सुस्वागतम! सुस्वागतम!! सर्व सन्माननीय शिक्षणप्रेमी वाचक बंधु भगिनींचे आश्रमशाळा शिक्षकमित्र या शैक्षणिक ब्लॉगवर आपले हार्दिक स्वागत आहे

सोमवार, २५ जून, २०१८

सामान्यज्ञान प्रश्नसंग्रह भाग - १५

सामान्यज्ञान प्रश्नसंग्रह भाग - १५
प्रश्न-१) वारली पेंटीग्ज मूळच्या कोणत्या राज्यातील आहेत?
उत्तर :-  महाराष्ट्र

प्रश्न-२) यापैकी कोणता धातू लोखंडापेक्षा कठीण आहे?
उत्तर :-  निकेल

प्रश्न-३) कॉम्प्यूटरम ध्ये 'ए एस सी आय आय' (ASCII) याचा अर्थ काय आहे?
उत्तर :-  अमेरिकन स्टँडर्ड कोड फॉर इन्फॉर्मेशन इंटरचेंज

प्रश्न-४) भारतात अंधांसाठी सन 1887 मध्ये पहिली शाळा कोठे सुरू करण्यात आली?
उत्तर :-  अमृतसर

प्रश्न-५) खालीलपैकी कशाचे मोजमाप रिम्स किंवा कॅलिपरने घेतले जाते?
उत्तर :-  कागद

प्रश्न-६) जेवण केल्यानंतर नेहमी काय करावे?
उत्तर :- वज्रासन

प्रश्न-७) जेवण झाल्यावर वज्रासन किती वेळ करावे?
उत्तर :- 5 -10 मिनिटे

प्रश्न-८) सकाळी उठल्यावर डोळ्यात काय टाकावे?
उत्तर :- तोंडाची लाळ

प्रश्न-९) रात्री किती वाजन्याच्या आत झोपावे?
उत्तर :- 9 - 10 वाजे पर्यन्त

प्रश्न-१०) तीन विष कोणते?
उत्तर :- साखर , मैदा व मीठ.

प्रश्न-११) जम्मू काश्मीर मधील सलाल जलविद्युत प्रकल्प कोणत्या नदीवर आहे?
उत्तर :- चिनाब

प्रश्न-१२) जर एका वर्गातील विद्यार्थ्यांच्या गुणांची बेरीज 2795 आणि सरासरी 65 असेल, तर वर्गातील विद्यार्थी संख्या किती?
उत्तर :-  43

प्रश्न-१३) माऊंट अबू कोणत्या पर्वत रांगेत आहे?
उत्तर :-  अरवली

प्रश्न-१४) भारताच्या कोणत्या राज्याची राजधानी सात वन्य टेकड्यांवर आहे?
उत्तर :-  तिरुवनंतपुरम

प्रश्न-१५) शिवसमुद्र धबधबा कोणत्या नदीवर आहे?
उत्तर :-  कावेरी

प्रश्न-१६) महाराष्ट्रामध्ये ग्राम न्यायालयाची स्थापना कधी झाली?
उत्तर :-  2 ऑक्टोबर, 2009

प्रश्न-१७) राष्ट्रीय विज्ञान व तंत्रज्ञान दिवस कोणता?
उत्तर :-  11 मे

प्रश्न-१८)  जगातील सर्वात जास्त तंबाखू उत्पादक करणारा देश कोणता?
उत्तर :-  भारत

प्रश्न-१९) भारतातील कुपोषित मुलांचे प्रमाण किती?
उत्तर :-  42%

प्रश्न-२०) भारतातील सरासरी मृत्यु दर किती?
उत्तर :-  7.2

सौ्जन्य- तंत्रस्नेही शिक्षक समूह महाराष्ट्र

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा