया -
भीष्म ने कहा -
"मेरे एक वचन को मेरे ही दूसरे वचन से काट देने का काम श्रीकृष्ण ही कर सकते है"
शिविर से वापस लौटते समय श्रीकृष्ण ने द्रौपदी से कहा कि -
"तुम्हारे एक बार जाकर पितामह को प्रणाम करने से तुम्हारे पतियों को जीवनदान मिल गया है " -
" अगर तुम प्रतिदिन भीष्म, धृतराष्ट्र, द्रोणाचार्य, आदि को प्रणाम करती होती और दुर्योधन- दुःशासन, आदि की पत्नियां भी पांडवों को प्रणाम करती होंती, तो शायद इस युद्ध की नौबत ही न आती " -
तात्पर्य्
वर्तमान में हमारे घरों में जो इतनी समस्याए हैं उनका भी मूल कारण यही है कि -
"जाने अनजाने अक्सर घर के बड़ों की उपेक्षा हो जाती है "
" यदि घर के बच्चे और बहुएँ प्रतिदिन घर के सभी बड़ों को प्रणाम कर उनका आशीर्वाद लें तो, शायद किसी भी घर में कभी कोई क्लेश न हो "
बड़ों के दिए आशीर्वाद कवच की तरह काम करते हैं उनको कोई "अस्त्र-शस्त्र" नहीं भेद सकता -
"निवेदन सभी इस संस्कृति को सुनिश्चित कर नियमबद्ध करें तो घर स्वर्ग बन जाय।"
क्योंकि:-
        प्रणाम प्रेम है।
        प्रणाम अनुशासन है।
        प्रणाम शीतलता है।                
        प्रणाम आदर सिखाता है।
        प्रणाम से सुविचार आते है।
        प्रणाम झुकना सिखाता है।
        प्रणाम क्रोध मिटाता है।
        प्रणाम आँसू धो देता है।
        प्रणाम अहंकार मिटाता है।
        प्रणाम हमारी संस्कृति है।
        सबको प्रणाम  

बोधकथा - खादाड बकरा

बोधकथा - खादाड बकरा
एका राजाजवळ खादाड बकरा होता.
राजाने दवंडी दिली, बक-याला जंगलात चरायला नेऊन तृप्त करून आणेल, त्याला बक्षीस मिळेल...
पण बकरा तृप्त झाल्याची परीक्षा मी घेईल, जर बकरा तृप्त झाला नसेल तर शिक्षा मिळेल...
काम खूप सोपे वाटून एकजण धावत राजाकडे आला.
बकरा घेऊन जंगलात गेला. दिवसभर कोवळे हिरवेगार गवत चरायला दिले. संध्याकाळी त्याला वाटले, दिवसभर बकरा चरतोय, नक्कीच त्याचे पोट भरले असणार. तो बक-याला घेऊन राजाकडे आला.
राजाने हिरवे गवत टाकल्याबरोबर बकरा खाऊ लागला.
राजा म्हणाला, याला पोटभर खाऊ घातले नाहीस. अन्यथा त्याने गवत खाल्ले नसते...तुला शिक्षा मिळणार..
नंतरही पुष्कळ लोकांनी प्रयत्न केले. पण कोणालाच यश आले नाही.
एका सुविचारी माणसाला वाटले, राजाच्या दवंडीत रहस्य आहे. काम युक्तीने केले पाहिजे.
त्याने बकरा जंगलात नेला.
बक-याने गवत खायला सुरूवात केली की, तो बक-याला काठीने मारीत असे.
दिवसभर असे घडल्याने बक-याची मानसिकता अशी झाली की, गवताला तोंड
लावले की मार मिळतो.
संध्याकाळी सुविचारी मनुष्य बक-यासह दरबारात आला.
राजाने गवत टाकले. बकरा त्याकडे पहायला तयार होईना.
कारण गवत खाल्ले की मार बसण्याची त्याला भीती होती...
राजाने खुश होऊन बक्षीस दिले...
तात्पर्य:
मनही असेच आहे, तृप्त न होणारे.
त्याचे विवेकाने ताडन केले तरच ते ताब्यात राहील.
अन्यथा अहंकाराचा, विकारांचा , वाईट सवयींचा चारा त्याला पुष्ट करील.

बुधवार, २७ जून, २०१८

बोधकथा - आनंदी कावळा

 बोधकथा - आनंदी कावळा                              
       एक राज्यात एक कावळा असतो. नेहमी आनंदी , हसत ! कुठल्याच प्रकारचे दु:ख, कष्ट त्याच्या चेह-यावरचा आनंद हिरावून घेवू शकत नसतात. एकदा त्या राज्याच्या राजाला ही बातमी कळते .त्याला खूप आश्चर्य वाटते, हे अशक्य आहे, त्याचे मन खात्री देते
मग तो आपल्या शिपायांना त्या कावळ्याला पकडून आणण्याची आज्ञा देतो . कैदेत ठेवल्यावर कसा आनंदी राहील पठ्ठया ! राजा मनोमन आपल्या विचारावर खूश होतो . कावळ्याला कैद करून महीना लोटतो तरी तो हसतच !
राजा बेचैन होतो. " प्रधानजी, त्या कावळ्याला दु:खी करण्यासाठी काय करता येईल?"
" महाराज, आपण त्याला काट्यात टाकुया" प्रधान तत्परतेने उपाय सुचवतो.
लगेच राजाच्या आदेशाप्रमाणे शिपाई त्याला काट्यात टाकतात . तिथेही हा आपला आनंदाने शीळ घालतोय.
"महाराज, आपण त्याला तापलेल्या तव्यावर टाकुया" राणी दुसरा मार्ग  सुचवते.
दुस-या दिवशी त्याला तापलेल्या तव्यावर टाकले जाते ,पण कितीही चटके बसले तरी त्याच्या चेह-यावरचे हसू काही मावळत नाही.
"ते काही नाही महाराज, आपण त्याला ऊकळत्या तेलात टाकू " सेनापती पुढची शिक्षा सुचवतात .
दुस-या दिवशी भल्यामोठ्या कढईत तेल ऊकळवून त्यात त्याला टाकले जाते. तरीही कावळा हसतोच आहे.
राजाला भयंकरच राग येतो. मग तो शेवटचा जालीम उपाय करायचे ठरवतो आणि त्या कावळ्याचे पंखच छाटून टाकतो. पंख छाटलेला कावळा क्षीण हसतो आणि कायमचे डोळे मिटतो .
लहानपणी ही गोष्ट वाचताना खूप गंमत वाटायची. पण आता तिच्यातले मर्म काय ते कळते. आपण आनंदी आहोत , सुखी आहोत ,हसत आहोत ही बाबच् नापसंत असणारे किती 'राजे' आपल्या अवतीभोवती असतात ना! कधी आपले जवळचे आप्त, स्वकीय तर कधी परकीय. तुम्हाला कोणत्या गोष्टीनी त्रास होईल, कशाने यातना होतील, दु:ख होईल ? या गोष्टींचा विचार करण्यात आपली स्वत:ची शक्ती अकारण खर्ची पाडणारे आणि त्यासाठी  विविध युक्त्या योजून त्या आमलात आणणारे  ' प्रधान', 'सेनापती' यांची कमतरता नाही.
 गंमत म्हणजे या अशा योजना आमलात आणण्यासाठी आवश्यक शिपायांची भाऊगर्दीही कमी नाही आणि अशाही सगळ्या परिस्थितीतही आपल्या चेह-यावरचे हसू टवटवीत ठेवणारे 'आनंदी कावळे' ही आहेत
वास्तविक या जगात प्रत्येकचजण सुखाच्या, आनंदाच्या मागे धावत असतो. जगण्याची ही सगळी धडपड तो एक 'सुखी माणसाचा' सदरा मिळवण्यासाठीच चालू असते. तरीही दुस-याचा आनंद का सहन होत नाही आपल्याला ? आनंदाची इतकी संकुचित संकल्पना घेवून जगत असतो आपण की, फक्त मला स्वत:ला मिळाला तरच तो 'आनंद'; नाही तर नाही. त्या दुस-या व्यक्तीनेही तो क्षणिक आनंद यश मिळवण्या साठी खूप कष्ट घेतलेले असतात, अनेक त्रास सहन केलेले असतात, दु:ख भोगलेलं असतं; तेव्हा कुठे त्याच्या वाट्याला तो आनंदाचा छोटासा 'कवडसा' आलेला असतो, हा विचारच आपल्या मनाला शिवत नाही.
इतरांच्या आयुष्यातील असे अनेक छोटे छोटे कवडसे आपणही तितक्याच आनंदाने उपभोगू शकलो तर आपल्या मनाच्या अंगणभर सुखाचे ऊन सदा हसत राहील, तिथे दु:खाच्या सावलीला जागाच राहणार नाही. सगळ्या जगाचं सोडा हो, आपल्या जवळच्या माणसांच्या बाबतीत तरी हे करून बघायला काय हरकत आहे ?
कोणाचा आनंद कसा हिरावून घेता येईल याचा विचार करत बसण्यापेक्षा त्याच्यासोबत आपल्यालाही आनंदी होता येतंय का, हसता येतंय का ते पहायला काय हरकत आहे ?
सुदैवाने भेटलाच एखादा 'आनंदी कावळा' तर त्याच्या सोबत चार मुक्त गिरक्या घेवून बघूया आकाशात..
त्याचे पंख छाटून त्याला संपवण्या पेक्षा आपल्या ह्रृदयाच्या खोल खोल कप्प्यात त्याला कायमचा जपून ठेवू या. 

बुधवार, २० जून, २०१८

बोधकथा- खरे दुःख

  खरे दुःख
एक सोनार होता. त्याच्या दुकानासमोरच एका लोहाराचे दुकान होते. सोनार जेव्हा काम करत असे तेंव्हा सोनाराच्या दुकानातून हळू आवाज होत असे पण जेंव्हा लोहार काम करत असे तेंव्हा मात्र लोखंडाचे काम होत असल्याने मोठा आवाज होत असे. तो आवाज मोठा कर्णकर्कश असे. एके दिवशी सोनाराच्या दुकानातील एक सोन्याचा कण कसा कोण जाणे पण लोहाराच्या दुकानात जावून पडला. त्या सोन्याच्या कणाची भेट एका लोखंडाच्या कणाशी झाली. खूप दिवसांची ओळख असल्यासारखे ते एकमेकांशी बोलू लागले. सोन्याच्या कणाने लोखंडाच्या कणाला म्हंटले,"दादा, आपले दुःख तर खरे एकसमान आहे. दोघानाही आगीत तापवले जाते आणि हातोड्याने ठोकले जाते. मी तर बाबा चुपचाप हे सहन करतो, पण तुझे काय?" लोखंडाचा कण सोन्याच्या कणाकडे पाहून दुःखी स्वरात म्हणाला,"अरे ! तुझे म्हणणे अगदी बरोबर आहे. दोघानाही तापवणारी आग एकच आहे आणि ठोकणारा हातोडाहि एकाच धातूचा आहे. पण खरे दुःख याचे आहे कि तुला ठोकणारा हातोडा हा तुझा कोणीच लागत नाही पण मला ठोकणारा लोखंडाचा हातोडा हा नात्याने माझा भाऊच लागतो. दुसऱ्याने दिलेल्या दुःखापेक्षा स्वकीयांनी दिलेला त्रास हा अगदी हृदयात वार करून जातो."
तात्पर्य
आपल्या माणसांकडून होणारा त्रास हा कायमच दुःखदायक वाटतो.
तेव्हा आपली माणसे जपा त्यांना कधी दुखवु नका
आयुष्य फार सुंदर आहे त्याला आनखी सुंदर बनवा

शनिवार, २ जून, २०१८

बोधकथा- मन मैं है विश्वास


तो वाळवंटात हरवला होता. त्याच्या जवळच पाणी संपलं त्यालाही दोन दिवस झाले होते. आता पाणी नाही मिळालं तर आपलं मरण निश्चित आहे हे त्याला दिसत होतं, जाणवत होतं. हताश होऊन तो सभो वताली दूर दूर पर्यंत जेवढी नजर जाईल तिथपर्यंत डोळे ताणून ताणून पहात होता. त्याची नजर अर्थातच पाणी शोधत होती.  
तेवढ्यात त्याला काही अंतरावर एक झोपडं दिसलं. तो थबकला. हा भास तर नाही? नाहीतर मृगजळ असेल. पण काही असो, तिकडे जाऊया, काही असेल तर मिळेल असा विचार करत पाय ओढत स्वतःच थकलेलं शरीर घेऊन तो निघाला. काही वेळातच त्याच्या लक्षात आले की तो भास नव्हता, झोपडी खरोखरच होती. पण ती रिकामी होती, कोणीच नव्हतं तिथे आणि ती तशी बऱ्याच दिवसांपासून, कदाचित वर्षांपासून असावी असं वाटत होतं. 
पाणी मिळेल या आशेने तो आत शिरला. आणि समोरच दृष्य पाहून तो थबकलाच. माणूस मागतो एक डोळा आणि देव देतो दोन अशी त्याची स्थिती झाली.
तिथे एक हातपंप होता आणि त्याचा पाईप जमिनीत शिरला होता. त्याच्या लक्षात आलं जमिनीखाली पाणी आहे. हा पाईप तिथेच गेलाय. त्याच्या अंगात एकदम उत्साह संचारला. पुढे सरकत त्याने हातपंप जोराजोरात वरखाली करायला सुरवात केली. पण काहीच झालं नाही. पाणी आलंच नाही. नुसतात पंपाचा आवाज येत राहिला. अखेर हताश होऊन तो मटकन खाली बसला. आता आपलं मरण त्याला जास्त प्रकर्षाने जाणवले. 
तेवढ्यात त्याचं लक्ष कोपऱ्यात ठेवलेल्या बाटलीकडेे गेलं. परत एक अत्यानंदाची लहर उठली. बाटली पाण्याने भरलेली होती आणि वाफ होऊन जाऊ नये म्हणून व्यवस्थित सिल केलेली होती. चटकन तो पुढे सरकला.  त्याने पाणी पिण्यासाठी बाटली उघडली तेवढ्यात बाटलीवर लावलेल्या एका कागदाकडे त्याचे लक्ष गेले. 
त्यावर लिहिले होते "हे पाणी पंप सुरू करण्यासाठी  वापरा आणि तुमचं काम झाल्यावर ही बाटली परत भरून ठेवायला विसरू नका."
तो चक्रावलाच. त्याच्या मनात द्वंद्व सुरू झालं. काय करावं? या सुचनेकडे दुर्लक्ष करून सरळ पाणी पिऊन मोकळं व्हावं? की सुचनेप्रमाणे करावं?  
समजा, सूचनेप्रमाणे पंपात पाणी ओतलं आणि पंप खराब असेल तर?, पंपाचा पाईप तुटला असेल तर?, खालचं पाणी आटून गेलं असेल तर? पाणी वायाच जाईल... सगळा खेळ खल्लास...
पण सुचना बरोबर असतील तर?... तर भरपूर पाणी...
पाणी पंपात ओतण्याचा धोका पत्करावा की नाही यावर त्याच मत ठरेना. 
शेवटी मनाचा निर्धार करत थरथरत्या हातांनी त्याने ते पाणी पंपात ओतले. डोळे मिटून देवाचा धावा केला आणि पंप वरखाली करायला सुरवात केली. हळूहळू पाण्याचा आवाज सुरू झाला आणि काही क्षणातच पाणी यायला सुरवात झाली. भरपूर पाणी येतं होतं. त्याला काय करू नी काय नको असं झालं. ढसाढसा पाणी प्यायला तो. स्वतः जवळच्या बाटल्या पण काठोकाठ भरल्या त्याने. तो खुप खुश झाला होता. 
शांत आणि पाण्याने तृप्त झाल्यावर त्याचे लक्ष आणखी एका कागदाकडे गेले. तो त्या परिसराचा नकाशा होता. त्यावरून सहज लक्षात येत होतं की तो मानवी वस्तीपासून अजून खुप दूर होता. पण आता निदान त्याला त्याच्या पुढच्या प्रवासाची दिशा तरी समजली होती.
त्याने निघायची तयारी केली. सुचनेप्रमाणे ती बाटली भरून सिलबंद करून ठेवली. 
आणि त्या बाटलीवरच्या कागदावर एक ओळ स्वतः लिहीली. "विश्वास ठेवून हे पाणी पंपात ओता, पाणी येतच" आणि तो पुढे निघाला. 
----
तात्पर्य- ही गोष्ट आहे देण्याचं महत्व सांगणारी. काही मिळवण्यासाठी काही द्यावं लागतं हे अधोरेखित करणारी. काही दिल्यानंतर मिळतं ते भरपूर असतं, आनंददायी असतं. 
त्याही पेक्षा जास्त प्रकर्षाने ही गोष्ट विश्वासाबद्दल सांगते.  विश्वासाने केलेले दान खुप आनंद देते. 
आपल्या कृतीमुळे फायदा होईल याची खात्री नसतानाही त्याने विश्वास दाखवला. 
काय होईल माहिती नसताना त्याने विश्वासाने अज्ञातात उडी मारली. 
या गोष्टीतले पाणी म्हणजे आयुष्यात घडणाऱ्या चांगल्या गोष्टी. 
त्यांच्याकरता वेळ द्या आणि त्याच्या बदल्यात कितीतरी जास्त पटीने आनंदाची झोळी भरून घ्या.

-संग्रहीत