सुस्वागतम! सुस्वागतम!! सर्व सन्माननीय शिक्षणप्रेमी वाचक बंधु भगिनींचे आश्रमशाळा शिक्षकमित्र या शैक्षणिक ब्लॉगवर आपले हार्दिक स्वागत आहे

गुरुवार, २८ जून, २०१८

सामान्यज्ञान प्रश्नसंग्रह भाग - १६

सामान्यज्ञान प्रश्नसंग्रह भाग - १६
प्रश्न-१) लिंबू व संत्रे ह्यात कोणते अॅसिड असते?
उत्तर:- लिंबू व संत्रे ह्यात सायट्रिक अॅसिड असते.

प्रश्न-२) अँटिसॆप्टिक मलम आणि थायरॉइड स्त्रावामध्ये कोणता घटक आवश्यक असतो?
उत्तर:- अँटिसॆप्टिक मलम आणि थायरॉइड स्त्रावामध्ये आयोडीन हा घटक आवश्यक असतो.

प्रश्न-३) ग्रामीण भागात सोयीस्कर इंधन कोणते?
उत्तर:- ग्रामीण भागात सोयीस्कर इंधन बायोगॅस आहे.

प्रश्न-४) टेपरेकाॅर्डरच्या कॅसेटवर कशाचे आवरण असते?
उत्तर:- टेपरेकाॅर्डरच्या कॅसेटवर आयर्न आॅक्साइड हे आवरण असते.

प्रश्न-५) नैसर्गिक मुलमत्ते किती आहेत?
उत्तर:- नैसर्गिक मुलमत्ते ९२ आहेत.

प्रश्न-६) वायू हे मुलतत्व नसून ती दोन वायूंची बनली आहे, हे कोणत्या शास्त्रज्ञाने सिद्ध केले?
उत्तर:- वायू हे मुलतत्व नसून ती दोन वायूंची बनली आहे, हे लॅव्हायशर या शास्त्रज्ञाने सिद्ध केले.

प्रश्न-७) भारतामध्ये ३००० वर्षापूर्वी परमाणुमीमांसा कोणी केला?
उत्तर:- भारतामध्ये ३००० वर्षापूर्वी परमाणुमीमांसा महर्षी कणाद यांनी केला.

प्रश्न-८) परमाणुमीमांसा चा जनक कोण आहे?
उत्तर:- परमाणुमीमांसा चा जनक जॉन डॉल्टन आहे.

प्रश्न-९) मादाम मेरी क्युरी ह्यांनी कोणता शोध लावला?
उत्तर:- मादाम मेरी क्युरी ह्यांनी रेडियम चा शोध लावला.

प्रश्न-१०) भारतातील पहिला परमाणु शक्ती प्रकल्प कोठे सुरु झाला?
उत्तर:- भारतातील पहिला परमाणु शक्ती प्रकल्प तारापूर येथे सुरु झाला.

प्रश्न-११)महत्वाच्या प्लॅस्टिकला काय म्हणतात?
उत्तर:- महत्वाच्या प्लॅस्टिकला पीव्हीसी म्हणतात.

प्रश्न-१२) लोखंडाच्या कोणत्या प्रकारात कार्बनचे प्रमाण अधिक असते?
उत्तर:- लोखंडाच्या ओतीव लोखंड अथवा बीड यात कार्बनचे प्रमाण अधिक असते.

प्रश्न-१३) आवर्त सारणी प्रथम कोणत्या शास्त्रज्ञाने मांडली?
उत्तर:- आवर्त सारणी प्रथम मेंडोलिव्ह या शास्त्रज्ञाने मांडली.

प्रश्न-१४) रक्तामध्ये लोह कोणत्या रुपात असते?
उत्तर:- रक्तामध्ये लोह सयुंग रुपात असते.

प्रश्न-१५) वातावरणातील रासायनिक दृष्ट्या निष्क्रिय वायू कोणता आहे?
उत्तर:- वातावरणातील रासायनिक दृष्ट्या निष्क्रिय वायू आॅरगाॅन आहे.

प्रश्न-१६) भोपाळ दुर्घटनेसाठी कोणती कंपनी जबाबदार धरली जाते?
उत्तर:- भोपाळ दुर्घटनेसाठी युनियन कार्बाइड ही कंपनी जबाबदार धरली जाते.

प्रश्न-१७) प्राण्यांच्या शरीरात आढळणारा युरिया हा पदार्थ कृत्रिमरीत्या तयार करणारा शास्त्रज्ञ कोण?
उत्तर:- प्राण्यांच्या शरीरात आढळणारा युरिया हा पदार्थ कृत्रिमरीत्या तयार करणारा शास्त्रज्ञ व्होलर आहे.

प्रश्न-१८) सर्व रसायनांचा राजा कोणाला म्हणतात?
उत्तर:- सर्व रसायनांचा राजा गंधकाम्ल याला म्हणतात.

प्रश्न-१९) परमाणुशक्तीसंघटना ची स्थापना केव्हा झाली?
उत्तर:- परमाणुशक्तीसंघटना ची स्थापना १९५४ मध्ये झाली.

सौ्जन्य- तंत्रस्नेही शिक्षक समूह महाराष्ट्र

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा